31 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs
31 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2021)
चीनमध्ये मुलांच्या ‘ऑनलाइन गेमिंग’वर निर्बंध :
- मुलांमधील ‘ऑनलाइन गेमिंग’ची वाढती ‘व्यसनाधीनता’ हा चिंतेचा विषय ठरू लागल्याने या व्यसनाला आळा घाळण्यासाठी चीनने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
- चीनने किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन गेमिंगवर वेळेचे निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर गेमिंग कंपन्यांनाही नियम आणि निर्बंधांच्या कक्षेत आणले आहे.
- चीन सरकारच्या नव्या नियमांमुळे मुलांना आता आठवडय़ातले तीन दिवस फक्त एक तास ऑनलाइन खेळ खेळता येतील.
- तर शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुले रात्री 8 ते 9 या वेळेतच ऑनलाइन खेळ खेळू शकतील,
- ऑनलाइन गेमिंगवरील निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना गेमिंग कंपन्यांनाही देण्यात आल्या आहेत.
- निश्चित केलेल्या कालावधीहून अधिक वेळ मुले ऑनलाइन खेळताना आढळली तर त्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांवर टाकण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
माजी क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचे निधन :
- नामांकित प्रशिक्षक वासू परांजपे यांचे सोमवारी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.
- तर गेली सहा दशके भारतीय आणि विशेषत: मुंबईच्या क्रिकेटसाठी परांजपे यांनी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका पार पाडल्या.
- वासूसरांप्रमाणे मुंबईच्या क्रिकेटची नाडी कुणालाच ठाऊक नाही, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते.
- 29 प्रथम श्रेणी सामन्यांत दोन शतकांसह 785 धावा अशी परांजपे यांची आकडेवारी फारशी लक्षवेधी नव्हती. पण खेळाची जाण आणि खेळाडूंच्या दृष्टिकोनावर मेहनत घेणे, हे त्यांचे वैशिष्टय़ होते.
- तसेच त्यांना हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजरात अशा चार भाषा अवगत होत्या.
स्टुअर्ट बिन्नीची क्रिकेटमधून निवृत्ती :
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचे पृथक्करण नावावर असलेला भारताचा अष्टपलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीने सोमवारी प्रथम श्रेणी आणि आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
- तर सहा कसोटी, 14 एकदिवसीय आणि तीन ट्वेंन्टी-20 आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये बिन्नीने भारताचे प्रतिनिधित्व केले.
- तसेच 2014मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात फक्त 4 धावांत 6 बळी मिळवण्याचा विक्रम स्टुअर्टने नोंदवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा विक्रम अद्याप अबाधित आहे.
अवनी लेखराला सुवर्णपदक :
- भारताच्या अवनी लेखराने सोमवारी टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे.
- अवनी लेखरा हिने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 249.6 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
- तर याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण 621.7 गुणांसह सातव्या स्थानावर होती.
- पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
- चीनची महिला नेमबाज झांगने 248.9 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आणि रौप्य पदक पटकावले.
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी :
- सोमवारी भारतीय खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक मिळवत दमदार कामगिरी केली आहे.
- टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवसही भारतासाठी तिहेरी पदककमाईचा ठरला होता.
- तर भारताच्या योगेश कथुनियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.
- सोमवारी योगेश कथुनियाने 44.38 मीटरचा सर्वोत्तम थ्रो टाकत रौप्य पदक पटकावले.
- तसेच दोन वेळचे सुवर्णपदक विजेते देवेंद्र झाझारिया यांनी यावेळी भालाफेकमध्ये रौप्यपदकावर कब्जा केला आहे.
- त्याचबरोबर सुंदरसिंग गुर्जरही कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
थाळीफेकपटू विनोद कुमारचं कांस्यपदक रोखलं :
- थाळीफेकपटू विनोद कुमारचे कांस्यपदक रोखले गेले असल्याचे समोर आले.
- BSFचा 41 वर्षीय विनोद कुमार तिसऱ्या क्रमांकावर राहिला, त्याने 1991मीटर सर्वोत्तम थ्रोसह आशियाई विक्रम रचला.
- तर त्याने पोलंडच्या पिओटर कोसेविच आणि क्रोएशियाच्या वेलिमीर सँडर यांच्या नंतर तिसरा क्रमांक पटकावत कांस्यपदक जिंकले. पण त्याचे कांस्यपदक थांबवण्यात आले आहे.
- पुरुषांच्या F52 स्पर्धेत विनोदच्या अपंगत्व वर्गीकरणामुळे त्याचे पदक रोखण्यात आले आहे.
भालाफेकपटू सुमित अंतिलनं पटकावलं सुवर्ण :
- सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे.
- तर एवढेच नव्हे, तर या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला आहे.
- तसेच त्याने एफ-64 प्रकारात 68.55 मीटर लांब भाल फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
दिनविशेष :
- 31 ऑगस्ट हा दिवस बालस्वातंत्रदिन आहे.
- मृत्युंजय कादंबरीचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक ‘शिवाजी सावंत‘ यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 मध्ये झाला.
- सन 1947 मध्ये 31 ऑगस्ट रोजी भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
- पांडुरंगशास्त्री आठवले यांना सन 1996 मध्ये मॅगसेसे पुरस्कार प्रदान झाले.
- राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते सन 1970 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.