26 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

एमएच-60 रोमियो
एमएच-60 रोमियो

26 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 फेब्रुवरी 2020)

आपाचे आणि एमएच 60 रोमियो वाढवणार भारतीय सैन्यदलाचं बळ :

  • अमेरिकेसोबतच्या 3 अब्ज डॉलर्सच्या सुरक्षा करारावरील सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
  • तर या करारांतर्गत भारताला अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसहित आपाचे आणि एमएच-60 रोमियो हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सदेखील मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली.
  • तसेच नव्या शस्त्रास्त्रांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या खरेदीनंतर भारताचं बळ वाढणार आहे.
  • भारत आणि अमेरिकेदरम्यान असलेले चांगले संबंध हे दोन्ही देशांच्या सरकारमधील नाही तर दोन्ही देशांच्या नागरिकांमधील आहेत, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
  • तर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी उत्तम प्रयत्न केले आहेत. आज आम्ही संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि व्यापार यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

भारताच्या वैभवचा अव्वल मानांकित :

  • मॉस्कोत सुरू असलेल्या एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅँडमास्टर वैभव सुरीने सहाव्या फेरीत अव्वल मानांकित रशियाच्या व्लाडिस्लाव आर्टेमिएवला पराभवाचा धक्का दिला.
  • वैभवने 71 चालींमध्ये हा विजय मिळवला. या विजयामुळे 23 वर्षीय वैभवला स्पर्धेत चार गुणांसह संयुक्तपणे तिसरे स्थान मिळाले.
  • तर अझरबैजानच्या राउफ मेमेडोवने आर्मेनियाच्या मॅन्युअल पेट्रोसिनविरुद्ध बरोबरी राखली. त्यामुळे मेमेडोव पाच गुणांसह अग्रस्थानी आहे.
  • तसेच रशियाच्या सनन सुगिरोवने त्याच्याच देशाच्या वादिम झ्वागिन्सेवला नमवत 4.5 गुणांसह दुसरे स्थान राखले.
    भारताच्या वैभव सुरीसोबत भरत सुब्रम्हण्यम, बी. अधिबान, अरविंद चिथमबरम, अर्जुन एरिगायसी यांचे प्रत्येकी चार गुण आहेत. अधिबान, सुब्रम्हण्यम, चिथमबरम, कार्तिकेयन मुरली यांच्या लढती बरोबरीत सुटल्या. आर. प्रागनंधाने सर्जी ग्रिगोरियांट्सविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला.

‘भारतीय रेल्वेचा ‘सुरक्षा’ विक्रम :

  • भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेचा नवीन विक्रम स्थापन केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत, गेल्या 11 महिन्यात एकही अपघान न झाल्याची नोंद भारतीय रेल्वे करण्यात आली आहे.
  • तसेच 1 एप्रिल 2019 ते 24 फेब्रुवारी 2020 या अकरा महिन्यांच्या कालावधीत रेल्वेचा एकही अपघात झाला नाही. तसेच महत्वाच्या रेल्वे स्थानकावर, किंवा रेल्वे अपघातामध्ये एकाही नागरिकाचा मृत्यू न झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
  • तर भारतीय रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात हा नवीन विक्रम नोंद करण्यात आला आहे. सन 1853 पासून गेल्या 166 वर्षात प्रथमच रेल्वे विभागानं हे महत्वपूर्ण योगदान दिलं आहे.
  • भारतीय रेल्वे विभागाच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची महत्वपूर्ण काळजी घेण्यात आली. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेलाच प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार, रेल्वे ट्रॅकची देखभाल, रेल्वे ट्रॅकचे आधुनिकीकरण सिग्नल सिस्टीममधील आधुनिक तांत्रिक बदल, सुरक्षिततेसाठी आधुनिक बदलांचा वापर, माडर्न आणि सुरक्षित एलबीएच कोचचा उपयोग. क्रॉसिंग गेट, ब्रॉड गेजमध्येही करण्यात आलेले तांत्रिक बदल आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेतलेले निर्णय महत्वाचे ठरले आहेत.

विद्यापीठाच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी रतन टाटा यांची सल्लागार परिषदेवर नियुक्ती :

  • रतन टाटा यांच्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आणि आणि शैक्षणिक, औद्योगिक कार्यक्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अनुभव आता मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
  • तसेच विद्यापीठात संशोधन व विकासविषयक धोरणे व कृती योजना याबाबत लवकरच शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्याकडून कार्यवाही होणार आहे.
  • कारण मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर रतन टाटा आणि अनिल काकोडकर यांची राज्यपालांकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या नियमानुसार ही नियुक्ती केली असून महाराष्ट्र सरकारच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे.
  • उपायात्मक नियोजनासंबंधी विद्यापीठाला सल्ला देऊन विद्यापीठाच्या विकासासाठी विशेष काम हाती घेण्याचा पूर्ण अधिकार सल्लागार समितीच्या अध्यक्षास असतो.
  • त्यामुळे सल्लागार परिषदेवर अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्या नामनिर्देशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • तसेच शिक्षण, संशोधन आणि विकास, प्रशासन यासंबंधीचे अहवाल कृती योजना सादर करून त्याद्वारे कुलगुरूंना सल्ला देणे, वित्तीय साधनसंपत्ती व सुशासन निर्माण करणे, जेणेकरून विद्यापीठ शैक्षणिकदृष्ट्या सशक्त, प्रशासनिकदृष्ट्या कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम व्यवस्था निर्माण करणे, यासाठी विद्यापीठाची सल्लागार परिषद काम करणार आहे.

ईशान्य दिल्लीत कलम 144 लागू :

  • ईशान्य दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
  • तर 144 हे जमावबंदीचं कलम असून पुढच्या महिन्याभरासाठी ईशान्य दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
  • ईशान्य दिल्लीत CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर आजही हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. दोन गटांमध्ये जोरदार दगडफेकही झाली.
  • तसेच त्यानंतर कलम 144 अर्थात जमावबंदीचं कलम दिल्लीमध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिन्याभरासाठी ही जमावबंदी असणार आहे.

दिनविशेष:

  • प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1874 मध्ये झाला.
  • वि.स. खांडेकर यांना 1976 यावर्षी ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाला.
  • सन 1984 मध्ये इन्सॅट-1-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
  • परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने 26 फेब्रुवारी 1998 रोजी एका दिवसात 14.709 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.