14 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
14 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 एप्रिल 2020)
करोनावर नियंत्रण मिळवणारे केरळ देशातील पहिले राज्य :
- देशात करोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. पण त्याच केरळमध्ये आता करोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर कमी झाली आहे.
- देशातील अन्य राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढतेय पण केरळमध्ये आता करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अवघे तीन ते चार आहे.
- केरळने सर्वप्रथम करोना चाचण्यांचा वेग वाढवून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटवली.
- त्यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढले व सक्तीचा 28 दिवसांचा क्वारंटाइन पीरीयड, याची प्रभावी अंमलबजावणी केली. जागतिक आरोग्य संघटनेचा क्वारंटाइनसाठी जो कालावधी आहे. त्यापेक्षा दुप्प्ट दिवसांचा क्वारंटाइन पीरीयड ठेवला.
Must Read (नक्की वाचा):
करोनाला रोखण्यासाठी 70 लसींच्या निर्मितीवर काम :
- करोना व्हायरसने आज संपूर्ण मानवजातीसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. या धोकादायक विषाणूचा फैलाव रोखणारी लस शोधून काढण्यासाठी आज जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
- करोनामुळे फक्त जीवितहानीच होत नाहीय तर जगाचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. या अशा करोनाला रोखण्यासाठी जगभरात 70 लसींच्या निर्मितीवर काम सुरु आहे.
- तर जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, लसीच्या मानवी चाचण्यासुद्धा सुरु झाल्या आहेत.
- हाँग काँगमधील कॅनसिनो बायोलॉजिसने प्रयोगासाठी एक लस बनवली आहे. बिजींग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नोलॉजीची लस दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. मॉडर्ना इन्क आणि इनोव्हिओ या अमेरिकेतील दोन औषध कंपन्याही करोनाचा फैलाव रोखणारी लस बनवण्यावर काम करत आहेत.
- तसेच चीनमध्ये बनवण्यात आलेल्या लसीला मानवी चाचणीसाठी मान्यता देण्यात आली आहे. जगभरात प्रचंड वेगान लस निर्मितीचे काम सुरु आहे.
करोनाविरुद्ध लढ्यासाठी आता व्हेंटिलेटर्सनंतर करणार ‘या’ गोष्टीची निर्मिती :
- देशात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत रोज यात नव्या रूग्णांची भर पडत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मास्क आणि सॅनिटाझरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
- देशातील अनेक ठिकाणी सॅनिटायझरची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याचंही दिसून येत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी आता भारतातील दिग्गज कंपनी महिद्रा पुढे सरसावली आहे.
- तर व्हेंटिलेटर्सनंतर आता महिंद्रा ही कंपनी सॅनिटायझरच्या उत्पादनात उतरली आहे.
- एकीकडे जगभरातील वैज्ञानिक करोनासारख्या आजाराचा सामना करण्यासाठी औषधांचं संशोधन करत आहेत. तर दुसरीकडे याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापरही वाढत आहे. गेल्या महिन्यात महिंद्रा यांनी कमी किंमतीत व्हेंटिलेटर्सची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याची सरासरी किंमत 7 हजार 500 रूपये असल्याचंही सांगण्यात आलं होतं.
खासगी कोरोना चाचण्या आता फक्त गरिबांसाठीच :
- सरकारने ज्या खासगी इस्तितळांना व प्रयोगशाळांना कोरोनाच्या चाचण्या करण्याची परवानगी दिली आहे तेथे या चाचण्या सर्वांसाठी पूर्णपणे मोफत करण्याचा गेल्या आठवड्यात दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुधारणा केली व आता अशा खासगी चाचण्या फक्त गरिबांसाठी मोफत असतील, असे स्पष्ट केले.
- दिल्लीतील एक अस्थीशल्य विशारद डॉ. शशांक देव सुधी यांनी केलेल्या अर्जावर न्या. अशोक भूषण व न्या. एस. रवींद्र भट यांनी हा सुधारित आदेश दिला.
- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ घेण्यास जे पात्र आहेत किंवा सरकार यानंतर ज्यांना आर्थिक दुर्बल वर्गात समावेश करेल अशाच लोकांना खासगी कोरोना चाचण्या विनामूल्य असतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
- तर आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी झालेल्यांना त्यासाठी योजनेचे कार्ड दाखवावे लागेल. अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे पैसे खासगी इस्पितळ व प्रयोगशाळांना देण्याची व्यवस्था सरकारने करावी, असेही खंडपीठाने सांगितले.
दिनविशेष :
- भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला.
- 14 एप्रिल 1950 हा भारतीय तत्त्वज्ञ श्री रमण महर्षी यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा