9 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2021)
महिलांना ‘एनडीए’त सामावून घेण्याचा सशस्त्र दलांचा निर्णय :
- महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) सामावून घेण्याचा निर्णय सशस्त्र दलांनी घेतला असल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली.
- महिलांना एनडीएच्या मार्गाने संरक्षण दलांमध्ये कायमस्वरूपी कमिशन दिले जाईल असा निर्णय सशस्त्र दलांमध्ये, तसेच सरकारमध्ये सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला आहे.
- तर असे केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भारती यांनी न्या. एस.के. कौल व न्या. एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाला सांगितले.
- न्यायालयाने संरक्षण दलांना लिंग समानतेबाबत सक्रिय दृष्टिकोन बाळगण्याचे निर्देश देण्याऐवजी त्यांनी स्वत:च तसे केलेले आम्हाला आवडेल, असे न्यायालयाने सांगितले.
- पात्र व इच्छुक महिला उमेदवारांना प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत केवळ लिंगाच्या आधारावर प्रवेशापासून वंचित ठेवले जाते व यामुळे त्यांच्या समानतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होते, याकडे लक्ष वेधणारी याचिका अॅड. कुश कालरा यांनी केली असून, ती सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणीला आहे.
भारतीय वायू दलाला मिळणार नवी मालवाहू विमाने :
- भारतीय वायू दलाला आवश्यक असलेली मालवाहू विमाने मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
- 4 ते 10 टन पर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली एकूण 56 C – 295 मालवाहू विमाने घेण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
- तर सध्या भारतीय वायू दलात असलेल्या, जुन्या तंत्रज्ञानाच्या HS 748 Avro या मालवाहू विमानांची जागा C-295 ही मालवाहू विमाने घेतील. पॅराट्रुपर्स आणि सैन्य दलासाठी आवश्यक सामानाची वाहतूक करण्याकरता या मालवाहू विमानांचा उपयोग होणार आहे.
- एअरबस कंपनीची ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ आणि टाटाची ‘ टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड’ हे संयुक्तरित्या भारतात C – 295 या मालवाहू विमानांची निर्मिती करणार आहेत.
- तसेच यासाठी दोन्ही कंपन्या आणि भारतीय वायू दल असा तिघांमध्ये करार होणार आहे. हा एकूण करार सुमारे अडीच अब्ज डॉलर्स एवढा असणार आहे.
- एअरबस कंपनीनचे तंत्रज्ञान असलेली C -295 जातीची मालवाहू विमाने ही जगातील 15 देशांच्या वायू दलात 2001 पासून कार्यरत आहेत.
- तर 10 टन पर्यतचे वजन एका दमांत 2000 किलोमीटर पर्यंत वाहून नेण्याची या मालवाहू विमानांची क्षमता आहे.
- जगातील अत्याधुनिक अशा या मालवाहू विमानांच्या समावेशामुळे भारतीय वायू दलाच्या ताकदीत मोलाची भर पडणार आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी PLI योजना मंजूर :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
- तर या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्राला दिलासा दिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणाही केली आहे.
- तसेच वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) योजना जाहीर करण्यात आली आहे.
- 10 वेगवेगळ्या उत्पादनांसाठी 10683 कोटी रुपयांचे पॅकेज पुढील 5 वर्षांसाठी दिले जाईल.
- मुख्यत्वे गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा या राज्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
- वस्त्र मंत्रालयाने पीएलआय योजनेच्या प्रस्तावाला आधीच मान्यता दिली होती.
टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा :
- टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
- तर जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत संघाची घोषणा करण्यात आली आहे.
- तसेच विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे.
- सुर्यकुमार यादव, राहुल चहर, इशान किशन, वरुण चक्रवर्ती यांना वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
- तर श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील, असं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.
- भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टी 20 विश्वचषक संघाचा मार्गदर्शक असणार आहे.
दिनविशेष :
- 9 सप्टेंबर – हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन.
- 9 सप्टेंबर 1850 मध्ये कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे 31वे राज्य बनले.
- ताजिकिस्ता देश सोविएत 9 सप्टेंबर 1991 मध्ये युनियनपासून स्वतंत्र झाला.