Current Affairs (चालू घडामोडी) of 22 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | युजीसीच्या शिष्यवृतींमध्ये वाढ |
2. | राजिंदर खन्ना ‘रॉ’ चे प्रमुख |
3. | रिचर्ड वर्मा अमेरिकेचे भारतातील राजदूत |
युजीसीच्या शिष्यवृतींमध्ये वाढ :
- विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षण घेणार्या विद्यर्थ्यांना देण्यात येणार्या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या जवळपास 50% वाढ केली आहे.
- डिसेंबर पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
- याचा फायदा उच्च शिक्षण घेणार्या गुणवंत तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे.
राजिंदर खन्ना ‘रॉ’ चे प्रमुख :
- भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या प्रमुखपदी विभागाचे विशेष सचिव राजिंदर खन्ना यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली.
- केंद्रीय गृहमंत्रालय विशेष सचिव म्हणून कार्यरत असलेल्या प्रकाश मिश्रा यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे.
- ‘रॉ’ अर्थात रिसर्च अँड अॅनालिसिस विंग ही भारताची देशाबाहेरील गोपनीय माहिती गोळा करणारी संस्था असून सीआरपीएफ हे जगातील सर्वात मोठे निमलष्करी दल आहे.
- सीआरपीएफकडे सुमारे तीन लाख जवान आहेत.
रिचर्ड वर्मा अमेरिकेचे भारतातील राजदूत :
- भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक रिचर्ड राहुल वर्मा यांनी शनिवारी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ घेतली.
- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी वर्मा यांना शपथ दिली.