Current Affairs (चालू घडामोडी) of 23 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | सचिन तेंडुलकर विश्वचषकाचा ब्रॅंड अम्बॅसिडर |
2. | विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे |
3. | ‘भारतीय अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण करण्याचे श्रेय मोदींना’ |
4. | राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द |
5. | शुक्र ग्रहावरील वस्तीसाठी नासा प्रयत्नशील |
6. | वाजपेयींचा जन्मदिनी होणार गुड गव्हर्नन्स डे |
7. | ‘सीआरपीएफ’ च्या प्रमुखपदी प्रकाश मिश्रा |
8. | बॉम्बे हायकोर्टाचे नामकरण करा |
9. | दिनविशेष |
सचिन तेंडुलकर विश्वचषकाचा ब्रॅंड अम्बॅसिडर :
- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आगामी क्रिकेट विश्वचषक 2015 साठी ब्रॅंड अम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आली.
- 14 फेब्रुवारी पासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरित्या सुरू होणार्या विश्वचषक स्पर्धेत साची प्रमोशन करतांना दिसेल.
- सचिनची या पदावर 2011 साली निवड झाली होती.
- ब्रॅंड अम्बॅसिडर धुरा अतिशय खुबीने वठवल्यानंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देखील सचिनचीच पुन्हा निवड करण्यास आयसीसीने प्राधान्य दिले.
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे :
- विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी सोमवारी राष्ट्रीय कोंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली.
- शिवाजीराव देशमुख यांनी मुंडे यांच्या नावाची घोषणा केली.
‘भारतीय अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण करण्याचे श्रेय मोदींना’:
- मरगळ आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण करण्याचे श्रेय मोदींना जात असल्याचे जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी म्हटले.
- तसेच मोदींनी शौचालय बांधणी करण्याचा हाती घेतलेल्या उपक्रमाचीही त्यांनी स्तुती केली.
राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द :
- देशातील सर्व महामार्गावरील टोल आकारणी कायमची बंद करण्याच्या दिशेने पाऊले टाकण्यास केंद्र सरकारने सुरवात केली आहे.
- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
शुक्र ग्रहावरील वस्तीसाठी नासा प्रयत्नशील :
- ‘मंगळवारी‘ पेक्षा ‘शुक्रवारी‘ अधिक सोपी.
- नासाने शुक्राच्या वातावरणात सौरऊर्जाधारित हवाई वाहन पाठवण्याचे ठरवले आहे.
- त्यामुळे तेथे तरंगत्या ढगांचे शहर निर्माण करून मानवी वस्ती निर्माण करण्याची योजना आहे.
- शुक्राच्या वातावरणात गुरुत्व पृथ्वीपेक्षा थोडे कमी आहे.
- शुक्र ग्रह मंगल व पृथ्वी पेक्षा सौरऊर्जा जास्ती घेतो.
वाजपेयींचा जन्मदिनी होणार गुड गव्हर्नन्स डे :
- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 25 डिसेंबर या जन्मदिनी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये गुड गव्हर्नन्स डे साजरा करण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिले आहेत.
- 25 डिसेंबर रोजी सुट्टी असल्याने हा दिवस अपयशी ठरण्याची शक्यता आहे.
‘सीआरपीएफ’ च्या प्रमुखपदी प्रकाश मिश्रा :
- भारतातील सर्वात मोठे निमलष्करी दल असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) प्रमुखपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रकाश मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे.
बॉम्बे हायकोर्टाचे नामकरण करा :
- मराठी भाषेचा सन्मान आणि आदर म्हणून “बॉम्बे हायकोर्टा“चे “बॉम्बे हायकोर्टाचे नामकरण करा” असे नामकरण करा.
- अशी शिफारस मराठी भाषा सल्लागार समितीने राज्य सरकारला केली आहे.
दिनविशेष :
- 23 डिसेंबर – किसान दिन
- 1940 – हिंदुस्थानी एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान निर्मितीचा कारखाना त्यावेळच्या म्हैसूर राज्य बंगलोर येथे प्रसिद्ध उद्योगपती वलचंद हिराचंद यांनी सुरू केले.पुढे या कंपनीचे हिंदुस्थान एरोनॉटिक्स मध्ये रूपांतर करण्यात आले.
- 1997 – जयप्रकाश नारायण यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब जाहीर.