Current Affairs of 17 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 नोव्हेंबर 2015)

चालू घडामोडी (17 नोव्हेंबर 2015)

शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या समाधिस्थळी स्मारकाची घोषणा :

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला तीन वर्षे होत आहेत मात्र त्यांच्या स्मारकाचा निर्णय अद्याप झाला नसल्यामुळे “साहेबांचे स्मारक कधी” असा प्रश्‍न ते करीत Balasaheb Thakareआहेत.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या समाधिस्थळी स्मारकाची घोषणा करण्याची शक्‍यता आहे.
  • शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने महापौर निवास तसेच त्यामागील महापालिकेने भाडेपट्ट्यावर दिलेल्या भूखंडाची शिफारस केली होती.

सय्यद अकबरुद्दीन यांची यूएन कायमस्वरूपी सदस्य म्हणून नियुक्ती :

  • परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांची भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील (यूएन) कायमस्वरूपी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून अकबरुद्दीन यांच्या कामगिरीची प्रशंसा झाली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकबरुद्दीन यांची निवड केली आहे.
  • पुढील वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अशोक पंडित यांच्याकडून अकबरुद्दीन सूत्रे स्वीकारतील.
  • संयुक्त राष्ट्रसंघाने आता 70व्या वर्षांत पदार्पण केले आहे.
  • यानिमित्ताने सर्व 193 देशांशी चर्चा करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल घडविणे आणि सुरक्षा समितीतील कायमस्वरूपी सदस्यांची संख्या वाढविणे हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
  • सुरक्षा समितीतील कायमस्वरूपी स्थानासाठी भारत प्रयत्नशील आहे.
  • त्यामुळे या महत्त्वाच्या काळामध्ये अकबरुद्दीन यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांची स्वदेशी मॅगी बाजारात :

  • नेस्लेच्या मॅगीवर अद्याप काही राज्यात बंदी असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांची स्वदेशी मॅगी आज बाजारात आली आहे.
  • ही मॅगी शुद्ध असून, ती आरोग्यास घातक नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
  • स्वदेशी मॅगीच्या विक्रीचा प्रारंभ बाबा रामदेव यांच्या हस्ते आज झाला.
  • स्वदेशी मॅगीवर “झटपट बनाओ, बेफिकीर खाओ“ची टॅगलाइन आहे.
  • 70 ग्रॅमच्या या मॅगीच्या पुड्याची किंमत पाच रुपये असून, किरकोळ बाजारासह सर्व मॉल्समध्ये ती उपलब्ध असेल.

एनएससीएन-के संघटना केंद्राने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर :

  • नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड-खापलांग (एनएससीएन-के) या संघटनेला केंद्राने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.
  • मणिपूरमधील 18 जवानांच्या हत्येमागे या संघटनेचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते.
  • अवैध कारवाया (नियंत्रण) कायदा 1967 नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.
  • त्यानुसार “एनएससीएन-के” व त्याच्या अखत्यारीतील सर्व संघटनांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली.
  • “एनएससीएन-के”ने 2001मध्ये शांतता व शस्त्रसंधी करारावर स्वाक्षरी केली होती.
  • त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये ते या शस्त्रसंधी करारापासून एकतर्फी मागे हटले.
  • त्यांनी भारत – बांगलादेश सीमेवरील भागात परेश बरुआच्या नेतृत्वाखालील नक्षलवाद्यांना आश्रय देण्यास सुरवात केली होती.
  • तसेच आय. के. सोंगबिजित याच्या नेतृत्वाखालील “एनडीएफबी” या गटालाही सहकार्य करणे सुरू केले होते.
  • याशिवाय मणिपूरमधील पीपल्स लिबरेशन आर्मीही त्यांनी शस्त्रे पुरवल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन :

  • “शतरंज के खिलाडी”, “राम तेरी गंगा मैली”, “गांधी‘, “मासूम” आदी हिंदी चित्रपटांबरोबरच इंग्रजी चित्रपट आणि रंगभूमीवर विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे लंडनमध्ये निधन झाले.
  • ते 86 वर्षांचे होते.
  • सईद जाफरी यांचा जन्म 9 जानेवारी 1929 रोजी पंजाबमध्ये झाला होता.

मिशेल जॉन्सन याची क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा :

  • ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.
  • न्यूझीलंडविरुद्ध पर्थमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीनंतर तो निवृत्त होणार आहे.
  • ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्क, ब्रॅड हॅडीन, रायन हॅरीस, ख्रिस रॉजर्स आणि शेन वॉट्सन यांनी नुकतीच ऍशेस मालिकेनंतर निवृत्ती घेतली होती.
  • ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जॉन्सनचा चौथा क्रमांक लागतो.
  • त्याने 311 बळी घेतले असून, त्याच्यापेक्षा जास्त शेन वॉर्न (708), ग्लेन मॅकग्रा (563) व डेनिस लिली (355) यांनी जास्त मिळविलेले आहेत.
  • जॉन्सनने 73 कसोटीत 311 बळी घेतला आहेत. तर, 153 वनडेमध्ये 239 विकेट घेतल्या आहेत.

आदिवासींसाठी कुपोषण निर्मूलनाची योजना :

  • आदिवासी भागांतील वाढते कुपोषण रोखण्यासाठी मातांना एकवेळचा पोषक आहार देण्यासाठी सरकारने अवघ्या बावीस रुपयांची तरतूद केली आहे.
  • राज्यातील आदिवासी भागांतील कुपोषण, बालमृत्यू आणि कमी वजनाच्या बालकांचा जन्म या समस्या फारच गंभीर आहेत.
  • यावर मात करण्याच्या उद्देशाने 3 नोव्हेंबर 2015 च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • कुपोषण निर्मूलनाची तुटपुंजी तरतूद असणाऱ्या या योजनेस नाव मात्र, माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे देण्यात आले आहे.
  • हीयोजना राज्यातील 16 आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील 85 एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
  • ही योजना राज्यातील अंगणवाड्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
  • जेवण बनविण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना महिन्याला प्रति माता 250 रुपये मानधनाची तरतूद या योजनेत आहे.
  • डॉ. अब्दुल कलाम अमृत योजनेच्या माध्यमातून बाळंतपणाच्या अगोदरचे तीन आणि नंतरचे तीन महिने आदिवासी मातांना दररोज एकवेळचा चौरस आहार देण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारच्या टीएचआर योजनेचा निधीदेखील या योजनेत वळविण्यात येणार आहे.
  • या एकवेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती किंवा भाकर, कडधान्ये-डाळी, सोया दूध, शेंगदाणा लाडू, साखर-गूळ, नाचणीचा हलवा, अंडी, केळी, फळे, पालेभाज्या, खाद्यतेल, आयोडीनयुक्त मीठ आणि मसाला या घटकांचा समावेश असणार आहे.

12वी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार :

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
  • विद्यार्थ्यांना 20 नोव्हेंबर रोजी गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
  • www.mahresult.nic.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
  • या ठिकाणी विषयनिहाय गुण उपलब्ध होणार आहेत.
  • विद्यार्थ्यांना 20 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता महाविद्यालयात गुणपत्रिका देण्यात येणार आहेत.
  • विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असल्यास त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत संबंधित विभागाकडे अर्ज करावा लागेल.
  • मंडळाने हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. पुणे मंडळ 02065292317 आणि मुंबई मंडळ  02227893756, 27881075 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

नेपाळ फुटबॉल संघाचे प्रमुख गणेश थापा 10 वर्षांसाठी निलंबित :

  • लाच घेतल्याप्रकरणी नेपाळ फुटबॉल संघाचे प्रमुख गणेश थापा यांना ‘फिफा’ने तब्बल 10 वर्षांसाठी निलंबित केले आहे.
  • त्याचवेळी लाओस संघाचे अध्यक्ष विफेट सिचाकर यांच्यावरही दोन वर्षांची बंदी आणली आहे.
  • थापा यांनी आपल्या 19 वर्षांच्या कार्यकाळामध्ये लाखो डॉलरची कमाई केल्याचा आरोप आहे.

भाषा आकलनावर नवा प्रकाश :

  • मेंदूत जसे न्यूरॉन्सचे जाळे असते तसे कृत्रिम न्यूरॉन्सचे जाळे तयार करून त्याच्या माध्यमातून मानवी भाषेने संवाद साधणारे बोधनात्मक प्रारूप तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.
  • हे प्रारूप इटलीतील सासारी विद्यापीठ व ब्रिटनमधील प्लायमाऊथ या विद्यापीठांनी तयार केले असून त्याचे नाव ‘अ‍ॅनाबेल’ ( आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क विथ अ‍ॅडाप्टिव्ह बिहेवियर एक्सप्लॉइटेड फॉर लँग्वेज लर्निग )असे आहे.
  • हे कृत्रिम न्यूरॉन्सचे जाळे भाषा शिकू शकते व त्यात माणूस त्याला ती भाषा शिकवणारा मध्यस्थ असतो.
  • माणसाला भाषेचे आकलन कसे होते त्यावर या संशोधनामुळे प्रकाश पडणार आहे.
  • आपला मेंदू गुंतागुंतीची बोधनात्मक कार्ये कशी पार पाडतो हे समजण्यात अजून यश आलेले नाही.
  • भाषा व तर्क यांचाही मानवी मेंदूच्या दृष्टिकोनातून उलगडा यात होणार आहे.
  • माणसाच्या मेंदूत शेकडो न्यूरॉन्स असतात व ते विद्युत संदेशाने एकमेकांशी संपर्क साधत असतात.
  • ‘प्लॉस वन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

दिनविशेष :

  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.Dinvishesh
  • 1932 : कॉंग्रेसने बहिष्कार घातलेल्या तिसर्‍या गोलमेज परुषदेची सुरुवात.
  • 2012  : बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संपादक यांचा मृत्यू.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.