26 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs
26 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 मार्च 2022)
योगी आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे उच्चपदस्थ नेते यांच्या उपस्थितीत झालेल्या एका भव्य समारंभात योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली.
- तर केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली.
- तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आदित्यनाथ यांना शपथ दिली.
- 50 हजार लोक बसू शकण्याची व्यवस्था असलेल्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियममध्ये शपथविधी समारंभ पार पडला.
- सुरेश खन्ना, सूर्यप्रताप साही, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य आणि आधी सनदी अधिकारी असलेले व नंतर राजकारणात आलेले ए.के. शर्मा यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धात भारतीय कुमारी संघाला विजेतेपद :
- भारताने अखेरच्या साखळी लढतीत शुक्रवारी बांगलादेशकडून 0-1 अशी हार पत्करली.
- परंतु तरीही सरस गोलफरकाच्या आधारे कुमारी ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- भारताने (11) बांगलादेश (3) संघापेक्षा सरस गोलफरक.
- तर या स्पर्धेतील सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्या खेळाडूंचा आणि सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार लिंडा कोमने पटकावले.
- तर तिने एकूण पाच गोल झळकावले.
पुढील वर्षीपासून महिला ‘आयपीएल’:
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) पुढील वर्षीपासून महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटला प्रारंभ करण्याची योजना आहे, असे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी सांगितले.
- याचप्रमाणे एक वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा महिलांचे चार प्रदर्शनीय सामने होणार आहेत.
- महिलांचे ‘आयपीएल’ सुरू करण्यात दिरंगाई केल्यामुळे टीका होत असलेल्या ‘बीसीसीआय’ला आता वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे.
- पुरुषांच्या ‘आयपीएल’चे साखळी सामने चालू असताना तीन महिला संघांमध्ये चार प्रदर्शनीय सामने खेळवण्यात येणार आहेत.
दिनविशेष :
- 26 जानेवारी 1552 मध्ये गुरु अमर दास शिखांचे तिसरे गुरु बनले.
- इंदिरा नेहरू व फिरोज गांधी यांचा विवाह 26 जानेवारी 1942 मध्ये झाला.
- 26 जानेवारी 2013 मध्ये त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना.