8 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
8 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 सप्टेंबर 2021)
आता झाडांनाही मिळणार पेन्शन:
- छोटे शेतकरी आणि भूमिहीन मजुरांचा रोजगार वाढवण्यासाठी सध्या वेगवेगळ्या योजनांवर काम केले जात आहे.
- आता अशीच योजना हरियाणा सरकारनेही आणली आहे, जी येत्या काळात भूमिहीन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.
- हरियाणा सरकारने ‘प्राणवायू देवता’ नावाची एक अनोखी पेन्शन योजना सुरू केली आहे.
- तर याअंतर्गत, सरकारने 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झाडांना पेन्शन देण्याची योजना आखली आहे.
- तसेच या झाडांच्या काळजीवाहकांना दरवर्षी 2,500 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- या योजनेचा फायदा शेतकरी आणि भूमिहीन मजुरांना तर होईलच पण सोबतच झाडे तोडणेही थांबेल.
Must Read (नक्की वाचा):
चंद्रयान -2 मोहिमेला दोन वर्ष पुर्ण :
- चंद्रावर मॅगनिज आणि क्रोमियम या मुलद्रव्यांचे अस्तित्व चांद्रयान -2 यानाने शोधले आहे. या मुलद्रव्यांचे प्रमाण नगण्य स्वरुपात आहे.
- चांद्रयान -2 मोहिमेला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने ‘ल्युनर सायन्स वर्कशॉप’ चे आयोजन केले होते. यावेळी या शोधाबद्द्ल माहिती देण्यात आली.
- चांद्रयान -2 हे चंद्राभोवती 100 किलोमीटर उंचीवर फिरत असून त्यावरील वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून आणखी पुढील काही वर्षे नवीन माहिती मिळत राहील असा विश्वास इस्त्रोचे अध्यक्ष डॉ के सीवन यांनी यावेळी व्यक्त केला.
- तर चांद्रयान -2 ने चंद्राभोवती 9000 प्रदक्षिणा पूर्ण केल्या असल्याचंही यावेळी जाहिर करण्यात आलं.
- चांद्रयान -2 यान हे 22 जुलै 2019 ला प्रक्षेपित करण्यात आलं होतं.
‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धाचा भारत यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार:
- गतविजेता भारत यंदाही ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार आहे.
- भारताने गतवर्षी रशियासह संयुक्तरीत्या ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
- तर यंदाच्या ऑलिम्पियाड स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.
- ऑनलाइन स्वरूपात होणारी ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यातच चुरस असेल, असे ठिपसे यांनी नमूद केले.
दिनविशेष :
- 8 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.
- 8 सप्टेंबर – जागतिक शारीरिक उपचार दिन.
- 8 सप्टेंबर 1954 मध्ये साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना झाली.
- स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने 8 सप्टेंबर 1962 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.
- मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून 8 सप्टेंबर 1991 मध्ये स्वतंत्र झाला.