13 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

13 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2021)

भारतीय अवकाश संघटनेची ( ISpA) स्थापना :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अवकाश संघटनेची म्हणजेच Indian Space Association (ISpA) ची स्थापना केली.
  • अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाच्या वाढत्या गरज पुर्ण करण्यास ही संघटना मदत करणार आहे.
  • तर या संघटनेचे नेतृत्व अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोकडे असणार आहे.
  • भारतीय अवकाश संघटनेमध्ये भारती एअरटेल, लार्सन अन्ड टुब्रो, नेल्को, वन वेब, मॅपइंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्या या संस्थापक सदस्य आहेत.
  • कृत्रिम उपग्रहांचा विविध क्षेत्रातला वापर हा देशात दिवसेंदिवस वाढत आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 ऑक्टोबर 2021)

अमेरिकेच्या तिघा अर्थशास्त्रज्ञांना नोबेल :

  • अमेरिकेच्या तिघा अर्थशास्त्रज्ञांना 2021 या वर्षांतील अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
  • कामगार बाजारपेठेवर किमान वेतन, स्थलांतर, शिक्षण यांचा होणारा परिणाम यांच्या अभ्यासासाठी त्यांनी शास्त्रीय पद्धत शोधून काढली आहे.
  • तर यासंबंधी सर्वसाधारण अभ्यास पद्धतीतून निष्कर्ष काढता येत असले तरी ते फारसे अचूक नसतात, त्यामुळे या तिघांनी शोधून काढलेली वैज्ञानिक पद्धत ही महत्त्वाची आहे.
  • कॅनडात जन्मलेले डेव्हिड कार्ड हे बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांना पुरस्काराचा निम्मा भाग मिळणार आहे, तर उर्वरित भाग मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूटचे जोशुआ अँग्रीस्ट, स्टॅनफर्ड विद्यापीठाचे जन्माने डच असलेले अर्थशास्त्रज्ञ गिडो इम्बेन्स यांना दिला जाणार आहे.
  • कार्ड यांनी किमान वेतनातील वाढीचा परिणाम तपासण्यासाठी पूर्व पेनसिल्वेनिया व न्यूजर्सी येथील काही रेस्टॉरंट्सचा अभ्यास केला.

सूर्यमालेबाहेरील पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचा मिळाला एक नवा मार्ग :

  • क्वीसलॅड विद्यापीठाचे डॉ बेंजामिन पोप आणि नेदरलॅड इथली ‘राष्ट्रीय वेधशाळा’ यांनी संयुक्तरित्या संशोधन करत पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे.
  • आर यामुळे रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून सूर्यमालेबाहेर ,आपल्या आकाशगंगेत विविध ताऱ्यांच्या भोवती असलेले पृथ्वीसदृश्य ग्रह शोधण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे.
  • विद्युत चुंबकीय विकिरणातील एक भाग म्हणजे रेडिओ सिग्नल. आकाशगंगेत कृष्णविवर, अवकाशातील धुलीकण ज्याच्यातून ताऱ्यांची निर्मिती होते असते अशा ठिकाणाहून रेडिओ सिग्नल येत असतात.
  • त्याचबरोबर रेडिओ सिग्नलचा आणखी स्त्रोत म्हणजे गुरु आणि शनी सारखे जे मोठे ग्रह.
  • अशा महाकाय ग्रहांभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र आणि सौर वारे यांमुळे ध्रुवीय प्रकाश (Aurorae) तयार होत रेडिओ सिग्नलची निर्मिती होते. तेव्हा ग्रहांपासून मिळणाऱ्या रेडिओ सिग्नलच्या प्रकाराबद्दल माहिती होती.

टाटा मोटर्समध्ये TPG करणार 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक :

  • जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने मोठी घोषणा केली आहे. प्रवासी इलेक्ट्रीक वाहन उद्योगात टीपीजी राईट क्लायमेट उद्योग समुहाद्वारे 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
  • तर ही गुंतवणूक 18 महिन्यांच्या कालावधीत काही फेऱ्यांमध्ये केली जाईल.
  • तसेच टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन विभागासाठी TML EVCo हे नवीन युनिट तयार केले आहे.
  • गुंतवणुकीची पहिली फेरी पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल असे कंपनीने म्हटले आहे. सुमारे 9.1 अब्ज डॉलर्सच्या मूल्यावर टीपीजीला युनिटमध्ये 11-15 टक्के हिस्सा मिळेल.

शफालीची दुसऱ्या स्थानावर घसरण :

  • भारताची सलामीवीर शफाली वर्माची एका स्थानाने घसरण झाली असून, ‘आयसीसी’च्या महिलांच्या ट्वेन्टी-20 क्रमवारीमधील फलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • मात्र स्मृती मानधनाने आपले तिसरे स्थान कायम राखले आहे.
  • मंगळवारी प्रकाशित झालेल्या ‘आयसीसी’च्या ताज्या क्रमवारीत शफालीच्या खात्यावर 726 गुण आणि स्मृतीच्या 709 गुण जमा आहेत.
  • तसेच क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व दिसून आले असून, बेथ मुनी 754 गुणांसह अग्रस्थानावर आहे.
  • तर कर्णधार मेग लॅनिंग चौथ्या आणि एलिसा हिली सहाव्या स्थानावर आहेत.

दिनविशेष:

  • 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन आहे.
  • स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते ‘भुलाभाई देसाई‘ यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
  • सन 1773 मध्ये चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
  • सन 1929 या वर्षी पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 ऑक्टोबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.