बालकांसाठी केंद्र शासनाचे पुरस्कार
बालकांसाठी केंद्र शासनाचे पुरस्कार
Must Read (नक्की वाचा):
राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार (Rajeev Gandhi Manav Seva Puraskar) :
- सन 1979 च्या आंतराष्ट्रीय बाल दिनाच्या निमित्ताने सदर पुरस्काराची सुरुवात झाली आहे.
- मुलांच्या कल्याणासाठी विशेषत: शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंगत्व असलेल्या मुलांच्या कल्याणासाठी कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानससेवा उदात्त भावनेतून सलग किमान 10 वर्ष वैशिष्ट्यपूर्ण व अव्दितिय काम करणार्या राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केंद्र शासनामार्फत दिला जातो.
- जिल्हा महिला व बाल विकास / आयुक्तालय / राज्य शासन यांच्या शिफारशीनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय निवड समिती स्थापन करण्यात आली असून समितीने निवड केलेल्या व्यक्तीस पुरस्कार दिला जातो.
- पुरस्काराचे स्वरूप रु 1,00,000/- रोख आणि प्रशस्तीपत्र असे असून दिल्ली येथे मा. मंत्री मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्याकडून पुरस्कार वितरित करण्यात येतात. प्राप्त प्रस्ताव राज्य शासनांमार्फत केंद्रशासनास सादर करण्यात येतात.
विशेष नैपुण्यासाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार (National Child Award for Exceptional Achievement):
- शिक्षण / कला / संस्कृतिक कार्य किंवा खेळामध्ये दाखविलेल्या विशेष नैपुण्यासाठी 4 ते 15 वयोगटातील मुलांना केंद्र शासनामार्फत सदर पुरस्कार दिला जातो.
- कोणतीही पंचायत/जिल्हा परिषद/म्युनिसिपल कॉपोरेशन/स्थानिक स्वराज्य संस्था/जिल्हाधिकारी/केंद्रशासनाचे कोणतेही विभाग/संसद सदस्य त्या क्षेत्रातील तज्ञ/विधानसभा/विधान परिषद सदस्य आणि नामवंत स्वयंसेवी संस्था/जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाच्या शिफारशीसह 31 जुलै पूर्वी केंद्र शासनास पाठविणे आवश्यक आहे.
पुरस्काराचे स्वरूप –
- प्रथम पुरस्कार रु 20,00/- रोख सुवर्ण पदक-1, स्मृतिचिन्ह व प्रणामपत्र.
- 35 पुरस्कार रु 10,000/- रोख चांदीचे पदक-1, स्मृतिचिन्ह व प्रणामपत्र.
- सदर पुरस्कार प्रतिवर्षी 14 नोव्हेंबर रोही घोषित करून दिल्ली येथे मा. मंत्री मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्याकडून वितरित करण्यात येतो.
मुलांच्याकरिता केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार (Scheme of National Awards for the best work done in Year in Cause of Children) :
- सन 1979 पासून सदर पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या 3 व्यक्ती तसेच पाच मान्यता प्राप्त संस्थांना सदर पुरस्कार दिला जातो.
- वेतनावर कार्य करणार्या व्यक्ति या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तसेच संस्थेमार्फत मुलांचे पुनर्वसन होणे जरुरीचे आहे.
- जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, आयुक्तालय, राज्य शासन यांच्या शिफारशीनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी समितीमार्फत फेरछाननी होऊन प्रस्ताव केंद्र शासनास सादर केले जातात.
- सदारचा पुरस्कार 14 नोव्हेंबर रोजी घोषित करण्यांत येऊन, मा. मंत्री मानवी संसंधान विकास मंत्रालय यांच्यामार्फत वितरित करण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरूप –
- व्यक्तीगत पुरस्कार रु 1,00,000/- व स्मृतिचिन्ह
- नामांकित संस्थेस रु 3,00,000/- व स्मृतिचिन्ह
- महिला व बाल विकास विभामार्फत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत मान्यताप्राप्त (अनुदानित/विनाअनुदानित) संस्थांमध्ये दाखल असलेल्या मुलांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्यास शासन निर्णय क्र. संकीर्ण -2011/प्र.क्र.209/का-3 दिनांक 16 जून, 2012 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचा उपयोग अनाथ मुलांना शैक्षणिक संस्था व्यवसाय प्रशिक्षण संस्था, रोजगार, नोकरी यामध्ये प्राधान्य मिळण्यासाठी होणार आहे.