26 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
26 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 मार्च 2020)
केंद्राकडून होणार दीड लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा :
- करोना विषाणूमुळे लॉकडाऊन झेलणाऱ्या देशाला संकटापासून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 1.5 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.
- मात्र, यावर अद्याप सरकारकडून अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेमध्ये चर्चा सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते.
- केंद्र सरकारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आर्थिक मदत योजना 2.3 लाख कोटींपर्यंतही असू शकते. मात्र, अंतिम आकड्याबाबत अद्यापही चर्चा सुरुच आहे. या आठवड्याच्या शेवटापर्यंत याची घोषणा होऊ शकते.
- याद्वारे 10 कोटी लोकांच्या बँक खात्यात थेट रक्कम टाकली जाणार आहे. ही मदत गरीबांना आणि त्या लोकांना दिली जाणार आहे ज्यांच्यावर लॉकडाऊनमुळे सर्वाधिक परिणाम झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):
केंद्र सरकार गहू 2 रुपये तर तांदूळ 3 रुपये किलो दराने देणार :
- केंद्र सरकार 80 कोटी लोकांना 27 रुपये किलोचा गहू 2 रुपये किलोने देणार तर 37 रुपये किलोचा तांदूळ 3 रुपये किलोने देणार अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
- सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत. असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.
- दूध, किराणा, रेशन, मांस, पशूचारा, भाजीपाला हे सगळी दुकानं सुरु राहणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांसोबत राज्य सरकारं आहेत असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय विद्यालयाच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द :
- करोना व्हायरसमुळे पुढचे 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये राहणार आहे. शाळेपासून महाविद्यालयापर्यंत सर्वच महत्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
- काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना पुढच्यावर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. अन्य राज्यांनी सुद्धा परीक्षा ने घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
- आता भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यालयाने 2019-20 या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
- 2009 सालच्या शिक्षणअधिकार कायद्यातंर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे
देशातील टोलनाक्यांवर तात्पुरती टोल वसुली बंद :
- देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं 14 एप्रिल पर्यंत म्हणजेच 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केला आहे.
- दरम्यान. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोल नाक्यांवर तात्पुरता टोल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- आपात्कालिन सेवांना काम करण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर तात्पुरत्या स्वरूपात टोल बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
‘लॉकडाऊन’ तोडल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षा :
- कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चे संपूर्ण देशभर समान पद्धतीने पालन व्हावे; यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने सविस्तर नियमावली जारी केली आहे.
- त्यासोबतच केंद्रीय गृहमंत्रालयाने या नियमावलीचे कसोशीने व कठोरपणे पालन करण्याचा आदेशही सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.
- या ‘लॉकडाऊन’ची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली असली, तरी हा कठोर उपाय योजण्याचा निर्णय राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या कार्यकारिणीने घेतला आहे.
- त्याच कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून उपर्युक्त नियमावली व आदेश जारी करण्यात आला आहे.
- तसेच या निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारच्या हाती भारतीय दंड विधानाचे कलम 188 आधीपासूनच आहे. सरकारी अधिकाºयाने दिलेल्या वैधानिक आदेशाचे उल्लंघन करणे, हा या कलमान्वये गुन्हा आहे व त्यासाठी सहा महिन्यांपर्यंतच्या कैदेची तरतूद आहे; परंतु प्राप्त परिस्थितीत याहून कडक शिक्षेची गरज लक्षात घेऊन सरकारने त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या 51 ते 60 या कलमांचाही वापर करण्याचा आदेश दिला आहे.
दिनविशेष :
- 26 जानेवारी 1552 मध्ये गुरु अमर दास शिखांचे तिसरे गुरु बनले.
- इंदिरा नेहरू व फिरोज गांधी यांचा विवाह 26 जानेवारी 1942 मध्ये झाला.
- 26 जानेवारी 2013 मध्ये त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा