9 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
9 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 मार्च 2020)
एअर इंडियानंतर आणखी एका सरकारी कंपनीच होणार खाजगीकरण :
- सरकारी वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झालेली असताना केंद्रानं आणखी एका सरकारी कंपनीचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सर्व सरकारी हिस्सेदारी विकण्याची घोषणा केंद्रानं केली आहे.
- केंद्र सरकारनं जास्तीत जास्त निर्गुतंवणुकीचं धोरण स्वीकारलं आहे. त्यासाठी उद्दिष्ट निर्धारित केलं असून, यापूर्वीचं कर्जाच्या ओझ्यामुळे डबघाईस आलेल्या एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याला केंद्रानं मंजूरी दिली आहे.
- तसेच आता एअर इंडिया पाठोपाठ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील संपूर्ण समभाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत.
- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये (बीपीसीएल) सरकारचा 52.98 टक्के हिस्सा आहे. सरकारकडून करण्यात येणारी सर्वात मोठी निर्गुंतवणूक ठरणार आहे. गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता विभागानं निविदा जाहीर केली आहे. कंपनीतील सर्व भागभांडवल व कंपनीचे व्यवस्थापकीय नियंत्रणही खाजगी उद्योगांकडे दिलं जाणार आहे.
- नुमालीगड रिफायनरी लिमिटेडमध्ये बीपीसीएलचे 61.55 टक्के भागभांडवल आहे. या बोलीतून केंद्रानं त्याला वगळलं आहे. नुमालीगड रिफायनरी सरकारी तेल आणि गॅस कंपनीला विकण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
Must Read (नक्की वाचा):
हेलीने माजी यष्टीरक्षकाचा विक्रम मोडला :
- ऑस्ट्रेलियन महिला संघाची सलामीवीर आणि यष्टीरक्षक एलिसा हेलीने अंतिम सामन्यात विक्रमी कामगिरी केली आहे.
- तर नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिलांनी चौफेर फटकेबाजी करत खोऱ्याने धावा वसूल केल्या. एलिसा हेली आणि बेथ मुनी या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी रचली.
- हेलिने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना 39 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 75 धावा केल्या.
- तसेच या अर्धशतकी खेळाच्या जोरावर हेलीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 75 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत हेलीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिने न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक ब्रँडन मॅक्युलमचा विक्रम मोडला.
वसीम जाफरची निवृत्तीची घोषणा :
- प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सचिन म्हणून ओळखला जाणारा फलंदाज वसीम जाफरनं क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली.
- तर वसीम जाफर आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना एप्रिल 2008 मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
- वसीम जाफर 1996-97 ते 2012-13 दरम्यान 8 रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघात सहभागी होता. तर 2018 आणि 2019 मध्ये वसीम जाफरनं विदर्भाला रणजीचा किताब मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम :
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.
- भारतीय संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे चार वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाची ही अंतिम फेरीत खेळण्याची सहावी वेळ आहे. त्यामुळे पहिल्याच अंतिम फेरीत बाजी मारून जेतेपद पटकावण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात मैदानावर पाऊल टाकताच वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हरमनप्रीत कौरचा हा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 30वा सामना आहे.
- तर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये इतके सामने खेळणारी ती पहिलीच भारतीय आणि जगातली पाचवी खेळाडू ठरली आहे. या विक्रमात एलिसा पेरी (36), अॅलिसा हिली (34), सुजी बेट्स (32) आणि डेंड्रा डॉटीन (30) यांनी हा पराक्रम केला आहे.
दिनविशेष:
- पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म 9 मार्च 1934 मध्ये झाला होता.
- प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचाजन्म 9 मार्च 1951 मध्ये झाला.
- पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म 9 मार्च 1952 रोजी झाला.
- बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सन 1959 पासून सुरूवात झाली.
- सन 1992 या वर्षी कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के.के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा