4 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
4 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 डिसेंबर 2019)
नौदलाच्या ताफ्यात तीन विमानवाहू युद्धनौका सामिल होणार :
- नौदलाने दीर्घकालीन योजनेत तीन विमानवाहू युद्धनौका ताफ्यात सामील करण्याचे ठरवले आहे, असे नौदल प्रमुख अडमिरल करमबीर सिंह यांनी सांगितले.
- तर स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका 2022 पर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
- वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यास नौदल सज्ज आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 2022 पर्यंत कार्यान्वित होईल तसेच त्यावर मिग 29-के विमाने तैनात करण्यात येतील.
- तसेच नौदलासाठी वार्षिक अर्थसंकल्पातील तरतूद गेल्या पाच वर्षांत 18 टक्क्य़ांवरून 13 टक्के झाली आहे. नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तरतुदीतील ही कपात योग्य नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
Must Read (नक्की वाचा):
एक देश, एक रेशन कार्ड योजनेची 1 जूनपासून अंमलबजावणी :
- स्थलांतरित कामगार आणि रोजंदारी मजूर यांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची 1 जून 2020 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.
- तर या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे.
- बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पासवान यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
- तसेच या योजनेचा लाभ मुख्यत्वे स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर यांना होणार आहे, हा वर्ग रोजगारासाठी सातत्याने देशभरात फिरतीवर असतो.
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात भारताची 27 पदकांची लयलूट :
- भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी अॅथलेटिक्स आणि नेमबाजी या क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवत 11 सुवर्णपदकांसह एकूण 27 पदकांची लयलूट केली आहे.
- त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारताच्या खात्यावर 18 सुवर्ण, 16 रौप्य आणि 9 कांस्यपदकांसह एकूण 43 पदके जमा आहेत.
- तर पहिल्या स्थानावरील यजमान नेपाळच्या खात्यावर 44 पदके (23 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्य) जमा आहेत.
लोन डी ओर फुटबॉल पुरस्कार विक्रमादित्य मेसीला :
- जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मुकुट अभिमानाने मिरवणाऱ्या बार्सिलोनाच्या लिओनेल मेसीने विक्रमी सहाव्यांदा ‘बलोन डी ओर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरले.
- महिलांमध्ये विश्वविजेत्या अमेरिकेची खेळाडू मेगान रॅपिनोने कारकीर्दीत पहिल्यांदाच या पुरस्काराला गवसणी घातली.
- तर पॅरिसमधील शॉटलेट थिएटर येथे झालेल्या या सोहळ्यात मेसीने यंदाच्या चॅम्पियन्स लीगमधील लिव्हरपूलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हर्गिल व्हॅन डिक आणि पोतुर्गाल व युव्हेंटसचा नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर मात करून हा पुरस्कार पटकावला.
- तसेच 2019 या वर्षांत अर्जेटिना आणि बार्सिलोना संघाकडून खेळताना मेसीने सर्वाधिक 54 गोल केले आहेत.
- त्याचप्रमाणे बार्सिलोनाला ला लिगाचे विजेतेपद आणि चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून देण्यात मेसीचा सिंहाचा वाटा होता. मेसीने सर्वाधिक 686 गुण मिळवले,
एकाच परीक्षेतून एम्स, जिपमरसह सर्व मेडिकल जागांसाठी प्रवेश :
- देशभरात वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय (एमबीबीएस/ बीडीएस) अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश (नीट) परीक्षा 3 मे रोजी घेण्यात येणार आहे.
- तर या परीक्षेच्या आधारे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण-संशोधन संस्थेसह (जेआयपीएमईआर) देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्व वैद्यकीय अभ्यासकम्रांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
- राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे (एनटीए) महासंचालक विनित जोशी यांनी सांगितले की, वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळी परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील विविध वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेचा ताण कमी होईल. शिवाय विद्यार्थी आणि पालकांना खर्चही कमी लागेल.
- तसेच मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या जागी नॅशनल मेडीकल कमीशन स्थापन केले आहे.
- आयुर्वेदिक, होमियोपॅथिक, अॅलोपॅथी, युनानी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एकाच परीक्षेचे आयोजन केले जाईल. त्याच आधारे प्रवेश दिले जातील. लेखी परीक्षा व्हावी, ही मंत्रालयाची शिफारस एनटीएने मान्य केली आहे. राज्यांच्या मागणीची दखल घेऊन यावेळी लेखी परीक्षा घेतली जाईल.
- तर इंग्रजी आणि अन्य दहा भाषेत परीक्षा घेण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयासह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.
दिनविशेष:
- 4 डिसेंबर हा दिवस ‘भारतीय नौसेना दिन‘ आहे.
- भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचा जन्म 4 डिसेंबर 1910 मध्ये झाला होता.
- भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म 4 डिसेंबर 1919 मध्ये झाला.
- सन 1924 मध्ये गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
- भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची सन 1948 मध्ये नेमणूक झाली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा