Current Affairs (चालू घडामोडी) of 20 November 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ऑस्ट्रेलिया दौर्यातील पाच करार |
2. | वृंदावनातील नवीन मंदिर |
3. | तियानहे- 2 पहिल्या स्थानावर |
ऑस्ट्रेलिया दौर्यातील पाच करार:
1. सामाजिक सुरक्षा करार उद्देश: दोन्हीदेशांच्या जनतेला परस्पर संवाद.
लाभ: परदेशात स्थायिक झालेल्यांनाही समान न्याय. सामाजिक सुरक्षा पेन्शनचे लाभ देणार.
2. पोलिस यंत्रणेत सहकार्य उद्देश: मादकपदार्थाची तस्करी काळ्या पैशाला अटकाव.
लाभ: तस्करीबाबात पूर्व सूचना मिळेल, दोषींची संपत्ती जप्त करता येईल.
3. पर्यटन उद्देश: पर्यटनधोरण, माहिती, टुर्स- ट्रव्हल एजन्सीना प्रोत्साहन देणे.
लाभ: होटेलिंग क्षेत्रात गुंतवणूक.
4. कला सांस्कृतिक सहकार्य उद्देश: 1971 च्या करारा नुसार दोन्ही देशांत सांस्कृतिक संबंध दृढ कराने.
लाभ: व्यवसायिकतत्ज्ञ, परीक्षण, प्रदर्शनात सहकार्य.
5. कैद्यांची देवाण – घेवाण उद्देश: विधिन्याय प्रशासनात सहकार्याचा प्रयत्न.
लाभ: दुसर्या देशात शिक्षा भोगणार्या कैद्यांना आपल्या देशात परत आणणे सोपे.
वृंदावनतील नवीन मंदिर:
- वृंदावण मध्ये कृष्णाचे जगातील सर्वात उंच मंदिर उभे राहणार आहे.
- मंदिराचे भूमिपूजन राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
- मंदिराचे नाव ‘वृंदावण चंद्रोदय मंदिर’ या नावाने हे मंदिर उभारले जाणार आहे.
- मंदिराची ऊंची 210 मी. असून त्यासाठी 300 कोटी रुपये खर्च येणार आहे.
- मंदिराचे काम ‘एस्कौन’ तर्फे केले जाणार आहे.
तियानहे- 2 पहिल्या स्थानावर:
- अमेरिकेतून जाहीर होणार्या पहिल्या पाचशे महासंगणकाच्या यादीत चीनचा तियानहे- 2 हा संगनक पहिल्या स्थानावर.