27 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

सानिया मिर्झा
सानिया मिर्झा

27 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 सप्टेंबर 2021)

अमेरिकेने 157 पुरातन भारतीय वस्तू पंतप्रधान मोदींकडे सोपवल्या :

  • संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली.
  • तर या दौऱ्यामध्ये अमेरिकेनं तब्बल 157 दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तू पंतप्रधानांकडे सोपवल्या आहेत.
  • तसेच यामध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील समावेश आहे.
  • मोदींच्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान या दुर्मिळ वस्तू अमेरिकेने दिल्या असून त्या आता पुन्हा भारतात येणार आहेत.
  • यात दहाव्या शतकातील रेवंता यांचा तब्बल दीड मीटर लांबीचा बास रिलीफ पॅनल, तसेच 12व्या शतकातील साडेआठ सेंटिमीटर उंचीची ब्राँझची नटराजनची मूर्ती देखील आहे.
  • शिवाय यातल्या साधारण 45 कलाकुसरीच्या वस्तू या मध्ययुगीन काळातील आहेत.

ऑनलाईन बेटिंग आणि जुगारावर कर्नाटकात बंदी :

  • कर्नाटकातील वाढते ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजी थांबवण्यासाठी कर्नाटक विधानसभेत कर्नाटक पोलीस (सुधारणा) विधेयक 2021 मंजूर करण्यात आले आहे.
  • तर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीशी संबंधित लोकांवर या विधेयकामुळे बंदी घालण्यास मदत होणार आहे.
  • कर्नाटक विधानसभेने मंगळवारी कर्नाटक पोलीस अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करण्यासाठी एक विधेयक मंजूर केले जे ऑनलाइन जुगारासह राज्यातील सर्व प्रकारच्या जुगारावर बंदी घालते.
  • कर्नाटक पोलीस (सुधारणा) विधेयक, 2021 हे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी सादर केले आणि जुगारच्या नवीन प्रकारांना हाताळण्यात पोलिसांच्या क्षमतेबद्दल विरोधकांच्या संशयादरम्यान ते पास केले गेले
  • तसेच सुधारित कायद्यात जुगारासाठी एक वर्षाऐवजी तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
  • कायद्याने केवळ घोड्यांच्या शर्यतींवर जुगार खेळण्याला सूट दिली आहे. यामुळे गेमिंग उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे.

विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा :

  • विराट कोहलीने टी 20 मध्ये 10 हजार धावांचा पल्ला गाठला आहे.
  • तर अशी कामगिरी करणार विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 13 धावा केल्यानंतर त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
  • तसेच आतापर्यंत हा विक्रम चार खेळाडूंच्या नावावर आहे.
  • ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेविड वॉर्नरच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम आहे.
  • यापूर्वी विराट कोहली आयपीएलमध्ये 6 हजारपेक्षा जास्त धावा करणारा एकमेक खेळाडू ठरला आहे.

भारत – कॅनडा थेट विमानसेवा सुरू :

  • कॅनडाने सुमारे 5 महिन्यांनंतर भारतातून थेट उड्डाणांवरील बंदी उठवली आहे.
  • त्यानंतर आता विमान सेवा देणाऱ्या कॅनडा एअर सोमवारपासून दोन्ही देशांदरम्यान थेट उड्डाणे सुरू करू शकणार आहे.
  • त्याचबरोबर, भारतातील एअर इंडिया 30 सप्टेंबरपासून उड्डाण सुरू करू शकणार आहे.
  • भारतातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारने भारतातून प्रवासी उड्डाणांवर लावण्यात आलेली बंदी रविवारी उठवली आहे.
  • तर यासाठी नकारात्मक कोविड अहवाल महत्त्वाचा असणार आहे.

सानिया मिर्झाला जेतेपद :

  • भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने चीनच्या शुआई झांगसोबत खेळताना ओस्ट्राव्हा खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
  • तर यंदाच्या हंगामातील सानियाचे हे पहिलेचे जेतेपद ठरले.
  • सानिया आणि शुआई या दुसऱ्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात केटलिन क्रिस्टियन आणि एरिन रूटलिफ या जोडीवर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली.
  • सानियाचे हे कारकीर्दीतील 43वे डब्ल्यूटीए जेतेपद ठरले.

दिनविशेष:

  • 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन आहे.
  • सन 1825 मध्ये द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
  • 27 सप्टेंबर 1925 रोजी डॉ. केशव हेडगेवार व्दारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना करण्यात आली.
  • भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म 27 सप्टेंबर 1953 मध्ये झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.