आंतरराष्ट्रीय महिला वर्ष
आंतरराष्ट्रीय महिला वर्ष
- संयुक्तराष्ट्र संघटनेव्दारे केलेल्या घोषणेनुसार समानता, विकास आणि शांति नुसार 1975 मध्ये मेक्सिको येथे आयोजित केलेल्या महिला दशक कार्यक्रमानिमित्त 1985 मध्ये नैरोबी येथे संपन्न झाला.
- त्या नुसार 1985 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून पाळण्यात आले.
- या दशकात संयुक्तराष्ट्र संघटनेने सर्व देशांना महिलांच्या स्थितीवर अहवाल मागितला. या विषयी भारताने एक समिती स्थापन केली होती.
- या समितीने आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार भारताने नॅशनल प्लॅन ऑफ अॅक्शन फॉर वुमेन असा प्रारूप आराखडा बनविला त्यानंतर भारतात महिला सबलीकरणाची दिशा निश्चित झाली.
- या नंतर भारत सरकारने 2001 मध्ये राष्ट्रीय महिला सशक्तीकरण धारण जाहीर केले. त्याचबरोबर हेच वर्ष सशक्तीकरण म्हणून घोषित केले.
- या धोरणाचा मुख्य उद्देश, महिलांची प्रगती, विसकस आणि सशक्तीकरण आणि महिलांच्या बरोबर सातत्याने होणारा भेदभाव संपुष्टात आणूण जीवनाचे प्रत्येक क्षेत्र खुले करून त्यांचा सहभाग वाढविणे. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सशक्तीकरणाच्या उद्देशाने मार्च 2010 मध्ये राष्ट्रीय महिला सशक्तीकरण मिशन सुरू केले.
- या मिशनचा प्रमुख उद्देश भारतीय महिलांना प्रभावित करणारी क्षेत्र उदा, शिक्षण, गरीबी, आरोग्य, कायदाविषयक अधिकार, सामाजिक आर्थिक सशक्तीकरण इ. विकासामध्ये येणारे अडथळे दूर करणे.