सहावी पंचवार्षिक योजना (Sixth Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams
कालावधी : 1 एप्रिल, 1980 ते 31 मार्च, 1985
मुख्य भार : दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती.
प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र
उद्दिष्टे :
- 5.2% इतका वाढीचा दर संपादित करणे.
- 3 कोटी 40 लक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती.
- आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन इ.
Must Read (नक्की वाचा):
योजना खर्च :
- प्रास्ताविक खर्च : 96,500 कोटी रु.
- वास्तविक खर्च : 1,09,292 कोटी रु.
- अपेक्षित वृद्धी दर : 5.2%
- प्रत्यक्ष वृद्धी दर : 5.7%
प्राधान्य :
- ऊर्जा
- उद्योग
- शेती
कार्यक्रम :
- एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम : प्रत्येक्ष अंमलबाजावणी 2 ऑक्टोंबर.1980 पासून.
- NREP – राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम : 2 ऑक्टोंबर.1980
- RLEGP – ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना : 15 ऑगस्त 1983
- DWCRA -development of women and children in rural area : सप्टेंबर 1982
- नवीन वीस कलमी कार्यक्रम – मूळच्या वीस कलमी कार्यक्रमात बदल करून हा कार्यक्रम 14 जानेवारी 1982 रोजी सुरू करण्यात आला.
- दोन नवीन पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले : विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आणि समेल पोलाद प्रकल्प.
विशेष घटनाक्रम :
- 15 एप्रिल, 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
- जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची तर जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली.
- या योजनेदरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.
मूल्यमापन :
- योजना यशस्वी ठरली. संतुलित विकास व सर्व लक्ष्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिन यशस्वी मानली जाते.
- वाढीचा दर5 टक्यांपेक्षा अधिक साध्य होण्यास सुरवात झाली.