Current Affairs (चालू घडामोडी)

9 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त इक्बाल चहल

9 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 मे 2020)

मुंबई महापालिकेचे इक्बाल चहल नवे आयुक्त :

  • राज्यातील ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने शुक्रवारी बदल्या केल्या आहेत. यात मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे.
  • प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली केली आहे. आता प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत.
  • प्रवीण परदेशी यांच्यासह मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचीही बदली करण्यात आली आहे.
  • मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • आबासाहेब जऱ्हाड यांची आता मदत आणि पुनर्वसन सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
  • दरम्यान, प्रवीण परदेशी यांनी मे 2019 मध्ये मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहात होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 मे 2020)

नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धात आनंदच्या विजयामुळे भारत पाचव्या स्थानी :

  • माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने नेशन्स चषक सांघिक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली.
  • परंतु तिसऱ्या दिवसाच्या पाचव्या फेरीत रशियाने बरोबरीत रोखले. मग सहाव्या फेरीत अमेरिकेने भारताला 2.5-1.5 अशा फरकाने नामोहरम केले असले तरी भारताला पाचवे स्थान गाठता आले आहे.
  • तर पाचव्या फेरीत 50 वर्षीय आनंदने रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोमनियाचशीला फक्त 17 चालींत पराभूत केले.
  • मग बी. अधिबान आणि द्रोणावल्ली हरिका यांनी अनुक्रमे सर्जी कर्जकिन आणि ओल्गा गिर्या यांना बरोबरीत रोखले.
  • परंतु व्लादिस्लाव्ह आर्टेमीव्हने पी. हरिकृष्णाला पराभूत केल्यामुळे रशियाला सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधता आली.

दिल्ली सरकारने सुरू केली ‘ऑनलाइन टोकन’ व्यवस्था :

  • दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने दारुच्या दुकानांबाहेरील लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी ऑनलाइन टोकन व्यवस्था सुरू केली आहे.त्यामुळे आता दिल्लीतल्या मद्यप्रेमींना, तळीरामांना घरबसल्या दारुसाठी बूकिंग करता येणार आहे.
  • तर यासाठी दिल्ली सरकारने https://www.qtoken.in/ ही एक वेबसाइटची लिंक जारी केली आहे.
  • तसेच या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर दारु खरेदीसाठी जवळचं दुकान निवडावं लागेल. त्यानंतर तारीख आणि वेळ सांगितली जाईल.
  • त्यावेळेमध्ये संबंधित व्यक्ती रांगेमध्ये उभे न राहता दुकानामध्ये जाऊन दारु खरेदी करु शकेल. टोकन दुकानात दाखवताना एक सरकारी ओळखपत्रही दाखवावं लागेल. लॉकडाउनच्या नियमांचं पालन व्हावं आणि दुकानांवरील गर्दी कमी व्हावी यासाठी ही योजना आणल्याचं दिल्ली सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
  • यापूर्वी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने दारु विक्रीवर ‘विशेष करोना शुल्क’ही लावले आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता दारु एमआरपीपेक्षा 70 टक्के जास्त महाग मिळतेय. पण तरीही दारुच्या दुकानांबाहेरील गर्दी कमी होत नसल्याने आता सरकारने ऑनलाइन टोकन व्यवस्था सुरू केली आहे.
  • दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने 4 मे पासून लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांसाठी आणखी वाढवला.
  • लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य आणि तंबाखूची दुकानं सुरु करण्यास परवानगी दिली. तसंच, रेड झोनमध्येही कन्टेंटन्मेंट क्षेत्र वगळता दारु विक्रीला परवानगी मिळाली.

लॉकडाउनमध्ये Jio चा तिसरा मोठा करार :

  • लॉकडाउनदरम्यान रिलायन्स ग्रुपने तिसरा मोठा करार केला आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक आणि सिल्वर लेक या कंपन्यांनी रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली.
  • त्यानंतर आता अमेरिकेची अजून एक मोठी कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेची खासगी इक्विटी फर्म ‘व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स’ (Vista Equity Partners) रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
  • रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अमेरिकेची व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या गुंतवणूकीद्वारे व्हिस्टा कंपनी जिओमध्ये 2.32 टक्के हिस्सेदारी खरेदी करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्सकडून काल याबाबत माहिती देण्यात आली.
  • तर या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू 5.16 लाख कोटी होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
  • जगातील पाचवी सर्वात मोठी ‘एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर’ बनवणारी कंपनी म्हणून व्हिस्टाची ओळख आहे. “जिओ भारतात डिजिटल प्लॅटफॉर्मचं मोठं काम करत आहे.
  • तसेच या करारामुळे तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 60,596 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबुकने 9.99 टक्के भागभांडवल खरेदी करताना जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

CBSC बोर्डाच्या 10 वी 12 वीच्या परीक्षा 1 जुलैपासून :

  • CBSC बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या ज्या परीक्षा लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या या परीक्षा आता 1 ते 15 जुलै दरम्यान होणार आहेत अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.
  • सीबीएससी बोर्ड 10 आणि 12 वीच्या उर्वरित परीक्षा घेणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार आता ही घोषणा करण्यात आली आहे.
  • मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकाडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार आहेत.

दिनविशेष :

  • मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्राम 9 मे 1874 मध्ये सुरू झाल्या.
  • 9 मे 1936 मध्ये इटलीने इथिओपिया देश बळकावला.
  • पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे 9 मे 1955 मध्ये प्रवेश.
  • मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा 9 मे 1540 मध्ये जन्म.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 मे 2020)

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago