9 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
9 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2021)
मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमणियन यांचा राजीनामा :
- केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी राजीनामा दिला.
- तर त्यांच्या कार्यकालाची तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.
- मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून मी तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून आता पुन्हा एकदा अध्यापनाच्या क्षेत्रात जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
- सुब्रमणियन यांनी 7 डिसेंबर 2018 रोजी पदभार घेतला होता.
- तर त्याआधी अरविंद सुब्रमणियन या पदावरून पायउतार झाले होते. त्यांच्यानंतरके. व्ही. सुब्रमणियन यांची निवड करण्यात आली होती.
Must Read (नक्की वाचा):
मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव यांना शांततेचे नोबेल :
- फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना 2021चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.
- तसेच मुक्त, स्वतंत्र, तथ्याधिष्ठित पत्रकारितेच्या रक्षणासाठी या दोघांनी सत्तेचा गैरवापर, खोटारडेपणा, युद्धखोरीजन्य प्रचार याविरोधात लढा दिला. अभिव्यक्ती आणि
- वृत्तपत्र स्वातंत्र्य, देशांमधील बंधुभाव, नि:शस्त्रीकरण याशिवाय चांगल्या जगाची निर्मिती होऊ शकत नाही.
- रेसा यांनी 2012 मध्ये रॅपलर हे वृत्तसंकेतस्थळ स्थापन केले असून अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्या वादग्रस्त राजवटीविरोधात, अमली पदार्थांच्या घातक वापराविरोधात मोठा लढा दिला आहे.
- समाजमाध्यमे कशा खोट्या बातम्या पसरवतात, विरोधकांचा छळ कसा होतो, सार्वजनिक पातळीवरील चर्चेला भलतीच दिशा दिली जाते यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
- मुरातोव हे रशियातील नोव्हाया गॅझेटा या वृत्तपत्राचे संस्थापक असून 1993 मध्ये त्यांनी ते स्थापन केले. नोव्हाया गॅझेटा हे निष्पक्ष वृत्तपत्र असून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर नेहमीच टीका केली आहे.
- वृत्तपत्राच्या तथ्याधिष्ठित व व्यावसायिक पत्रकारितेमुळे रशियन समाजाच्या उजेडात न आलेल्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला गेला आहे.
- शांततेचा नोबेल पुरस्कार 1.14 दशलक्ष डॉलर्सचा असून स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या इच्छेनुसार काही रक्कम या पुरस्कारासाठी ठेवली होती, त्यातून हे पुरस्कार देण्यात येतात.
‘एअर इंडिया’ला अखेर नवीन मालक मिळाला :
- तोटयात असलेल्या ‘एअर इंडिया’ला अखेर नवीन मालक मिळाला आहे.
- सरकारच्या मालकीची ही विमान कंपनी खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली बोली केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारली आहे.
- तर यासंदर्भातील माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील निर्गुतवणूक विभाग म्हणजेच ‘दिपम’चे सचिव असणाऱ्या तुहिन कांता पांडे यांनी दिली आहे.
- सरकारला या व्यवहारामधून 12 हजार 903 कोटींची अपेक्षा असताना टाटांनी 18 हजार कोटींना ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली असून कंपनीवरील सर्व कर्जही टाटाच फेडणार आहेत.
कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धात रिदम-विजय विजयी :
- रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू या भारतीय जोडीने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या खात्यावरील 23व्या पदकाची नोंद केली.
- रिदम-विजयवीर जोडीने अंतिम सामन्यात थायलंडच्या कॅनयाकॉर्न हिरूनफोइम आणि श्वॅकोन ट्रिनीफॅक्रोन जोडीवर 9-1 असा दिमाखदार विजय मिळवून भारताला 10वे सुवर्णपदक जिंकून दिले.
- तर याच प्रकारात तेजस्वनी आणि अनिश भानवाला जोडीने थायलंडच्या शॅविसा पॅडुका आणि रॅम खाम्हाइंग जोडीला 10-8 असे नमवून कांस्यपदक मिळवले.
- महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात प्रसिद्धी महत, निश्चल आणि आयुशी पॉडर या त्रिकुटाने रौप्यपदकाची कमाई केली. अं
भारताच्या पहिल्या वर्ल्डकप ट्रॉफीला मिळाली ‘इतकी’ किंमत :
- जगातील पहिले ऑगमेंटेड रिअलिटी क्रिकेट एनएफटी प्लॅटफॉर्म – क्रिकफ्लिक्स एनएफटीची भव्य सुरुवात झाली आहे.
- पहिल्या तासातच एकूण 1,85,00 डॉलर्स इतक्या किमतीच्या वस्तुंची विक्री करण्यात आली.
- तर यातूनच भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयाच्या ट्रॉफीची प्रतिकृती (1983) 1,10,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 82 लाख रुपयांना विकली गेली.
- याशिवाय कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील चेंडूचाही लाखो रुपयांना लिलाव झाला.
- 1983 च्या विश्वचषक ट्रॉफीची प्रतिकृती एहसान मोरावेझ नावाच्या व्यक्तीने खरेदी केली. ही ट्रॉफी चांदीची बनलेली होती आणि हिऱ्यांव्यतिरिक्त अनेक मौल्यवान रत्नेही त्याला जोडलेली होती.
- त्याचवेळी, मुरलीधरनच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील चेंडूला 40 हजार डॉलर्स इतकी किंमत मिळाली.
दिनविशेष:
- 9 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक पोस्ट दिन‘ आहे.
- बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1876 मध्ये झाला.
- ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
- युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून सन 1932 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.