जवाहरलाल रोजगार योजनेबद्दल संपूर्ण माहिती
जवाहरलाल रोजगार योजनेबद्दल संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
- 1 एप्रिल 1989 रोजी सुरू करण्यात आलेल्या जवाहर रोजगार योजनेत काही बदल करण्यात येऊन काही नवीन योजना सुरू करण्यात आल्या होत्या.
- या योजनेचे टप्पे पुढीलप्रमाणे-
जवाहरलाल रोजगार योजना (JRY) :
- सहाव्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेल्या पुढील 2 योजनांचे एकत्रित करून 1 एप्रिल 1989 रोजी जवाहरलाल रोजगार योजना सुरू करण्यात आली.
- नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम (NREP:2 ऑक्टोंबर 1983)
- रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्रॅम (RLEGP:15 ऑगस्ट 1983)
जवाहर ग्राम समृद्धि योजना (JGSY) :
- जवाहरलाल रोजगार योजनेची पुनर्रचना करून 1 एप्रिल 1999 रोजी तिच्या जागी जवाहरलाल ग्राम समृद्धि योजना सुरू करण्यात आली.
- या योजनेचा उद्देश –
- ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधांची निर्मिती होण्याबरोबरच जनतेला शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- ग्रामीण बेरोजगारीसाठी मुजूर रोजगारची संधी उपलब्ध करून देणे.
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना :
- जवाहर ग्राम समृद्धि योजना आणि आश्वासित रोजगार योजना (2 ऑक्टोंबर 1993) यांचे एकत्रिकरण करून 25 सप्टेंबर 2001 पासून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली.
- या योजनेचा उद्देश –
- वरील उद्देशांबरोबर ग्रामीण भागात अन्न सुरक्षा निर्मिती करणे.
- स्त्रिया, SCs/ST इत्यादींवर विशेष भर.
- योजनेचा वार्षिक प्रास्ताविक खर्च 10,000 कोटी रोपये असून त्यामध्ये 50 लाख टन अन्नधान्याचा समावेश आहे.
- योजनेच्या रोख पैशाच्या खर्चाची विभागणी केंद्र व राज्यसेवेमध्ये 75:25 या प्रमाणात केली जाईल.
- कामगारास किमान वेतन हे किमान 25 टक्के रोख स्वरुपात आणि किमान 5 किग्रॅ अन्नधान्याच्या स्वरुपात, अशा समिश्र स्वरुपात दिले जाईल.
- योजनेची अंमलबजावणी पंचायत राज व्यवस्थेच्या तिन्ही टप्प्यांवर केली जाईल. योजनेची वित्तीय संसाधने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत यांच्यामध्ये 20:30:50 या प्रमाणात विभागुण दिली जातील.
- संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना नुकत्यात 2 फेब्रुवारी 2006 पासून कार्यान्वित झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये वर्गीकृत केली जात आहे.
- 1 एप्रिल 2008 रोजी हे विलीनीकरण पूर्ण झाले.