25 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs
25 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 मार्च 2022)
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी भारतभेटीवर :
- चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे गुरुवारी भारतभेटीवर येऊन पोहोचले.
- तर सुमारे दोन वर्षांपूर्वी पूर्व लडाखमधील संघर्षांमुळे दोन्ही देशांतील संबंध तणावाचे झाल्यानंतर या दोन देशांत सर्वोच्च पातळीवर होत असलेली ही पहिलीच भेट आहे.
- तसेच वांग हे काबूलहून नवी दिल्लीला आले असून, शुक्रवारी सायंकाळी त्यांची परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा होऊ घातली आहे.
Must Read (नक्की वाचा):
ब्रिटनकडून युक्रेनला हजारो क्षेपणास्त्रांचा पुरवठा :
- युक्रेनला लष्करी सामग्रीचा पुरवठा वाढवावा असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले असून, स्वत: ब्रिटन युक्रेन सरकारला आणखी हजारो क्षेपणास्त्रे पाठवणार आहे.
- ‘नाटो’आणि जी-7 च्या नेत्यांशी बोलणी करण्यासाठी जॉन्सन ब्रसेल्सला जात आहेत.
- तर यात रणगाडाविरोधी आणि अत्यंत स्फोटक शस्त्रांचा समावेश असलेल्या आणखी 6 हजार क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
- तसेच ब्रिटनने यापूर्वीच 4 हजारांहून अधिक रणगाडाविरोधी शस्त्रे युक्रेनला पाठवली आहेत.
देश 31 मार्चपासून निर्बंधमुक्त :
- देशात दोन वर्षांपूर्वी करोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध 31 मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आह़े.
- करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी मुखपट्टीचा वापर आणि अंतरनियमाचे पालन यापुढेही करावे लागणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केल़े.
- देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वप्रथम 24 मार्च 2020 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या होत्या़.
- याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आह़े.
- तसेच लससक्तीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही निर्णय राखून ठेवला आहे.
- त्यामुळे लससक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अशा स्थितीत सुनावणी घेणे उचित होणार नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
चेन्नईची नेतृत्वधुरा धोनीकडून जडेजाकडे :
- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या 12 हंगामांमध्ये चार जेतेपदे आणि पाच उपविजेतेपदे जिंकून देण्याची किमया साधणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद गुरुवारी रवींद्र जडेजाकडे सुपूर्द केले.
- शनिवारपासून ‘आयपीएल’च्या 15व्या हंगामाला प्रारंभ होत असून, जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ कोलकाता नाइट रायडर्सशी सामना करणार आहे.
- तर 40 वर्षीय धोनी चेन्नईचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे, असे चेन्नई संघाकडून सांगण्यात आले.
- 2008 मध्ये ‘आयपीएल’च्या पर्वाला प्रारंभ झाल्यापासून सर्वात सातत्यपूर्ण आणि यशस्वी संघ म्हणून चेन्नई संघाची ख्याती आहे.
- तसेच चेन्नईचे नेतृत्व सांभाळणारा तो केवळ तिसरा खेळाडू असणार आहे.
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धात भारताला मोठा विजय आवश्यक :
- ‘आयसीसी’ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ ठरला.
- साखळी सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने दक्षिण आफ्रिका व विंडीज या दोन्ही संघांना समान एक गुण देण्यात आले.
- भारताला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या साखळी लढतीत मोठय़ा फरकाने विजय आवश्यक आहे.
- तसेच पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही, तरी एक गुण भारताच्या पथ्यावर पडू शकतो.
- भारताने आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी तीन विजय मिळवत एकूण सहा गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थान राखले आहे.
- भारताने पाकिस्तान, विंडीज आणि बांगलादेशला हरवले आहे.
दिनविशेष :
- 25 मार्च 1898 रोजी शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.
- अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 मध्ये झाला.