9 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 जानेवारी 2023)
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची सूत्रे रोहित पवारांकडे:
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन नातवांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आ.रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली.
त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेपाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतही राजकारणाचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची सूत्रे राजकीय व्यक्तीच्या हाती जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-20 सामना खेळला गेला.
या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 91 धावांनी पराभूत केले.
त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.
भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.
सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 45 चेंडूत शतक पूर्ण केले.
असे केल्याने तो भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला.
त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने शतक झळकावून इतिहास रचला, कारण त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजाला सलामीशिवाय 3 शतके झळकावता आलेली नाहीत.
भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा सूर्या हा दुसरा फलंदाज ठरला आहे.
आता त्याच्या पुढे फक्त रोहित शर्मा आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके झळकावली आहेत.
दिनविशेष:
सन 1870 मध्ये मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.
महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म 9 जानेवारी 1900 रोजी झाला होता.
इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा जन्म 9 जानेवारी 1901 मध्ये पनवेल येथे झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक9 जानेवारी 1926 रोजी मुंबईत सुरू केले.
सन 1966 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.