वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
Must Read (नक्की वाचा):
उद्देश विभाग (उद्देशांग) | विधेय विभाग (विधेयांग) |
1) उद्देश (कर्ता) | 1) कर्म व कर्म विस्तार |
2) उद्देश विस्तार | 2) विधानपूरक |
3) विधेय विस्तार | |
4) विधेय (क्रियापद) |
1 ) उद्देश (कर्ता)
वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता येते.
उदा.
- रामुचा शर्ट फाटला. (फाटणारे काय/कोण?)
- रामरावांचा कुत्रा मेला. (मरणारे कोण/काय?)
- मोगल साम्राज्याचा अंत झाला. (होणारे-कोण/काय?)
- रामुच्या घराचा दरवाजा उघडला. (उघडणारे कोण/काय?)
वरील वाक्यात शर्ट, कुत्रा, अंत, दरवाजा हे उद्देश (कर्ता) आहेत.
2) उद्देश विस्तार
कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर अशा शब्दांना उद्देश विस्तारात लिहावे.
उदा.
- शेजारचा रामु धपकन पडला.
- नियमित अभ्यास करणारे विधार्थी पास होतात.
वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते.
उदा.
- रामने झडाचा पेरु तोडला. (या वाक्यात तोडण्याची क्रिया पेरु वर झाली म्हणून ते कर्म).
- गवळ्याने म्हशीची धार काढली. (या वाक्यात काढण्याची क्रिया धारेवर झाली म्हणून ते कर्म).
1) कर्म विस्तार
कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म विस्तार’ होय.
उदा.
- रामने झाडाचा पेरु तोडला.
- गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली.
2) विधान पूरक
कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर ते ‘विधानपूरक’ असते.
उदा.
- राम राजा झाला.
- संदीप शिक्षक आहे.
- शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
वरील वाक्यावरुन राजा, शिक्षक, मोहक ही शब्द कर्त्याविषयी अधिक महितीसांगत आहेत म्हणून त्यांना ‘विधानपूरक’ असे म्हणतात.
3) विधेय विस्तार
- क्रियापदास विधेय असे म्हणतात.
- वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्या शब्दांचा यात समावेश होतो.
- क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास ‘विधेय विस्तार’ उत्तर येते.
- ही सर्व क्रियाविशेषणे असतात.
उदा.
- कुटुंबातील सर्व व्यक्ती रविवारी वनभोजनास गेले.
- शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
- माझा जिवलग मित्र मनीष माझे पत्र पाहताच त्वरित आला.
4) विधेय/क्रियापद
वाक्यातील क्रियापदाला ‘विधेय’ असे म्हणतात.
उदा.
- रमेश खेळतो.
- रमेश अभ्यास करतो.
- रमेश चित्र काढतो.