Current Affairs (चालू घडामोडी) of 28 December 2014 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | त्सुनामीचा दहावा स्मृती दिन |
2. | आयएएस प्रवेश वयोमर्यादेबाबत राज्यांना विचारणा |
3. | हवामानवर आधारित विमा योजना |
4. | मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेला ‘एक्सलन्स अवॉर्ड’ |
5. | भारतीय संशोधकाने बनविले कृत्रिम शुक्राणू |
6. | सागरी जलचराच्या सात फुट लांबीच्या जीवाश्माचा शोध |
7. | राजीव गांधी एक्सलन्स पुरस्कार राजश्री विश्वासराव यांना प्रदान |
8. | महाराष्ट्रचा समुद्रकिनारा देशात सर्वात प्रदूषित |
9. | सरकारी सेवा लवकरच एका क्लिकवर |
10. | जीएसटी येणार |
11. | दिनविशेष |
त्सुनामीचा दहावा स्मृती दिन :
- भूकंपात दगावलेल्यांना विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
- या भूकंपात सात हजारांहून अधिक नागरिक ठार झाले होते.
आयएएस प्रवेश वयोमर्यादेबाबत राज्यांना विचारणा :
- राज्य सेवा अधिकार्यांना आयएएस व आयपीएससह अन्य सेवांमध्ये सामील करून घेण्याकरिता 54 वर्षाच्या विद्यमान वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत केंद्राने राज्य सरकारांना त्यांचा अभिप्राय विचारला आहे.
- भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा व भारतीय वन सेवेमध्ये राज्य सरकारातील अधिकार्यांना सामील करण्याबाबत विचार करण्यासाठी वयाची कमाल मर्यादा 54 वर्षाची आहे.
- केंद्रात सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
हवामानवर आधारित विमा योजना :
- सरकार यापुढे शाश्वत शेती विकासावर भर देणार असून, वर्षभरात पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासंबंधी प्रयत्न केला जाणार आहे.
- हवामानवर आधारित विमा योजना आणताना प्रारंभी 2056 हवामानाची केंद्रे उभारण्यात येतील.
- प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील 29 हजार ग्रामपंचायतींमध्ये हवामानाची केंद्रे उभारण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेला ‘एक्सलन्स अवॉर्ड’ :
- मुंबई पोलिसांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना ‘नॅसकॉम‘ आणि ‘डीएससीआय‘ या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘एक्सलन्स अवॉर्ड‘ देवून गौरवण्यात आले आहे.
- पोलिस उपयुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी आणि सायबर सेलचे सहाय्यक पोलिस आयुक्त नंदकिशोर मोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
भारतीय संशोधकाने बनविले कृत्रिम शुक्राणू :
- स्टेमसेल्स म्हणजेच मुळपेशींचा उपयोग आता वैद्यकीय संशोधनात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
- या पेशींपासून शरीरातील कोणत्याही अवयवाच्या पेशींची निर्मिती करता येते.
- भारतीय वंशाच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या एका पथकाने स्टेमसेल्स च वापर करून एक शुक्राणू तयार केला आहे.
- प्रा. आझिम सुरानी याने हा कृत्रिम शुक्राणू बनवीला आहे.
सागरी जलचराच्या सात फुट लांबीच्या जीवाश्माचा शोध :
- ब्रिटनच्या संशोधकाने साऊथ वेल्सच्या किनार्यावरील सागरी जलचराच्या सात फुट लांबीच्या जिवाश्माचा शोध घेतला आहे.
- एका मांसाहारी जलचराचा सात फुटचा सांगाडा यामध्येस्पष्टपणे दिसून येतो.
- जॉनशन बो असे या 34 वर्षाच्या संशोधकाचे नाव आहे.
राजीव गांधी एक्सलन्स पुरस्कार राजश्री विश्वासराव यांना प्रदान :
- यंदाचा राजीव गांधी एक्सलन्स पुरस्कार तरुण उद्योजक राजश्री उर्फ विश्वासराव यांना प्रदान करण्यात आला.
- नवी दिल्लीत झालेल्या विशेष समारंभात तामिळनाडूचे माजी राज्यपाल भीष्मा नारायण सिंह यांच्या हस्ते देण्यात आला.
- राजीव गांधी एक्सलन्स पुरस्कार दर वर्षी इंडियन सॉलीङॅरिटी कौन्सिलतर्फे देण्यात येतो.
महाराष्ट्रचा समुद्रकिनारा देशात सर्वात प्रदूषित :
- महाराष्ट्रचा समुद्रकिनारा देशात सर्वात प्रदूषित आहे, असा ठपका केंद्र सरकारची समुद्र विज्ञान संस्था आणि राज्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकत्रित अहवाल ठेवला आहे.
- भारताच्या पश्चिमेकडील सागरी किनारपट्टीवरील पाण्याच्या तब्बल 1100 नमून्यांचे परीक्षण केले.
- भौतिक, रासायनिक, जैविक अशा पातळ्यांवर 25 घटकांची तपासणी करण्यात आली आहे.
- महाराष्ट्रचा 720 किलोमीटर चा समुद्र किनारा सर्वात जास्त प्रदूषित झाल्याचे उघड झाले.
सरकारी सेवा लवकरच एका क्लिकवर :
- अमेरिकेतील मॉडेलच्या धर्तीवर बहुतांशी सरकारी सेवा मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
- आयटी क्षेत्रातील जाणकारांच्या मदतीने सरकारी सवलती आणि सेवांसाठी अर्ज, शुल्क भरण्याची व्यवस्था असलेले, तसेच तक्रारी व व्यथा स्विकारणारे एँप तयार करण्यात आले आहे.
- सरकारदरबारी केलेल्या तक्रारीचे किवा एखाद्या सेवेच्या मागणीचे काय झाले, याची नोंद किवा त्या कागदाचा प्रवास कसं सुरू आहे, याची माहिती संबधितांना एमएमएसव्दरे कळवण्याची योजना आहे.
जीएसटी येणार :
- ‘जीएसटी‘ ही जगात मान्य झालेली कर प्रणाली आहे.
- आपल्या देशात किती लवकर ‘जीएसटी‘ची अंमलबजावणी होईल यावर भविष्य प्रगतिची वाटचाल अवलंबून आहे.
- ही कर प्रणाली लागू झाल्यास देशाचे एकंदर राष्ट्रीय उत्पादन सुमारे 1.5% वाढेल, असा अंदाज आहे.
- ‘जीएसटी‘ला 1 एप्रिल 2016 ला हिरवा झेंडा दाखवला जाईल.
- ‘जीएसटी‘ मुळे वस्तु व सेवांच्या किमतीमध्ये समाविष्ट करांवर परत कर न लागल्याने वस्तूच्या किमती कमी होतील.
दिनविशेष :
- 1948 – मुंबई राज्यात ‘कसेल त्याची जमीन‘ हा कुल कायदा लागू झाला.