9 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
9 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2018)
यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर:
- विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर यांना अर्ल्फेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
- हवामान बदल आणि आर्थिक विकासाबाबत केलेल्या संशोधनासाठी रॉयल स्विडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसने 8 ऑक्टोबर रोजी या दोघांच्या नावाची नोबेलसाठी घोषणा केली.
- विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर हे दोघे अर्थशास्त्रज्ञ अमेरिकेचे नागरिक आहेत. नोर्दहॉस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे येल विद्यापीठातूनच घेतले आहे. त्यांनी प्रतिष्ठित मॅसाचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून पीएचडीचे शिक्षण घेतले आहे.
- या दोन्ही अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना पुरस्काराच्या रुपाने 90 लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे 7.35 कोटी रुपये) मिळणार आहेत. या दोघांना 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे एका औपचारिक कार्यक्रमात या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कारांची सुरुवात करणारे अल्फ्रेड नोबेल यांच्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
Must Read (नक्की वाचा):
भारताच्या जागतिक कुस्ती संघात 30 मल्लांचा समावेश:
- हंगेरीमध्ये 20 ते 28 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारताकडून 30 जणांच्या दमदार संघाची निवड करण्यात आली आहे. पुरुष गटात बजरंग पुनिया तर महिला गटात साक्षी मलिक हे भारताचे नेतृत्व करणार आहेत.
- भारताने या स्पर्धेसाठी फ्री स्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला गटात प्रत्येकी 10 मल्लांची निवड करण्यात आली आहे. त्यात बजरंग 65 किलो वजनी गटात, तर साक्षी 62 किलो वजनी गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
- जगमिंदर सिंग हे पुरुषांच्या फ्री स्टाईलचे मुख्य प्रशिक्षक, तर महिलांसाठी कुलदीप मलिक यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 30 कुस्तीपटूंसह 17 अन्य पदाधिकारी या संघासमवेत जाणार आहेत.
आयकर परतावा भरण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ:
- आर्थिक वर्ष 2017-18 साठी आयकर परतावा (आयटीआर) भरण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- मुदतवाढ देण्यात आली असली तरी उशिरा आयकर भरणाऱ्यांकडून सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (सीबीडीटी) नियमानुसार दंड वसूल केला जाणार आहे. यापूर्वी 30 सप्टेंबरची मुदत सीबीडीने वाढवून 15 ऑक्टोबरपर्यंत केली होती, आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
- करदात्यांच्या प्रतिनिधींनी सीबीडीटीकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या विनंतीनुसार, विशेष वर्गातील करदात्यांना आयकर भरणा करण्याकरिता आणि ऑडिट रिपोर्ट सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.
- मुदतवाढ देण्यात आली असली तरी उशिरा आयकर भरणाऱ्यांकडून सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (सीबीडीटी) नियमानुसार दंड वसूल केला जाणार आहे.
- कारण, आयटी अॅक्ट, 1961 च्या कलम 234ए (स्पष्टीकरण 1) अन्वये मुदतवाढ देता येत नाही. हेच कलम आयकर न भरणाऱ्यांकडून व्याज वसूली संदर्भातील सुद्धा आहे. त्यामुळे कलम 234ए नुसार करदात्यांना आयकर भरताना दंडापोटी व्याज भरावे लागणार आहे.
- सीबीडीटीने यापूर्वीच नियमित कर भरणा करणाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार पगारदार करदाते आणि नियमित उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांमध्ये 71 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- 31 ऑगस्ट 2018 पर्यंत करदात्यांचा हा आकडा 5 कोटी 42 लाख एवढा होता. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात 11.5 ट्रिलियन रुपयाचे प्रत्यक्ष कराचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे उद्दिष्ट 14.6 टक्के अधिक आहे.
युवा राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक:
- युवा जागतिक आणि युवा राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे रौप्यपदक व सुवर्णपदक जिंकणाऱ्या जेरेमी लालरीनुंगाने भारताला यंदाच्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावून दिले.
- मिझोरमच्या या 15 वर्षीय वेटलिफ्टिंगपटूने त्याचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले. 64 किलो वजनी गटात त्याने एकूण 274 किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले.
गुगलकडून मोठी घोषणा:
- पाच लाख युजर्सच्या भल्यासाठी गुगलने ‘गुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 ऑक्टोबर रोजी कंपनीने ‘गुगल प्लस’च्या समाप्तीचीच घोषणा केल्याने युजर्सला धक्का बसला आहे.
- मागील काही दिवसांपासून फेसबुक युजर्सचा डेटा धोक्यात असल्याची माहिती समोर आली होती. एका विशिष्ट बगव्दारे पाच लाख गुगल प्लसच्या खात्यामधून माहिती लीक झाली होती. गुगल प्लस बंद करण्यापूर्वी हा बग काढून टाकण्यात आल्याची माहिती गुगलने दिली आहे.
- अमेरिकेतील एका दिग्गज इंटरनेट कंपनीने गुगल प्लस युजर्ससाठी हा सुर्यास्त असल्याचे म्हटले आहे. गुगल प्लसची निर्मिती करण्यापासून ते लोकांपर्यंत पोहचवण्यापर्यंत अनेक आव्हानाचा सामना करावा लागला. युजर्सच्या अपेक्षेनुसार गुगल प्लस तयार करण्यात आले होते. पण हवा तसा गुगल प्लसचा वापर करण्यात येत नव्हता. त्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले आहे.
पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्णपदक:
- भारताचा दिव्यांग भालाफेकपटू संदीप चौधरीने जकार्तात सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतले भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
- संदीपने अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या प्रयत्नात 60.01 मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. श्रीलंकेच्या चामिंडा संपथ हेट्टीला रौप्य तर इराणच्या ओमिदी अलीने कांस्य पदकाची कमाई केली.
- 7 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेत भारताने दोन रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई केली होती. 49 किलो वजनीगट पॉवरलिफ्टींग प्रकारात फरमान बाशाने रौप्य तर परमजीत कुमारने कांस्यपदकाची कमाई केली.
- जलतरण प्रकारात भारताच्या देवांशीने 100 मी. बटलफ्लाय प्रकारात रौप्य तर पुरुषांमध्ये सुयश जाधवने 200 मी. प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे.
दिनविशेष:
- 9 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक पोस्ट दिन‘ आहे.
- बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1876 मध्ये झाला.
- ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
- युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून सन 1932 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा