11 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
11 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 सप्टेंबर 2021)
चांद्रयान-2च्या मदतीने अधिक चांगल्या दर्जाचे संशोधन :
- चांद्रयान 2 आर्बिटरवर असलेल्या पेलोडच्या मदतीने जी माहिती मिळाली आहे त्यातून अभिनव पद्धतीचे निष्कर्ष हाती आल्याचा दावा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने केला आहे.
- तर या ऑर्बिटर यानावर आठ वैज्ञानिक पेलोड आहेत. पेलोड म्हणजे वैज्ञानिक संशोधनासाठी वापरली जाणारी उपकरणे असतात.
- चांद्रयान लार्ज एरिया सॉफ्ट एक्सरे स्पेक्ट्रोमीटर, सोलर एक्स रे मॉनिटर, चंद्रा अॅटमोस्फॉरिक कंपोझिशनल एक्सप्लोअरर, ड्युअल फ्रिक्वेन्सी. इन्फ्रा रेड स्पेक्ट्रोमीटर, टेरेन मॅपिंग कॅमेरा, आर्बिटर हाय रेझोल्यूशन कॅमेरा व ड्युअल फ्रिक्वेन्सी, रेडिओ सायन्स एक्स्परिमेंट हे पेलोड त्यात आहेत.
- तसेच या आठवड्याच्या सुरुवातीपासून चांद्र विज्ञानाबाबत इस्रोने कार्यशाळा सुरू केली असून भारतातील शैक्षणिक संस्था, विद्यार्थी व सर्व शाखांतील व्यक्तींना चंद्राच्या संशोधनाची माहिती खुली करून देण्यात आली आहे. चांद्रयान2 आर्बिटर यानाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
- इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी या कार्यशाळेचे बंगळूरु येथील मुख्यालयात उद्घाटन केले.
- मास स्पेक्ट्रोमीटर चेस -2 ने चंद्राच्या पृष्ठभूमीवरील व एक्झोस्पीअरमधील अरगॉन 40 चा अभ्यास केला आहे. त्यामुळे तेथे काही प्रमाणात किरणोत्सारी प्रक्रिया आढळून आल्या आहेत.
- चंद्रावर क्रोमियम व मँगेनीजचे अस्तित्वही आढळून आले आहे. एक्सएसएम पेलोडने सूर्याच्या ज्वाळांचा चंद्रावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे.
- आयआयआर पेलोडच्या मदतीने हायड्रॉक्सिल रेणू, पाण्याचे बर्फ सापडले असून हायड्रेशनचे (जलीकरण) गुणधर्म तेथे आढळून आले आहेत.
- डीएएफएसएआर या उपकरणाच्या मदतीने चंद्रावर पृष्ठभागाखालील बर्फाचे अस्तित्व सापडले आहे.
Must Read (नक्की वाचा):
हरयाणात इतिहासाच्या अभ्यासक्रमात सरस्वती नदीचा लवकरच समावेश :
- हरयाणा सरकारने पौराणिक सरस्वती नदी व कुरूक्षेत्र यांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याचे ठरवले आहे.
- तर सुरुवातीला सरस्वती वारसा विकास मंडळाने 11 सदस्यांचे अभ्यासक्रम मंडळ नेमले असून त्यात कुरूक्षेत्र विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अभ्यास विभागाचे सहायक प्राध्यापक प्रीतम सिंह हे अभ्यासक्रम मंडळाचे प्रमुख असतील.
- सहावी ते दहावीच्या मुलांसाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे.
- सरस्वती ही प्राचीन नदी होती, तिची ओळख मुलांना असली पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे.
- दरम्यान हरयाणा सरकारने सरस्वती नदीच्या उत्थानासाठी 11 प्रकल्प राबवले आहेत. कुरूक्षेत्राच्या इतिहासाचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- 11 सप्टेबर 1756 मध्ये होप हिरा चोरला गेला.
- म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द 11 सप्टेमबर 1906 मध्ये पहिल्यांदा वापरला.
- आझाद हिंद सेनेने जन गण मन 11 सप्टेबर 1942 मध्ये राष्ट्रगीत म्हणून गायले.
- 11 सप्टेबर 1885 मध्ये इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म झाला.