17 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs
17 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 डिसेंबर 2020)
WhatsApp Payments सर्व्हिस भारतात सुरू :
- भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाईडरमध्ये (Digital Payment Service Providers) आज आणखी एक नवीन नाव जोडले आहे. जे व्हॉट्सअॅप पेमेंट्स सर्व्हिस (WhatsApp Payments service) आहे.
- आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि एचडीएफसी या प्रमुख बँकांच्या भागीदारीने फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुरू केली आहे.
- तसेच याठिकाणी या चारही बँकांचे कोट्यावधी ग्राहक व्हॉट्सअॅपच्या मदतीने ऑनलाईन पैसे पाठवू शकतात आणि आपल्या खात्यावर मागवू शकणार आहेत.
- तर यासाठी त्यांना व्हॉट्सअॅपच्या होमपेजवर उजवीकडे वरच्या बाजूस दिसणार्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, आपल्याला Payment चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर पेमेंट विंडो उघडेल, ज्यामध्ये तुम्हालाAdd new payments method वर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक करा आणि accept केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपने भागीदारी केलेल्या बँकांची नावे दिसतील.
Must Read (नक्की वाचा):
सर्व धर्मातील नागरिकांसाठी एकाच आधारावर घटस्फोट :
- देशातील सर्व धर्मातील नागरिकांसाठी एकाच आधारावर घटस्फोट देण्यात यावा या मागणीसाठीच्या याचिकेवर सुनावणीस मान्यता देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
- आंतरराष्ट्रीय करार आणि भारतीय घटनेचा सन्मान करत देशातील सर्व नागरिकांसाठी घटस्फोट एकाच आधारावर देण्यात यावा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
- तर त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला नोटीस बजावली असून सरकारने आपले म्हणणे मांडल्यानंतर पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.
- घटस्फोटासंबंधी कायदे (कलम 14, 15, 21 आणि 44) तपासून एकाच आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी भारतीय विधि आयोगाला सूचना करण्याचे निर्देश देऊ असे सरन्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमनियन यांच्या पीठाने सांगितले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोदी सरकार देणार 3,500 कोटींचं अनुदान :
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- सरकारनं 60 लाख टन साखर निर्यात करण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं असून, त्यातून मिळणारं उत्पन्न अनुदानाच्या माध्यमातून 5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची माहिती दिली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत साखर निर्यातीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
- सरकारनं 60 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला असून, त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे. 5 कोटी शेतकऱ्यांना 3,500 कोटी अनुदान दिलं जाणार आहे.
पाकिस्तानात कठोर कायद्याला मंजुरी;
- पाकिस्तानमध्ये बलात्काराविरोधात कठोर कायदा करण्यात आला आहे. बलात्कार प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी करणं तसचं कठोर शिक्षा देण्याची या कायद्यात तरतूद आहे.
- तर इतकंच नाही तर तर दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक करण्याचाही उल्लेख या कायद्यात आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या नव्या कायद्यावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
- नव्या कायद्यामध्ये बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणाऱ्यांचं नॅशनल रजिस्टर तयार केलं जाणार आहे. यासोबतच पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
- राष्ट्रपती भवनाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं असून या नव्या अध्यादेशांतर्गत बलात्कार प्रकरणांची लवकर सुनावणी व्हावी यासाठी देशभरात विशेष न्यायालयं उभारली जाणार आहेत. चार महिन्याच्या आत प्रकरणाचा निकाल लावला जाईल.
दिनविशेष:
- देशभक्त, काँग्रेसचे 16वे अध्यक्ष ‘लालमोहन घोष‘ यांचा जन्म 17 डिसेंबर 1849 रोजी कलकत्ता येथे झाला होता.
- भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी सन 1928 मध्ये ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स सोंडर्स याची लाहोर येथे हत्या केली होती.
- जयंतीलाल छोटालाल शहा यांनी सन 1970 मध्ये भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
- 2016 मध्ये शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.