22 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जागतिक जैवाविविधता दिन
जागतिक जैवाविविधता दिन

22 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 मे 2020)

रेल्वे स्थानकांवर आरक्षित तिकीट उपलब्ध :

  • करोनामुळे स्थगित झालेली प्रवासी रेल्वेसेवा पूर्ववत करण्याची वेळ आली असून पुढील काही दिवसांमध्ये रेल्वेची संख्या वाढवली जाईल.
  • तसेच, दोन-तीन दिवसांमध्ये रेल्वे स्टेशनांमधील तिकीट खिडक्यांवरही रेल्वेचे आरक्षण करता येऊ शकेल.
  • शिवाय, देशभरातील 1.7 लाख सार्वजनिक सेवा केंद्रांवरही रेल्वेचे तिकीट मिळू शकेल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली.
  • करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यामुळे देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा 24 मार्चपासून बंद करण्यात आली होती. आता टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यामध्ये ती टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
  • 1 जूनपासून १००100 रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वे गंतव्य स्थानकांवरून मूळ स्थानकांवर परत येतील. त्यामुळे एक रेल्वे दोन फेऱ्या करेल. अशा 200 रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.
  • तर या गाडय़ांसाठी ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन आरक्षणाची प्रक्रिया गुरुवारी सुरू झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मे 2020)

हर्षवर्धन आज ‘डब्ल्यूएचओ’च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार :

  • जागतिक आरोग्य संघटनेमध्ये (डब्ल्यूएचओ) भारत आता महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज झाला आहे.
  • भारताच्या करोनाविरोधातील लढाईत आघाडीवर असलेले केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे आज डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
  • तर जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी हे सध्या डब्ल्यूएचओच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
  • तसेच कार्यकारी मंडळावर भारताचा प्रतिनिधी नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर 194 देशांच्या जागतिक आरोग्य असेंब्लीने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पदभार स्वीकारणार ही केवळ औपचारिकता आहे.
  • डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व गटाने कार्यकारी मंडळावर मे महिन्यापासून सुरू होणाऱ्या पुढील तीन वर्षांसाठी भारताची निवड करण्याचा निर्णय गेल्या वर्षी एकमताने घेतला.

दिनविशेष :

  • 22 मे : जागतिक जैवाविविधता दिन.
  • समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा 22 मे 1772 रोजी जन्म झाला.
  • 22 मे 1762 मध्ये स्वीडन आणि प्रशियामध्ये हॅम्ब्बुर्गचा तह झाला.
  • राइट बंधूंनी उडणार्‍या यंत्राचे (Flying Machine) पेटंट 22 मे 1906 मध्ये घेतले.
  • विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म सन 1783 मध्ये 22 मे रोजी झाला.
  • 22 मे 1972 रोजी सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
  • भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 रोजी सूत्रे हाती घेतली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मे 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.