9 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
9 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2022)
पंतप्रधानांच्या हस्ते ‘कर्तव्यपथ’चे उद्घाटन :
- राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या पूर्वी राजपथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गाचे कर्तव्य पथ असे नामकरण करण्यात आले. त्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात मोदी बोलत होते.
- नामांतरामुळे देशाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
- सुधारित मार्ग हा मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे.ज्यामध्ये नवे संसद भवन, नवीन सचिवालय, पंतप्रधानांचे निवासस्थान व कार्यालय आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान यांचा समावेश आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘इंडिया गेट’ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच पुतळय़ाचे अनावरण केले.
- हा पुतळा केंद्राच्या 13,450 कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे.
- काळय़ा रंगाच्या ग्रॅनाइटचा हा पुतळा 280 मेट्रिक टंन वजनाचा आहे. पुतळय़ासाठीचा ग्रॅनाइट तेलंगणातून दिल्लीला नेण्यात आला आणि दोन महिन्यांत पुतळा कोरण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):
भारत, चिनी सैन्याची ‘धोरणात्मक माघार’ :
- गेल्या दोन वर्षांपासून लडाख सीमेवर असलेला तणाव निवळत असून गोग्रा-हॉटस्प्रिंग भागात तळ टाकून बसलेल्या भारत आणि चीनच्या सैन्यांची ‘धोरणात्मक माघार’ सुरू झाली आहे.
- भारत आणि चीनच्या सैन्यदलांनी सादर केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली.
- 2020 मध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्यानंतर डोकलाममध्ये मोठी चकमक झडली होती.
- त्यानंतर लडाख सीमेवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. जुलै महिन्यात दोन्ही सैन्यदलांमध्ये कमांडर पातळीवर चर्चेची 16वी फेरी झाली होती.
- त्यात निश्चित झालेल्या धोरणानुसार पेट्रोिलग चौकी क्रमांक 15 (पीपी-15) येथील सैन्यांची माघार गुरुवारी सुरू झाल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
हाजी अली दर्गा परिसरात उभारला जाणार जगातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ :
- हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असून त्यावर भारताचा राष्ट्रध्वज लावण्यात येणार असल्याची माहिती हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी दिली आहे.
- या दर्ग्याचे नुतनीकरण सुरू असून ध्वजस्तंभ उभारणीचे कामही सुरू आहे.
- तसेच या राष्ट्रध्वजाच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करणार असल्याचंही ते म्हणाले.
भारताचा अफगाणिस्तानवर 101 धावांनी दणदणीत विजय :
- आशिया चषक स्पर्धेत सध्या सुपर-4 फेरीतील सामने सुरू आहेत.
- यूएईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा सामना अफगाणिस्तानशी आहे.
- याआधी भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधातील सलग दोन सामने गमावल्यामुळे अफगाणिस्तान बरोबरच भारताचेही आव्हान संपुष्टात आले आहे.
- त्यामुळे सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळवला जाणार आहे.
- दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनविशेष :
- 9 सप्टेंबर – हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन.
- 9 सप्टेंबर 1850 मध्ये कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे 31वे राज्य बनले.
- ताजिकिस्ता देश सोविएत 9 सप्टेंबर 1991 मध्ये युनियनपासून स्वतंत्र झाला.