Current Affairs (चालू घडामोडी)

9 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

9 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2019)

सरकार उभारणार 1 हजार 400 किलोमीटरची ‘ग्रीन वॉल’ ऑफ इंडिया :

  • केंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ‘ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आफ्रिकेत सेनेगल पासून जिबूतीपर्यंत तयार करण्यात आलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर गुजरातपासून दिल्ली-हरियाणाच्या सीमेपर्यंत ‘ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे.
  • तर ही ग्रीन वॉल लांबीला 1 हजार 400 किलोमीटर तर रूंदीला 5 किलोमीटर इतकी असणार आहे.
  • तसेच वातावरणातील बदलांशी सामना करण्यासाठी आफ्रिकेत अशी भिंत उभारण्यात आली आहे. याला ‘ग्रेट ग्रीन वॉल ऑफ सहारा’ असंही म्हटलं जातं.
  • सध्या हा प्रकल्प सुरूवातीच्या टप्प्यात आहे. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर भविष्यकाळात वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी याकडे एक उदाहरण म्हणून पाहता येऊ शकते. थार वाळवंटातून ही भिंत विकसित केली जाणार आहे.
  • याव्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, हरियाणा ते दिल्लीपर्यंत परसलेल्या अरावली डोंगरावरील कमी होणाऱ्या हरित पट्ट्याच्या संकटावरही मात करता येऊ शकते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2019)

जेम्स पीबल्स, मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांचा सन्मान :

  • महाविस्फोटापासून आतापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था व विश्वातील पृथ्वीचे स्थान या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना तर बाह्य़ग्रहाच्या शोधासाठी मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांना यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • विश्वाचा वेध घेणारे हे अतिशय क्रांतिकारी संशोधन असल्याचे नोबेल निवड समितीने या तिघांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले आहे.
  • विश्वाच्या उत्क्रांत अवस्थांचा अभ्यास पीबल्स यांनी केला असून मेयर व क्वेलॉझ यांनी 1995 मध्ये दूरवर सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध लावला होता त्यानंतर आतापर्यंत चार हजारहून अधिक बाह्य़ग्रहांचा शोध लावण्यात यश आले आहे.
  • रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली असून नऊ दशलक्ष क्रोनर म्हणजे नऊ लाख 18 हजार अमेरिकी डॉलर्सच्या रकमेतील निम्मा वाटा जेम्स पीबल्स
    यांना मिळणार असून इतर दोघांना उर्वरित रक्कम सारखी वाटून दिली जाणार आहे.
  • जेम्स पीबल्स हे न्यूजर्सी येथील प्रिन्स्टन विद्यपीठात प्राध्यापक असून त्यांनी विशची उत्क्रांती व पृथ्वीचे विश्वातील स्थान यावर संशोधन केले. महाविस्फोटानंतरच्या वैश्विक सूक्ष्म लहरी म्हणजे सीएमबीआरचे अस्तित्व त्यांनी पहिल्यांदा वर्तवले होते.
  • मिशेल मेयर व दिदियर क्वेलोझ यांना पृथ्वीपासून पन्नास प्रकाशवर्षे दूर असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या 51 पेगासी बी या ग्रहाचा शोध लावल्याबद्दल नोबेल जाहीर करण्यात आले. या दोघांनी पहिल्या बाह्य़ग्रहाचा शोध लावला.
  • तर हा ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरत आहे तो तारा वेगळ्या स्वरूपाचा असून तसे फार थोडे तारे आहेत, कारण त्यात हायड्रोजन अणूंचे संमीलन होऊन हेलियमचे अणू गाभ्याच्या ठिकाणी तयार होतात. अशा प्रकारच्या दुर्मीळ ताऱ्यात
    सूर्याचाही समावेश आहे.
  • तसेच अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल मोलोनी यांनी म्हटले आहे की, विश्वाच्या मूलभूत स्वरूपाबाबतचे हे संशोधन क्रांतिकारी असून दूरस्थ बाग्रह शोधण्यातून विश्वरचनाशास्त्रात
    बाह्य़ग्रह विज्ञान ही नवीन शाखाच निर्माण झाली आहे. 1995 मध्ये पहिला बाह्य़ग्रह शोधला गेला तेव्हा पृथ्वीचे विश्वातील स्थान काय आहे याबाबतचे आकलन बदलले आहे.

बालाकोट हवाई हल्ल्यातील स्क्वॉड्रन पदकांनी सन्मानित :

  • बालाकोट हल्ल्यात सहभागी असलेले दोन स्क्वॉड्रन आणि भारतीय हवाई दलाच्या एका युनिटला पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
  • भारतीय हवाई दल दिनाच्या निमित्ताने हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी 51 स्क्वॉड्रन आणि 601 एक युनिट व नऊ स्क्वॉड्रन यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यातील सहभागाबद्दल पदके प्रदान करून सन्मानित केले.
  • बालाकोट हल्ल्यातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि अन्य वैमानिकांनी या वेळी हवाई कसरतींमध्ये भाग घेतला. पाकिस्तानसमवेत झालेल्या लढाईच्या वेळी वर्धमान यांनी शत्रुपक्षाचे विमान पाडले होते.
  • तसेच हवाई दल दिनानिमित्त भदौरिया यांनी बालाकोट हल्ल्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्व स्क्वॉड्रननी असामान्य धैर्य, निर्धार आणि व्यावसायिकता दाखवून भारताचा विजय निश्चित केला

स्विस बँकांमधील खात्यांचा भारताला तपशील :

  • भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात माहितीच्या परस्पर देवाणघेवाणीबाबत झालेल्या नव्या व्यवस्थेंतर्गत, भारतीय नागरिकांच्या स्विस बँकांमधील खात्यांबाबतच्या तपशिलाचा पहिला भाग भारताला मिळाला आहे.
  • तसेच परदेशात दडवून ठेवल्याचा संशय असलेल्या काळ्या पैशाविरुद्धच्या लढय़ात हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
  • ‘ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फर्मेशन’ (एईओआय) बाबत जागतिक निकषांच्या चौकटीत स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफटीए) स्विस बँकांतील आर्थिक खात्यांबाबत ज्या 75 देशांना माहिती दिली आहे, त्यात भारताचा समावेश आहे.
  • तर सध्या सक्रिय असलेल्या, तसेच 2018 साली बंद करण्यात आलेल्या बँक खात्यांबाबत माहिती देण्याची तरतूद असलेल्या एईओआयच्या चौकटीअन्वये स्वित्झर्लंडकडून भारताला तपशील मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर अशा प्रकारची माहिती सप्टेंबर 2020 मध्ये दिली जाईल, असे एफटीएच्या प्रवक्त्याने सांगितले.

रोहित शर्मा-मयांक अग्रवालच्या क्रमवारीत सुधारणा :

  • विशाखापट्टणम कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी मात केली. या विजयासह भारत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
  • तर सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली. मयांक अग्रवालनेही पहिल्या डावात द्विशतक झळकावत रोहितला उत्तम साथ दिली होती. या खेळीचा रोहित आणि मयांकला
    कसोटी क्रमवारीत फायदा झालेला आहे.
  • तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत रोहितने 17 व्या स्थानावर झेप घेतली आहे. कसोटी कारकिर्दीतलं रोहितचं हे सर्वोत्तम स्थान मानलं जात आहे. याचसोबत मयांक अग्रवालनेही आपल्या क्रमवारीत 38 स्थान झेप घेत थेट 25 वं स्थान पटकावलं आहे.
  • तर याव्यतिरीक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपलं दुसरं तर ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

दिनविशेष:

  • 9 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक पोस्ट दिन‘ आहे.
  • बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1876 मध्ये झाला.
  • ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
  • युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून सन 1932 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑक्टोबर 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago