4 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

पोस्ट पेमेंट बँक
पोस्ट पेमेंट बँक

4 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 मार्च 2020)

‘सारथी’साठी समिती, विजय वडेट्टीवार यांची घोषणा :

  • पुणे येथील सारथी संस्थेतील अनियमिततांची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केली.
  • तर समिती दहा दिवसांत राज्य शासनाला अहवाल देईल. बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली.
  • विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर.एन.लढ्ढा, लेखा व कोषागरे संचालक जयगोपाल मेनन हे समितीचे सदस्य असतील.
  • तसेच महाविकास आघाडी सरकारचे सारथी संस्थेच्या कामकाजासंदर्भात प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
  • राज्य मंत्रिमंडळाने या बाबतचा निर्णय 15 जानेवारी 2020 रोजी घेतला होता. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाचे (मदत व पुनर्वसन) सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
  • निंबाळकर समितीने दिलेल्या अहवालावर 5 फेब्रुवारीला मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. समितीच्या अहवालातील अनियमिततांची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय त्याच दिवशी घेण्यात आला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 मार्च 2020)

पोस्ट पेमेंट बँकेत ‘कोल्हापूर’ राज्यात भारी :

  • पोस्ट पेमेंट बँकेमध्ये कोल्हापूर हे पोस्ट पेमेंट बँक सेव्हिंग खाती उघडण्यात राज्यात आघाडीवर आहे. चालू आर्थिक वर्षात एक लाख 42 हजार 664 बचत खाती नव्याने सुरू झाली आहेत.
  • तर तीन दिवसांत 30 हजार 623 ग्राहकांनी खाती सुरू केली. यामुळे ही बँक राज्यातील पोस्ट बँकेमधील सर्वाधिक बचत खाती उघडणारी बँक ठरली आहे.
  • केंद्र शासन आणि रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुविधा तळगाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पेमेंट बँकांना परवानगी दिली. यात पोस्ट खात्यालाही पेमेंट बँक देण्यात आली.
  • देशात पोस्ट खात्याबाबत विश्वासार्हता आहे. त्यामुळे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बचत, चालू खाते उघडण्यासाठी गर्दी होत आहे. दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या पोस्ट पेमेंट बँकेकडे ग्राहकांचा कल आहे. कोल्हापुरातील पोस्ट पेमेंट बँकेने राज्यातील पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आघाडी घेतली आहे.

प्रेरणादायी महिलांना मोदी देणार स्वत:ची सोशल मीडिया अकाऊंट्स :

  • आम्हाला जीवन आणि कार्यातून प्रेरणा देणाऱ्या महिलांकडे मी माझी सोशल मीडिया अकाऊंटस् सोपवून देईन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले.
  • तर जनतेने अशा प्रेरणादायी महिलांच्या कथा मला कळवाव्यात, असे आवाहनही मोदी यांनी केले.
  • तसेच ‘या महिलादिनी मी माझी सोशल मीडिया अकाऊंटस् अशा महिलांकडे सोपवून देईन ज्यांचे जीवन आणि कार्य यातून आम्हाला प्रेरणा मिळते. यामुळे दशलक्षावधी लोकांना काही तरी नवीन करण्यास मदत होईल.
  • मोदी यांनी ‘या रविवारी मी फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबरील माझी सोशल मीडिया अकाऊंटस् सोडून देण्याचा विचार करीत असल्याची पोस्ट टाकल्यावर चर्चांना सुरुवात झाली होती.

उपाययोजना दलात सीमा वर्मा यांचा समावेश :

  • भारतीय – अमेरिकी आरोग्य धोरण सल्लागार सीमा वर्मा यांना अमेरिकेत करोना विषाणूचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या व्हाइट हाऊस करोनाविषाणू कामगिरी दलात प्रमुख सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी हे पथक 30 जानेवारीला स्थापन केले.
  • चीनमध्ये करोनाचा प्रसार वेगाने सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांनी त्याची दखल घेऊन वेळीच त्याचा अमेरिकेत प्रवेश मर्यादित ठेवण्यासाठी, तसेच संसर्ग सुरू झाला तर उपाययोजना करण्यासाठी पथक स्थापन केले होते. आरोग्य व मानवी सेवा मंत्री अ‍ॅलेक्स अझार हे या पथकाचे प्रमुख आहेत. राष्ट्रीय सुरक्षा मंडळा समवेतही त्यांचा समन्वय आहे.
  • तर उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी सोमवारी ट्विट संदेशात म्हटले आहे, की सीमा वर्मा यांची नेमणूक सेंटर्स फॉर मेडिकेअर अँड मेडिकेड सव्‍‌र्हिसेसच्या प्रशासक म्हणून करण्यात आली आहे. ‘ज्येष्ठ कामकाज’ मंत्री रॉबर्ट विल्की यांचीही नेमणूक त्यात करण्यात आली आहे.
  • तसेच अमेरिकेत करोना विषाणूचा प्रसार टाळणे आणि जे रूग्ण आहेत त्यांच्यावर उपचार करणे याला प्राधान्य देण्यात येत आहे. रुग्णांना सुरक्षित ठेवण्यासाठी दुप्पट प्रयत्न करण्यात येत आहेत.

दिनविशेष:

  • सन 1837 मध्ये शिकागो शहराची स्थापना झाली.
  • नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते सन 1951 मध्ये पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
  • भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म 4 मार्च 1980 मध्ये झाला.
  • 2001 या वर्षी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.