9 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
9 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2020)
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन:
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व वितरण मंत्री तसेच लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवार) निधन झाले, ते 74 वर्षांचे होते.
बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलं.
दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. सुमारे पाच दशकांपर्यंत त्यांची बिहार आणि देशाच्या राजकारणात छाप राहिली.
दोन वेळेस लोकसभा निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा विश्वविक्रमही केला आहे.
फोर्ब्सने सन 2020ची 100 सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावं पहिल्यांदाच समाविष्ट झाले आहेत.
तर केवळ तीन महिलांनी स्थान पटकावले आहे. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे (आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सलग 13व्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी हे सलग 13 वर्षे भारतातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. मुकेश अंबानींकडे 88.7 अब्ज डॉलर संपत्ती आहे.
नुकतेच लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे मंदीची स्थिती असताना रिलायन्स समुहाच्या जियो आणि रिलायन्स रिटेलमध्ये जगातील अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केली.
अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना साहित्यातला नोबेल जाहीर:
अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना 2020 चा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
लुईस यांना त्यांच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्यांच्या आवाजातील गोडी व्यक्तिगत अस्तित्वाला एक सार्वभौमत्व प्राप्त करुन देते असं नोबेल समितीनं त्यांचा गौरव करताना म्हटलं आहे.
त्यांच्या सर्वात नावाजलेल्या काव्यसंग्रहांपैकी ‘द वाइल्ड आयरिस’ हा काव्यसंग्रह सन 1992 मध्ये प्रकाशित झाला होता.
या काव्यसंग्रहातील ‘स्नोड्रॉप्स’ या एका कवितेत त्यांनी थंडीनंतरच्या जीवनातील चमत्काराचं वर्णन केलं आहे.
रिसर्च अँड अॅनलिसिस विंग म्हणजे ‘रॉ’ आणि इंटेलिजन्स ब्युरो या भारताच्या प्रमुख गुप्तचर यंत्रणा आहेत. ‘रॉ’ कडे देशाच्या बाह्य सुरक्षेची तर आयबी अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या दोन्ही संस्था सध्या इन्कम टॅक्स, अमलबजावणी संचलनालय म्हणजे इडी, महसूल गुप्तचर संचलनालय आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ‘इंटेलिजन्स ट्रेडकाफ्ट’चे प्रशिक्षण देत आहे.
‘इंटेलिजन्स ट्रेडकाफ्ट’ म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करुन, आधुनिक पद्धतीने हेरगिरी करण्याचे तंत्र आणि पद्धत.
गुप्त पद्धतीने माहिती गोळा करणे तसेच डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे हाताळण्यात आयआरएस अधिकाऱ्यांना पारंगत करण्यासाठी खास नऊ कोर्सेसचे मॉड्युल बनवण्यात आले आहे.
भारतीय महसूल सेवेतील फक्त ग्रुप ए च्या अधिकाऱ्यांना रॉ च्या गुरगावमधील प्रशिक्षण केंद्रात तर आयबीच्या दिल्लीतील राष्ट्रीय गुप्तचर केंद्रात प्रशिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान केंद्रीय अर्थमंत्रालयाचे CEIB समन्वयक म्हणून काम पाहते.
फ्रान्सचा 7-1 ने विजय:
आघाडीवीर ऑलिव्हियर गिरौडने आपल्या 100व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल झळकावल्यामुळे फ्रान्सने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत युक्रेनसारख्या बलाढय़ संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला.
युवा खेळाडू एडवाडरे कॅमाविंगा याने नवव्या मिनिटालाच फ्रान्सचे खाते खोलल्यानंतर गिरौडने 24व्या आणि 33व्या मिनिटाला गोल लगावत फ्रान्सला 3-0 असे आघाडीवर आणले होते.
विताली मायकोलेंको याच्या स्वयंगोलमुळे फ्रान्सने पहिल्या सत्रात 4-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती.
फ्रान्सचे प्रशिक्षक दिदियर देसचॅम्प्स यांनी दुसऱ्या सत्रात किलियन एम्बाप्पे आणि विक्टर सायगानकोव्ह यांना संधी दिली.
त्यानंतर कोरेन्टिन टोलिस्सो, एम्बाप्पे आणि अँटोनी ग्रिएझमान यांनी गोल करत फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिनविशेष:
9 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक पोस्ट दिन‘ आहे.
बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1876 मध्ये झाला.
ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून सन 1932 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.