12 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचे निधन:
प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचे निधन:

12 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2020)

करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली:

  • गेल्या नऊ महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या करोनावरील पहिली लस विकसित केल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला.
  • करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली आहे. या लशीच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. ही लस प्रभावी असून, त्यातून करोना विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होते’, असे पुतिन यांनी जाहीर केले.
  • स्पुटनिक व्ही’ असे या लशीचे नाव आहे. ही लस आता प्रथम वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षकांना दिली जाईल. लसीकरणाची सक्ती केली जाणार नाही. लसीकरण ऐच्छिक असेल.
  • सप्टेंबरमध्ये या लशीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात सुरू केले जाईल. नंतर ऑक्टोबरमध्ये लसीकरणास सुरुवात होईल, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2020)

जम्मू-काश्मीरमध्ये 4जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात यावी असे समितीने ठरविले:

  • जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या विशेष समितीने 15 ऑगस्टनंतर या केंद्रशासित प्रदेशातील मर्यादित भागांमध्ये चाचणी तत्त्वावर 4जी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंगळवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
  • जम्मू-काश्मीर विभागातील प्रत्येकी एका जिल्ह्य़ात अतिवेगवान इंटरनेटची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी न्या. एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सांगितले.
  • जम्मू-काश्मीरमध्ये 4जी इंटरनेट सेवा विशिष्ट पद्धतीने सुरू करण्यात यावी आणि दोन महिन्यांनंतर चाचणीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात यावा असे समितीने ठरविले आहे.
  • केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासन या प्रकरणातील प्रतिवादी असून त्यांनी चांगली भूमिका घेतली असल्याचे पीठाने नमूद केले.

प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचे निधन:

  • प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते.
  • मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं.
  • त्यांना करोनाची लागण झाली होती. “त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली”, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली.

कोरोना चाचण्यात अमेरिका पहिला तर भारत दुसऱ्या क्रमांकावर:

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना चाचण्यांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक असून दुसरा कोणताही देश जवळपासही फिरकत नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
  • अमेरिकेने आतापर्यंत साडे सहा कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या असून भारताने एक कोटी 10 लाख चाचण्यात केल्या आहेत.
  • अमेरिकेने आतापर्यंत साडे सहा कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या असून भारताने एक कोटी 10 लाख चाचण्यात केल्या आहेत.
  • एक कोटी 10 लाख चाचण्यांसोबत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची लोकसंख्याही 130 कोटी आहे.

डिसेंबर महिन्यात करोनावरील लस लाँच करणार- सिरम इन्स्टिट्यूट:

  • या वर्षाच्या अखेरिस भारतला आपली करोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे.
  • डिसेंबर महिन्याच्या सुरूवातील आपली कंपनी करोनावरील लस लाँच करणार असल्याचं अदर पूनावाला म्हणाले.
  • सीएनबीसी टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. “पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनाच्या लसीची चाचणी सुरू करण्यात येणार आहे.
  • ही चाचणी आयसीएमआरसोबत करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस आम्ही लसीचं उत्पादन सुरू करणार आहोत,” असंही पूनावाला म्हणाले.

50 नेटमधील गोलंदाजांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची संधी:

  • इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) स्थलांतर झाल्यामुळे किमान 50 नेटमधील गोलंदाजांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे.
  • चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांनी प्रत्येकी 10 उदयोन्मुख नेट गोलंदाजांचा विशेष ताफा सोबत घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघानेही सहा नेट गोलंदाजांची नियुक्ती केली आहे.
  • नेट गोलंदाजांमध्ये प्रथमश्रेणी तसेच 19 आणि 23 वर्षांखालील वयोगटांच्या क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या युवकांचा समावेश आहे.
  • या गोलंदाजांना महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि ऋषभ पंत यांच्यासारख्या मातबर फलंदाजांचा सामना करण्याची संधी या निमित्ताने मिळेल.

दिनविशेष :

  • 12 ऑगस्टआंतरराष्ट्रीय हत्ती दिन
  • 12 ऑगस्टआंतरराष्ट्रीय युवा दिन
  • 12 ऑगस्ट 1851 मध्ये आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
  • पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी 12 ऑगस्ट 1953 मध्ये करण्यात आली.
  • नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको12 ऑगस्ट 1960 मध्ये ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.