Current Affairs of 22 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2015)

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2015)

अमिताभ बच्चन यांचा उत्तर प्रदेश सरकारने दिलेले रक्कम परत करण्याचा निर्णय :

  • यश भारती पुरस्कारार्थींना उत्तर प्रदेश सरकारने दिलेले 50 हजार रुपयांचे मासिक वेतनाची रक्कम गरिबांसाठी वापरण्यात यावी यासाठी ते परत करण्याचा निर्णयAmitabh Bachchan अमिताभ बच्चन यांनी घेतला आहे.
  • यश भारती पुरस्कार देण्यात आलेल्या व्यक्तींना मासिक 50 हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला होता.
  • उत्तर प्रदेशशी संबंधित कर्तृत्ववान व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
  • उत्तरप्रदेश सरकारने 1994 पासून हा पुरस्कार सुरु केला असून आत्तापर्यंत 150 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि जया बच्चन या तिघांचाही समावेश आहे.
  • पुरस्कारार्थींना 50 हजार रुपये मासिक वेतन देण्याची घोषणा सरकारने केली होती.

शासकीय ओळखपत्राचा आधार घेण्याची फेसबुककडे मागणी :

  • फेसबुकवरील आक्षेपार्ह प्रतिक्रियांपासून मुक्तता मिळवून नवा बदल घडविण्यासाठी तसेच “चांगल्या फेसबुक”साठी केरळमधील आठ महिला मोहिम राबवित असूनfacebook फेसबुकवरील प्रोफाईलची सतत्या पडताळण्याची शासकीय ओळखपत्राचा आधार घेण्याची मागणी त्यांनी फेसबुककडे केली आहे.
  • विशेष म्हणजे त्यांच्या मोहिमेला जगभरातील 75 पेक्षा अधिक आंतराष्ट्रीय ऑनलाईन संघटनांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.
  • त्यामुळेच अशाप्रकारे त्रस्त झालेल्या आठ महिलांनी मिळून चांगल्या फेसबुकसाठी मोहिम राबविली आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा :

  • राज्य सरकारने 2013-13 आणि 2013-14 या दोन वर्षांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा केली.
  • त्यानुसार 2012-13 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार पुण्याच्या रमेश विपट यांना जाहीर झाला असून 2013-14 च्या राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी लातूरच्या गणपतराव माने यांची निवड झाली आहे.
  • मुंबईच्या पल्लवी वर्तक यांना 2012-13 सालचा तर पुण्याच्या उमेश झिरपे यांना 2013-14 सालासाठी साहसी क्रीडाकरीता शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला.
  • तसेच 2012-13 च्या एकलव्य पुरस्कारासाठी (अपंग खेळाडू) नागपूरच्या रोशनी रिनके आणि पुण्याच्या अमोल बोरीवाले यांची निवड झाली.
  • 2012-13 सालचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार वर्धाच्या डॉ. नंदिनी बोंगडे यांना जाहीर झाला आहे.

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी कश्यप फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत :

  • भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी कश्यप यांनी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक मारली आहे.

    Sayana Nehaval

  • महिला एकेरीमध्ये सायनाने कॅनडाच्या मिचेल ली हीचा 21-18, 21-13 अश्या सरळ सेट मध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत कूच केली.
  • तर पी कश्यपने पुरुष एकेरी मध्ये थॉमस रॉक्सेल याचा 21-11, 22-20 असा फराभव केला.
  • ऑलेम्पिक बाँज पदक विजेती सायना नेहवालला जर्मनीच्या स्नॅशे आणि जपानच्या मिनास्तू मिूतानी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
  • तसेच कॉमनवेल्थ पदक विजेता पी कश्यपचा सामना थायलंडचा तानोग्स्क आणि इंग्लडचा राजिव यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

‘मन की बात’ मालिकेतील पुढील भाग प्रसारित करण्यास निवडणूक आयोगाने मान्यता :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ मालिकेतील पुढील भाग प्रसारित करण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

    Narendra Modi

  • मात्र रविवारी प्रसारित होणाऱ्या या भागांतून बिहारमधील मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही वक्तव्य त्यामध्ये असू नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
  • सरकारने आयोगाशी संपर्क साधून 25 ऑक्टोबर रोजी ‘मन की बा’’चा पुढील भाग प्रसारित करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी केली.
  • ती आयोगाने मान्य केली. सरकारने ‘मन की बात’साठी आयोगाशी संपर्क साधण्याची ही दुसरी वेळ आहे.

हबल दुर्बिणीच्या माहितीआधारे संशोधन :

  • विश्वात पृथ्वीसारखे 92 टक्के ग्रह अजून जन्माला यायचे आहेत, असे नवीन संशोधनात दिसून येत आहे.
  • आपली सौरमाला 4.6 अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आली.
  • त्यानंतर वसाहतयोग्य असे केवळ आठ टक्के ग्रह तयार झाले आहेत.
  • पृथ्वीसारखे वसाहतयोग्य मानले जाणारे 92 टक्के ग्रह अजून जन्माला यायचे आहेत, असे नासाच्या हबल अवकाश दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणाआधारे सांगण्यात आले.
  • त्यात ग्रहांचा शोध घेणाऱ्या केप्लर अवकाश दुर्बिणीने दिलेल्या माहितीचाही समावेश आहे.
  • या दुर्बिणीने जी माहिती दिली त्यानुसार विश्वात 10 अब्ज वर्षांपूर्वी ताऱ्यांची निर्मिती वेगाने झाली पण विश्वातील फार कमी हायड्रोजन व हेलियम त्यात वापरला गेला.
  • आज ताऱ्यांची निर्मिती कमी वेगाने होत आहे पण विश्वनिर्मिती नंतर जी तारका निर्मिती झाली त्यावेळचा वायू अजून शिल्लक आहे.
  • त्यातून तारे व ग्रह आगामी काळात तयार होतील.
  • तसेच आकाशगंगेत पृथ्वीच्या आकाराचे किमान एक अब्ज ग्रह असू शकतात. ते खडकाळ स्वरूपात आहेत.
  • आतापासून 100 ट्रिलीयन वर्षांपर्यंत अखेरचा तारा जळण्याची शक्यता नाही त्यामुळे ग्रहांची निर्मिती होण्यास खूप अवधी आहे.

अहमद मोहम्मद लवकरच शिक्षणासाठी कतारला स्थलांतरित होणार :

  • क्लॉक बॉम्ब बनविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे चर्चेत आलेला अहमद मोहम्मद लवकरच शिक्षणासाठी कतारला स्थलांतरित होणार आहे.
  • अहमदने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अहमद कतारला निघून जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
  • काही दिवसांपूर्वी ट्विटरवर हातात बेड्या घातलेल्या अहमदचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते.
  • अहमदच्या उच्च माध्यमिक आणि पदवीपूर्व शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाल्याने त्याने कतारला जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्याच्या वडिलांनी डल्लास मॉर्निंग न्यूज या वृत्तपत्राला सांगितले.

दिनविशेष :

  • 1873 : स्वामी रामतीर्थ या साक्षात्कारी तत्वज्ञाचा जन्म.

    Dinvishesh

  • 1929 : भारतीय टपाल खात्याने हवाई टपालासाठी वेगळी तिकिटे छापली
  • 1938 : कार्लसनचे पहिले झेरॉक्स यंत्र तयार झाले.
  • 1963 : भाक्रा-नांगल धरण राष्ट्रार्पण.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.