Police Bharti Question Set 24

Police Bharti Question Set 24

1. ‘केसाने गळा कापणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय?

  1.  दुसर्‍याला फसविणे
  2.  विश्वासघात करणे
  3.  दुसर्‍याचे नुकसाने करणे
  4.  विश्वासाला पात्र नसणे

उत्तर : विश्वासघात करणे


2. ‘मनात मांडे खाणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय?

  1.  मनोरथ रचणे
  2.  कल्पनेत सुख मिळविणे
  3.  मानसिक भूक भागविणे
  4.  एखादी गोष्ट गुप्त ठेवणे

उत्तर :कल्पनेत सुख मिळविणे


 3. वचन कुणाचे आहे ते ओळखा?

‘बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले’

  1.  संत ज्ञानेश्वर
  2.  संत तुकाराम
  3.  समर्थ रामदास
  4.  तुकडोजी महाराज

उत्तर :संत तुकाराम


 4. शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे?

  1.  देऊळगाव राजा
  2.  पिंपळगाव राजा
  3.  सिंदखेड राजा
  4.  किनगाव राजा

उत्तर :सिंदखेड राजा


 5. मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत?

  1.  12
  2.  32  
  3.  34
  4.  37

उत्तर :34


 6. संधी ओळखा? कवीश्वर.

  1.  स्वरसंधी
  2.  व्यंजनसंधी
  3.  विसर्गसंधी
  4.  विशेषणसंधी

उत्तर :स्वरसंधी


 7. पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा? बोका

  1.  मांजर
  2.  बोकी
  3.  बोके
  4.  भाटी

उत्तर :भाटी


 8. ‘मृत्युंजय’ व ‘छावा’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

  1.  रणजीत देसाई
  2.  वि.स. खांडेकर
  3.  शिवाजी सावंत
  4.  शिवाजी भोसले

उत्तर :शिवाजी सावंत


 9. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

  1.  पुणे
  2.  अहमदनगर
  3.  नागपूर
  4.  यवतमाळ

उत्तर :अहमदनगर


 10. भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी कोणती?

  1.  तापी
  2.  नर्मदा
  3.  गंगा
  4.  गोदावरी

उत्तर :नर्मदा


 11. ‘लोणार’ सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1.  बुलढाणा
  2.  अकोला
  3.  यवतमाळ
  4.  जालना

उत्तर :बुलढाणा


 12. बीड जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सरहद्द लागते?

  1.  पाच
  2.  सहा
  3.  सात
  4.  चार

उत्तर :सहा


 13. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1.  अमरावती
  2.  बुलढाणा
  3.  भंडारा
  4.  गोंदिया

उत्तर :अमरावती


 14. ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

  1.  महात्मा फुले
  2.  महर्षी कर्वे
  3.  महर्षी वि.रा. शिंदे
  4.  डॉ. आंबेडकर

उत्तर :महात्मा फुले


 15. ‘मी अश्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही’ ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली?

  1.  नागपूर
  2.  मुंबई
  3.  औरंगाबाद
  4.  येवला

उत्तर :येवला


 16. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?

  1.  राजाराम मोहन रॉय
  2.  दादाभाई नौरोजी
  3.  रविंद्रनाथ टागोर
  4.  स्वामी विवेकानंद

उत्तर :राजाराम मोहन रॉय


 17. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण?

  1.  विष्णू शास्त्री चिपळूणकर
  2.  हरी नारायण आपटे
  3.  बाळशास्त्री जांभेकर
  4.  केशवसूत

उत्तर :बाळशास्त्री जांभेकर


 18. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय?

  1.  गोपाळ देवीदास आमटे
  2.  दामोदर विनायक आमटे
  3.  प्रभाकर देवीदास आमटे
  4.  मुरलीधर देवीदास आमटे

उत्तर :मुरलीधर देवीदास आमटे


 19. ‘सतीबंदीचा कायदा’ खालीलपैकी कोणी पास केला?

  1.  लॉर्ड
  2.  लॉर्ड विल्यम बेटिंग
  3.  जॉन अॅडम्स
  4.  लॉर्ड मिंटो

उत्तर :लॉर्ड विल्यम बेटिंग


 20. सन ‘1857 चा उठाव म्हणजे शिपाईची भाऊगर्दी होय’ असे कोणी म्हटले?

  1.  प्रा. न.र. फाटक
  2.  आर.सी. मुजूमदार
  3.  स्वातंत्र्यवीर सावरकर
  4.  डॉ. सेन

उत्तर :प्रा. न.र. फाटक

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.