29 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज जयंती:
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज जयंती

29 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2020)

बीई कंपनीशी करार केला- अमेरिकेतील बीसीएम संस्था:

  • अमेरिकेतील टेक्सासच्या बेलर कॉलेजऑफ मेडिसीन (बीसीएम) या संस्थेने करोनावरील लशीसाठी भारतातील बायोलॉजिकल ई लिमिटेड म्हणजे बीई कंपनीशी करार केला आहे.
  • बीसीएम कंपनीच्या मते बीई कंपनीशी कोविड 19 प्रायोगिक लस निर्मितीचा करार करण्यात आला आहे.
    बीई कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे.
  • आविष्करण तंत्रज्ञानावर आधारित ही लस असून त्याचे व्यावसायिक उत्पादन बीई कंपनी करू केलश, असा विश्वास टेक्सासच्या बीसीएमने व्यक्त केला आहे.
  • बीई (बायो-ई) होल्डिंग कंपनीचे संचालक नरेंद्र देव मंटेना यांनी सांगितले की, जर लस यशस्वी झाली तर आम्ही वर्षांला कोटय़वधी डोस उपलब्ध करू.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2020)

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज जयंती:

  • भारतीय हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांची आज जयंती.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉकी संघाचा दबदबा तयार करण्यात ध्यानचंद यांचा मोठा वाटा होता.
  • 1928, 1932 आणि 1936 अशा लागोपाठ ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात ध्यानचंद यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
  • याच कारणासाठी 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • वर्षभर विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू, प्रशिक्षक यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात येतो.
  • राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन आणि द्रोणाचार्य अशा मानाच्या पुरस्कारांनी आज देशातील खेळाडूंचा गौरव करण्यात येतो.

नीलेश कुलकर्णी यांच्या संस्थेला खेळ प्रोत्साहन पुरस्कार:

  • भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांचा शनिवार, 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळ प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
  • खेळाडूंना योग्य कारकीर्दीच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचे आणि विकासाच्या दृष्टीने खेळांना प्रोत्साहन देण्याचे कार्य कुलकर्णी यांच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटतर्फे (आयआयएसएम) करण्यात येते.
  • राष्ट्रपती भवन येथे आभासी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा होणार असून यावेळी खेलरत्न, अर्जुन, ध्यानचंद आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांबरोबरच कुलकर्णी यांचाही त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी गौरव करण्यात येईल.

दिनविशेष :

  • 29 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन तसेच भारतीय क्रीडा दिन आणि तेलगु भाषा दिन आहे.
  • सन 1831 मध्ये मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
  • भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला होता.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समिती स्थापन झाली.
  • चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना 29 ऑगस्ट 1974 मध्ये केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.