Current Affairs (चालू घडामोडी) of 1 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | 1 डिसेंबर WORLD AIDS दिवस म्हणून साजरा |
2. | नो-इबोला प्रमाणपत्र आवश्यक |
3. | बीएमडब्ल्यु नवी दिल्लीत सादर |
4. | दहा रूपयाच्या आता प्लॅस्टिकच्या नोटा |
5. | चेंडू लागून पुन्हा एक बळी |
1 डिसेंबर WORLD AIDS दिवस म्हणून साजरा :
- या मोहिमेत समुपदेशनाबरोबर चाचणी, उपचार, जागृती, आणि जीवनशैली निगडीत सुविधा देण्यावर भर देणे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.
- समाजातील विविध स्तर आणि घटकांमध्ये विशेष मोहीम राबवली जाते, कारण सान 2030 पर्यंत महाराष्ट्र राज्य एडसमुक्त करण्याचे ध्येय आहे.
- राज्यभारत एचआयव्ही बधितांना बीपीएल कार्ड देणे, त्यांच्यासाठी समुपदेशन आणि संमेलण घेणे, तसेच संजय गांधी निराधार योजनेशी त्यांना जोडणे.
- महाराष्ट्र राज्य एडसमुक्त करण्यासाठी राज्यभरात “विहान प्रकल्प” राबवण्यात येणार आहे.
नो-इबोला प्रमाणपत्र आवश्यक :
- ईबोलाच्या विषाणूंचा देशातील प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने ही उपाययोजना आखली आहे.
- ईबोलाग्रस्त देशांतून भारतात येणार्या प्रवाशांना आता “नो-इबोला प्रमाणपत्र” बाळगणे आवश्यक आहे.
- ईबोलाचा उपचार झालेले पण ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल त्यांनी नव्वद दिवस प्रवास करू नये असा सल्ला सरकारने दिला आहे.
- कंपनीचा राजदूत (Brand Ambassador)क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर उपस्थित होता.
- पूर्णत: भारतीय बनावटीची पहिली आलिशान सेदान श्रेणीतील कार मूळच्या जर्मनीच्या बीएमडब्ल्यु नवी दिल्लीत सादर केली.
दहा रूपयाच्या आता प्लॅस्टिकच्या नोटा :
- आता दहा रुपये मुल्याच्या एक अब्ज प्लॅस्टिक नोटा देशातील पाच शहरामध्ये चलनात येणार आहे.
- कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला, आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये या नोटा चलनात येणार आहेत.
- हा प्रयोग अशस्वी झाल्यास संपूर्ण देशात दहा रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटा अस्तित्वात येणार आहे. मात्र, सध्या चलनात असलेल्या कागदी नोटांचा वापरही पूर्वीप्रमाणे सुरू राहील.
- बनावट नोटांचा सुळसुळाट रोखणे आणि नोटांचे आयुष्य वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
चेंडू लागून पुन्हा एक बळी :
- इस्त्रायलच्या अशदोद शहरातील एका सामन्यात पंचाचे काम करणार्या 55 वर्षीय हिलेल ऑस्कर यांचा चेंडू लागून मृत्यू झाला आहे.
- 1 डिसेंबर – जागतिक AIDS दिवस.
- 1963 नागालँड भारताचे 16वे घटकराज्य बनले.