9 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
‘एक राज्य, एक खेळ -केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू:
9 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 जुलै 2020)
भारतीय जवानांना 89 अॅप्स काढून टाका असा आदेश:
भारतीय लष्कराने जवानांना मोबाइलमधून 89 अॅप्स तात्काळ काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
भारतीय लष्कराकडून यासंबंधी आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच पबजीचाही समावेश आहे.
भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील आणि गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता असल्याने हा आदेश देण्यात आला आहे.
15 जुलैपर्यंत अॅप्स काढून टाकावीत असे निर्देश भारतीय लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत.
जगभरात थैमान घेतलेल्या कोविड-१९ आजारावर विविध देशांमध्ये सध्या संशोधनं सुरु आहेत.
एका परदेशी विद्यापीठातील वैज्ञानिकांनी या आजाराबाबत नवा इशारा दिला आहे. करोनासंबंधित मेंदूच्या आजारांची नवी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) येथील एका संशोधनानुसार, करोनाची लागण झालेल्या काही रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्यांपैकी 43 रुग्णांच्या मेंदूचे कार्य बिघडलेले आढळून आले.
त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्ट्रोक, मेंदूच्या नसा खराब होणे आणि मेंदूशी संबंधित इतर विपरित परिणाम झालेले आढळून आले आहेत.
‘एक राज्य, एक खेळ -केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू:
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक पदके मिळवावी, यासाठी प्रत्येक राज्याने एका खेळाची निवड करून त्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी इच्छा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.
एका वेबिनारदरम्यान रिजिजू यांनी ‘एक राज्य, एक खेळ’ या संकल्पनेचा प्रस्ताव मांडला.
‘भारताच्या प्रत्येक राज्यातील क्रीडा मंत्र्यालयांना ‘एक राज्य, एक खेळ’ या मोहिमेचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.
मणिपूर हे राज्य बॉक्सिंग या खेळावर विशेष लक्ष देऊ शकते,’’ असे रिजिजू म्हणाले.
दिनविशेष :
शिवणयंत्राचे संशोधक ‘एलियास होव‘ यांचा जन्म 9 जुलै 1819 मध्ये झाला होता.
सन 1873 मध्ये 9 जुलै रोजी मुंबई शेअर बाजार सुरू झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 9 जुलै 1921 मध्ये झाला होता.
सन 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती 9 जुलै 2011 मध्ये झाली.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.