सर्व शिक्षा अभियानाबद्दल संपूर्ण माहिती
सर्व शिक्षा अभियानाबद्दल संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
- सर्व शिक्षा अभियान हा केंद्र शासनाचा पथदर्शी कार्यक्रम असून प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय कालबद्ध पद्धतीने गाठण्यासाठी राज्यांच्या सहभागांने राबविण्यात येतो.
- शाळा नसलेल्या भागांमध्ये नवीन शाळा सुरू करणे आणि असलेल्या पद्धतीने गाठण्यासाठी राज्यांच्या सहभागाने राबविण्यात येतो.
- शाळा नसलेल्या भागांमध्ये नवीन शाळा सुरू करणे आणि असलेल्या शाळांत अतिरिक्त वर्गखोल्या, प्रसाधनगृहे, पेयजल, देखभाल अनुदान, इत्यादि बाबत तरतूद करून पायाभूत सुविधा मजबूत करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय आहे.
सर्व शिक्षा अभियानावर 2013-14 मध्ये रु 993.81 कोटी तर 2014-15 मध्ये डिसेंबर पर्यंत रु 480.57 कोटी खर्च झाला.
- विशेष गरज असलेल्या मुलांना सर्वसाधारण परिस्थितीत सर्वसाधारण मुलांसोबत चांगल्या दर्ज्याचे शिक्षण मिळावे व त्यांना सामाजिकदृष्ट्या सामावून घेण्यासाठी आणि त्यांच्या भावनिक उन्नतीसाठी राज्यात ‘विकलांग समावेशक शिक्षण’ कार्यक्रम राबविण्यात येते आहे.
- विकलांग समावेशक शिक्षण कार्यक्रमामध्ये विशेष गरज असलेल्या मुलांची वैधकीय तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार पुनर्वसन व ब्रेल लिपीतील पुस्तके, चष्मे, श्रवणयंत्रे आदि उपकरणे, वाचा प्रशिक्षक, इत्यादी शैक्षणिक आधार सुविधा पुरविणे यांचा समावेश आहे.
- सन 2013-14 मध्ये 3.42 लाख मुलांनी लाभ घेतला असून एकूण रु 66.02 कोटी खर्च झाला.
I am preparing for mpsc combine exams.