26 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
26 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 एप्रिल 2020)
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते :
- इंग्लंडमधील एका प्रसिद्ध पोलिंग एजन्सीने कोरोनाचा सामना करण्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे.
- YouGov, असे या पोलिंग एजन्सीचे नाव आहे. या एजन्सीने व्हियतनामचे राष्ट्रपती गुएन फू त्रोंग यांना पहिले स्थान दिले असून, ते कोरोनाचा सामना करण्याच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे.
- तर या एजन्सीने म्हटल्याप्रमाणे, 92 टक्के भारतीयांना वाटते, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा सामना चांगल्या प्रकारे अथवा खूपच चांगल्या प्रकारे केला.
- तर व्हियतनाममधील 93 टक्के लोकांना वाटते, की तेथील सरकार कोरोनाचा सामना खूप चांगल्या प्रकारे करत आहे.
इंग्लंडमधील YouGov ही इंटरनेटवर आधारीत मार्केट आणि डाटाचे विश्लेषण करणारी कंपनी आहे. या कंपनीने हा निष्कर्ष 20 फेब्रुवारी ते 23 एप्रिल या काळातील आकड्यांच्या आधारे लावला आहे. - तसेच या सर्व्हेमध्ये फ्रान्स, अमेरिका, स्पेन, इटली आणि इंग्लंडमधील सरकारांची रँकिंग भारताच्या फार मागे आहे.
Must Read (नक्की वाचा):
चंद्राचा Digital Map तयार :
- अमेरिकन जिऑलॉजिकल सर्वे, नासा आणि ल्यूनर प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट यांनी गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे चंद्राचा डिजिटल मॅप तयार केला आहे.त्याचा उपयोग पुढील चांद्रयान मोहिमा यशस्वी करण्यासाठी होणार आहे.
- अमेरिकेततर्फे येत्या 2024 चंद्रावर माणूस पाठविला जाणार असून या मोहिमेसाठी सुद्धा यामुळे आपला चांगलाच उपयोग करता येणार आहे, असे खगोल अभ्यासक डॉ. प्रकाश तुपे यांनी सांगितले.
- मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. सहा अपोलो मोहिमा, अमेरिकेचा एल आरओ टॉपोग्राफी अभ्यास ,जपानची कायुगा मोहीम अशा चंद्रावरील विविध मोहिमांतमधून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हा डिजिटल मॅप तयार करण्यात आला आहे.
- तसेच दहा वर्षांपासून मॅप तयार करण्याचे काम सुरू होते. येत्या 51 व्या ल्यूनर प्लॅनेटरी सायन्स काँग्रेस मध्ये चंद्राच्या डिजिटल मॅप ची माहिती दाखविली राहणार आहे, असे अमेरिकन जिऑलॉजिकल सवेर्चे संचालक जीम रॅली यांनी नुकतेच सांगितले.
केंद्राने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे :
- करोना व्हायरस महामारीदरम्यान घरातील एअर कंडीशनरचे तापमान 24 ते 30 डिग्री दरम्यान असावे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
- घर आणि कार्यालयांमध्ये AC च्या वापराबात केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एसीच्या वापरावेळी आर्द्रता 40 ते 70 टक्के असावी, असा सल्लाही केंद्राकडून देण्यात आला आहे.
- इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडीशनर इंजिनिअर्सने (ISHRAE) सुचवलेली ही मार्गदर्शक तत्त्वे केंद्रीय सामाजिक बांधकाम विभागाने (CPWD) जारी केली आहेत.
- तर देशातील हवामानाच्या परिस्थितीचा अभ्यास करुन ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. घरात एअर कंडीशनरचा वापर करताना खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असेही यात सुचवण्यात आले आहे.
- याशिवाय, एसी वापरताना एग्जॉस्ट फॅनचा वापर करावा, एसी सुरू नसेल तरीही घरात व्हेंटिलेशन आवश्यक आहे, असे एसी वापराबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
- कमर्शियल आणि इंडस्ट्रियल सेक्टरसाठी एसीचा वापर करताना जास्तीत जास्त व्हेंटिलेशन असावे असे देखील सुचवण्यात आले आहे. पंखा वापरतानाही खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असे, या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.
ऑनलाइन बुक स्लॉटची‘या’ राज्यानं सुरू केली सुविधा :
- देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु सरकारनं नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे.
- तर अशा परिस्थितीत बँकांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी हरयाणा सरकारनं एक नवी शक्कल लढवली आहे. कोणत्याही ग्राहकाला आता घरबसल्या बँकेतील टाईम स्लॉट बुक करता येणार आहे. बँकेत रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो.
- तसेच याव्यतिरिक्त पोस्टल बँक सर्व्हिसद्वारे रोख रक्कम घरी मागणवण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.
यासाठी हरयाणा सरकारच्या अर्थ विभागानं स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकसोबत हातमिळवणी केली आहे. - तर यासाठी सर्वप्रथम https://bankslot.haryana.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर बुक बँक स्लॉटवर क्लिक करा. यानंतर आपल्या बँकेचा IFSC टाका. IFSC टाकल्यानंतर ब्रान्च दिसेल त्या व्हेरिफाय करावं लागेल. त्यानंतर त्यात तारीख आणि वेळ टाका. त्या पश्चात स्टेटस चेक वर क्लिक करा आणि अकाऊंटची माहिती आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
- त्यानंतर टाईप स्लॉट बुक झाल्याचं पेजवर दिसेलं. तसंच पोस्टल बँकेच्या घरपोच रोख रकमेच्या सुविधेसाठी https://bankslot.haryana.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
अमेरिकन कला-विज्ञान अकादमीवर भारतीय वंशाच्या रेणू खटोर :
- अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्य़ूस्टन सिस्टीमच्या कुलगुरू रेणू खटोर यांची अमेरिकन कला व विज्ञान अकादमीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
- तर खटोर या आता अकादमीच्या अडीचशे प्रतिष्ठित सदस्यांपैकी एक असणार आहेत.
- तसेच या अकादमीत साहित्यिक, वैज्ञानिक, स्वयंसेवी संस्था, खासगी क्षेत्र, शिक्षण या क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे.
- त्या भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी पहिल्या महिला कुलगुरू असून अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या पहिल्या स्थलांतरित प्रमुख आहेत.
- खटोर या 2008 पासून कुलगुरू आहेत व त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केल्याने अकादमीवर निवडण्यात आले आहे.
केंद्रीय दक्षता आयोगाचे संजय कोठारी नवे आयुक्त :
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून जारी एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
- देशाची भ्रष्टाचारविरोधी सर्वोच्च संस्था केंद्रीय दक्षता आयोगाचे (सीव्हीसी) प्रमुख के. व्ही. चौधरी यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी जूनपासून हे पद रिक्त होते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एका उच्चस्तरीय निवड समितीने फेब्रुवारीत कोठारी यांच्या नावाची शिफारस केली होती.
- त्यावेळी काँग्रेसने याचा विरोध करीत दक्षता आयुक्त नियुक्तीसाठीची प्रक्रिया बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचे म्हटले होते.
- 1978च्या बॅचचे कोठारी हे हरयाणा केडरचे आयएएस अधिकारी होते. 2016 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना पीईएसबीचे प्रमुख म्हणून नेमले होते.
- तर जुलै 2017 मध्ये त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव नियुक्त केले होते. दक्षता आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती एका निवड समितीच्या शिफारशीवर करतात.
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी ‘एडोफोक्स’ अॅपची निर्मिती :
- कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी लागली तसेच सर्व प्रकारच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
- तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर करुन पर्याय शोधण्यात येत आहे. मात्र, तरी त्यातून आजमितीला समाधानकारक मार्ग निघाला आहे असे ठोसपणे म्हणता येणार नाही.
- त्याच धर्तीवर लातूर व पुणे येथील मित्रांनी एकत्र येत अतिशय सोप्या पध्दतीच्या एका ‘एडोफॉक्स’ या अॅपची निर्मिती केली असून त्याद्वारे विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था यांना ऑनलाईन शिक्षणाचा एक सक्षम व सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
- तर शैक्षणिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून शिक्षण सुरु ठेवण्यासाठी विविध पावले उचलली जात आहे. त्यात झूम, मिंट, गुगल अॅपसारख्या विविध ऑनलाईन माध्यमांचा उपयोग करुन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येत आहे.
दिनविशेष:
- 26 एप्रिल हा दिवस ‘जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन’ आहे.
- पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म 26 एप्रिल 1479 मध्ये झाला होता.
- अटलेटीको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना 1903 मध्ये झाली.
- सन 1964 मध्ये टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.
- जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणार्या अधिवेशनाची अंमलबजावणी सन 1970 मध्ये झाली होती.
- सन 1973 मध्ये ‘अजित नाथ रे’ हे भारताचे 14वे सरन्यायाधीश झाले होते.