इतिहासाच्या अभ्यासाची साधने
इतिहासाच्या अभ्यासाची साधने
Must Read (नक्की वाचा):
- सजीवाची उत्क्रांती – पहिला सजीव पाण्यात जन्मास झाला असे म्हटले जाते. हा सजीव एकपेशीय प्राणी अमिबा होय. त्यानंतरच्या काळात पृथ्वीवर सजीवांची उत्क्रांती होवून अनेक जीव जन्माला आले.
यापैकी काही जीव पाण्यात होते तर काही जमिनीवर होते. त्यापैकी बेडूक हा एक प्राणी आहे.
- नंतरच्या काळात उत्क्रांती होवून वनस्पती, पक्षी आणि हत्ती सारखे प्रचंड आकारमानाचे प्राणी निर्माण झाले.
- ज्या सजीवांनी बदलत्या पर्यावरणाशी स्वत:ला जुळून घेतले असे प्राणी काळाच्या ओघात जीवंत राहिले. डायनासोरसारखे प्राणी जे पर्यावरणाशी जुळवून घेवू शकले नाही ते काळाच्या ओघात हे प्राणी नष्ट झाले.
आदिमानवाचा जन्म :
- सजीवाची उत्क्रांती होण्याच्या ओघात माकडासारखा प्राणी जन्माला आला. त्याला शेपूट नव्हते. त्याचे डोके माकडापेक्षाही मोठे होते. त्याचा पाठीत बाक होता आणि हा प्राणी दोन पायावर चालत असे. त्याचे हात गुडग्यापर्यंत लांब होते. त्याच्या भुवयावर जाड केस होते व संपूर्ण शरीरभर केस होते हा प्राणी म्हणजे आदिमानव होय.
- कालांतराने या प्राण्याच्या ठेवणीत बदल होवून आजचा आधुनिक मानव निर्माण झालेला आहे.
- मानवाचे वैशिष्टे : आजच्या आधुनिक मानवाचे खालील वैशिष्टे आहे.
- मानव हा सजीव सृष्टीमधील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे.
- इतर प्राण्यापेक्षा मानवाचा हाताचा सहज हलू शकतो त्यामुळे त्यास हाताच्या इतर बोटाच्या सहाय्याने कोणतीही वस्तु हातात पकडता येते.
- मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हत्तीसारख्या प्राण्यास नियंत्रणात आणले आहे आणि निसर्गातील सर्व साधनांचा उपयोग करण्याची क्षमता प्राप्त केली आहे.
- मानवाने भाषेचा विकास केला असून त्याव्दारे त्याने आपले अनुभव शब्दबद्ध करून येणार्या पिढीला ज्ञान म्हणून उपलब्ध करून दिले आहे. या घटनेमुळे मानवाचा विकास होत आहे.
इतिहासाचा महत्व व अभ्यास :
- सजीवाच्या उत्क्रांतीमध्ये मानवाला विशेष महत्व आहे. मानवाने निसर्गाशी लढत देत आणि प्रयत्न व प्रमाद पद्धतीचा वापर करून आजची प्रगती साधली आहे. कशाप्रकारे प्रगती साधली याची माहिती देणारा घटक म्हणजे इतिहास होय. भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहिती देणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय.
- अशा शब्दात इतिहासाची व्याख्या केली जाते. इतिहासावरून भूतकाळात विकसित झालेल्या मानवी संस्कृतीची माहिती मिळते. इतिहासाचे प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक असे तीन खंड पडतात.
- भूतकाळ घडलेल्या घटनेचा अभ्यास करून भविष्यकाळाकरिता नियोजन करणे, हा इतिहासाच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश असतो.
- पूर्वजांनी केलेल्या चुका टाळून भविष्यकाळात प्रगती साधने हा इतिहासाच्या अभ्यासाचा मुख्य हेतू असतो.
इतिहासाची कालगणना :
- भूतकाळात घडलेल्या घटनांचा कालानुक्रम ठरविण्याकरिता कालगणना करणे महत्वाचे असते. स्थूलमानाचे जगात कालगणना करण्याकरिता गॅगरिअन पंचागचा वापर केला जातो.
- स्थूलमानाचे येशू ख्रिस्ताचा जन्म हा गॉगरियन पंचागाचा पहिला दिवस मानला जातो.
- अरबी भाषेत येशू ख्रिस्ताला ईसा म्हणतात.
- ईसा या शब्दावरून ईसवी हा शब्द तयार झाला.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर सोईचे व्हावे म्हणून ईसविला सन किंवा साल असे संबोधन करण्याची पद्धत जगभर रूढ झाली.
- ख्रिस्त जन्मापूर्वीच्या घटना ईसवी सन पूर्व या नावाने ओळखल्या जातात व नंतरच्या घटना ईसवी सन म्हणून सबोधल्या जातात.
ऐतिहासिक अभ्यासाची साधने :
- प्राचीन काळामध्ये मानवाने वापलेल्या वस्तु आजही सापडतात अशा अवशेषांना ऐतिहासिक अवशेष असे म्हटले जाते. यामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनात वापरावच्या वस्तू, त्याचबरोबर भांडी, अलंकार, किल्ले, लेणी, स्तूप, नाणी, प्राचीन शिलालेख, चालीरिती, परंपरा, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा समावेश होतो.
- या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात. ज्याच्या सहाय्याने त्या काळातील लोकांचे राहणीमान व जीवनप्रणालीची माहिती मिळते.
- इतिहासाच्या साधनांचे एकूण भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे तीन प्रकार पडतात.
1. भौतिक साधने – यामध्ये पुढील साधनांचा समावेश होतो.
- धातू व दगडाची हत्यारे व भांडी – मानवी जीवनाला सुरुवात झाल्यापासून मानवाने आपली जिवनप्रक्रिया पार पाडण्याकरिता विविध प्रकारची भांडी आणि साधने तयार केली. आदिमानवाच्या काळात दगडाची साधने वापरली गेली तर त्यानंतरच्या काळात भांडी व हत्यारे तयार करण्याकरिता तांब्याचा वापर केला गेला. आजही साधने अवशेषांच्या स्वरुपात सापडतात. ज्यांच्या सहाय्याने आपणास त्याकाळाच्या लोकांच्या राहणीमानाची कल्पना येते. यामध्ये प्रामुख्याने भांडी, हत्यारे, इत्यादि.
- पुरातन वास्तु – यामध्ये त्याकाळातील जनतेची घरे, मंदिरे, किल्ले, इमारती, नगररचना, यांचा समावेश होतो. ज्याव्दारे त्याकाळातील लोकाचे शिल्पकलेच्या रचनेची माहिती मिळते.
- पुरातन अवशेष – भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शहरेच्या शहरे जमिनीच्या आत गाडल्या गेली. अशा ठिकाणचे उत्खनन केल्यास, त्या ठिकाणी अवशेषाच्या स्वरुपात भांडी व भांड्याचे तुकडे, दागदागीने अन्नधान्याच्या बिया यांच्या माध्यमातून त्या काळातील इतिहासिक माहिती मिळते. याला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात. ज्या शास्त्राव्दारे याचा अभ्यास केला जातो. त्यास पुरातत्व विद्या असे म्हणतात.
2. लिखित साधने – लिखित साधनांमध्ये लेण्याच्या भिंतीवर लिहिलेले लेख, शिलालेख, ताम्रपत्र, भांडी व कच्या विटांवर केलेले लेखन, पपारस, झाडांच्या साली, भुर्जपत्रे लावर केलेल्या लेखणाचा समावेश होतो. ज्याव्दारे त्याकाळात घडलेल्या घटनांची माहिती मिळते.
3. मौखिक साधने – यामध्ये पाठांतराच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या साहित्यांचा समावेश होतो. ज्यामध्ये कथा, भारुडे, ओव्या, लोकगीते इत्यादींच्या माध्यामातून त्या काळात घडलेल्या घटनेची माहिती मिळते.