1 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
1 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 सप्टेंबर 2020)
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन:
- माजी राष्ट्रपती, मुरब्बी राजकारणी, काँग्रेसचे संकटमोचक नेते, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी लष्कराच्या रुग्णालयात निधन झाले.
- ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानिमित्त सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
- साठ वर्षांचा राजकीय अनुभव असलेल्या प्रणव मुखर्जी यांना केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले.
- प्रणव मुखर्जी यांनी पाच दशके समर्पित भावनेने देशसेवा केली. सार्वजनिक जीवनात विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी मातीशी नाळ कायम ठेवली. त्यांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पद्मावती यांचं निधन:
- भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचं शनिवारी (दि.29) निधन झालं, त्या 103 वर्षांच्या होत्या.
- एनएचआयच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ. पद्मावती यांना सन 1967 मध्ये पद्मभूषण तर सन 1992 मध्ये पद्मविभूषण किताबाने गौरविण्यात आले होते.
- त्यांना हार्वर्ड मेडिकल इंटरनॅशनल अवॉर्ड, डॉ. बी. सी. रॉय अवॉर्ड आणि कमला मेनन रिसर्च अवॉर्डनेही गौरविण्यात आले आहे.
महिलांच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलचे सलग पाचव्यांदा विजेतेपद मिळवले:
- लिआँने युरोपियन फुटबॉलवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना महिलांच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलचे सलग पाचव्यांदा विजेतेपद मिळवले.
- मध्यरात्री झालेल्या अंतिम फेरीत लिआँने वोल्फ्सबर्गला 3-1अशी धूळ चारली.
- एग्युइन सॉमरने 25व्या मिनिटाला पहिला, तर साकी कुमागाइने 44व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून लिऑनला मध्यंतरापूर्वीच 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
- उत्तरार्धात अॅलेक्झांड्रा पॉपने (57वे मि.) गोल झळकावून वोल्फ्सबर्गला पुनरागमनाच्या आशा दाखवल्या. परंतु 88व्या मिनिटाला सारा गर्नस्डॉटने निर्णायक तिसरा गोल झळकावून लिआँच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
दिनविशेष :
- हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 मध्ये झाला.
- सन 1906 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.
- पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात सन 1911 मध्ये भारत गायन समाजाची स्थापना केली.
- 1 सप्टेंबर 1956 मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.