धक्कादायक खुलासा – चीनने जाहीर केली होती खोटी आकडेवारी
कोरोना व्हायरसचे मुळ उगमस्थान असलेल्या चीन मधून एक खळबळजनक बातमी बाहेर आली आहे. जसे कि कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग संकटाशी सामना करण्यात व्यस्त असताना चीनमध्ये मात्र याचा प्रभाव सध्या नगण्य झाला आहे, आणि हीच बाब सद्यस्थितीला सर्वांना आचंबित करणारी आहे. चीनवर सध्या सर्व स्तरातून टीका होत असताना चीनने धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे.
चीनच्या वूहान प्रांतातील कोरोना रुग्णांची आणि त्यात मेलेल्या रुग्णांची संख्या ही जवळ जवळ 50% म्हणजे अर्ध्याहून कमी जाहीर करण्यात आली आहे असा खळबळजनक खुलासा तेथील एका न्युज एजन्सी ने केला आहे.
सविस्तर वृत्तांत असे आहे की पूर्ण जगात हाहाकार माजवणारा कोरोना जेथून उत्पन्न झाला तेथुन कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची जी आकडेवारी समोर आलेली आहे ती अर्ध्यापेक्षाही कमी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये आता एकूण मृतांच्या संख्येत 650 रुग्णांची वाढ करण्यात आली आहे, त्यावरून एकंदरीत असे लक्षात येते कि चीनने कोरोना बाधित रुग्णांची जी आकडेवारी जगजाहीर केली आहे ती पूर्णपणे खोटी आहे.
वुहान नगरपालिका मुख्यालयाने शुक्रवारी कोविड-19 च्या पुष्टी झालेल्या आणि या आजारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत सुधारणा केली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार चीनमधील कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 4632 सांगण्यात आली असून एकूण बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. आता एकूण बाधित रुग्णांची संख्या 82692 झाली आहे.