3 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs
3 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 एप्रिल 2022)
यंदाचा मार्च ठरला 122 वर्षांमधील सर्वाधिक उष्ण महिना :
- भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, मार्च महिन्यातील तापमानाने मागील सर्व विक्रम मोडले आहेत, मार्च 1901 पासून 122 वर्षांतील हा भारतातील सर्वात उष्ण मार्च ठरला आहे.
- भारतीय हवामान विभागाने सांगितले की, ‘मार्च 2022 ची मासिक सरासरी 33.1 डिग्री सेल्सियस आहे. जी 2021 मधील 33.09 डिग्री सेल्सियसचा मागील विक्रम मोडीत काढते.
- IMD अधिकाऱ्यांनी सांगितले की, दीर्घकाळापर्यंत दुष्काळामुळे वायव्य भारतात उष्ण हवामान निर्माण झाले आहे.
- गुरुवारी दिल्लीच्या काही भागांमध्ये तीव्र उष्मा होता, तीन ठिकाणी कमाल तापमान 41 अंशांच्या पुढे गेले.
- 3 ते 6 एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारत-ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार करार :
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापारविषयक करारावर शनिवारी उभय बाजूने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- दोन्ही देशांसाठी हा करार अत्यंत लाभदायक असल्याचा दावा करण्यात येत असून भारतातून निर्यात होणाऱ्या 96 टक्के वस्तूंवर आता ऑस्ट्रेलियात शुन्य करआकारणी होईल.
- तर यात अभियांत्रिकी वस्तू, दागिने आणि जडजवाहिर, वस्त्रे, चामडय़ाच्या वस्तू आदींचा समावेश आहे.
- यातून दोन्ही देशांतील वस्तू आणि सेवा पुरवठादारांना उत्तेजन मिळणार आहे.
- तसेच पाच वर्षांत ही उलाढाल 4500 ते 5000 कोटी डॉलरवर जाण्याची शक्यता आहे.
- तर सध्या ही उलाढाल 2700 कोटी डॉलर इतकी आहे.
- यातून भारतात 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.
- तसेच या करारानुसार आयातशुल्क माफीची योजना पाच वर्षांत शंभर टक्के भारतीय वस्तूंना लागू केली जाणार आहे.
प्रो लीग हॉकीत भारताची इंग्लंडवर सरशी :
- भारतीय पुरुष हॉकी संघाने प्रो लीगमधील चांगली कामगिरी सुरू ठेवताना शनिवारी इंग्लंडवर 3-3 अशा नियमित वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशी सरशी साधली.
- टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने यंदा प्रो लीग हॉकीमध्ये सातत्यपूर्ण खेळ केला आहे.
- तर त्यांचा हा नऊ सामन्यांतील पाचवा विजय ठरला असून हा संघ 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
- दुसऱ्या स्थानावरील जर्मनीच्या खात्यावर 17 गुण असून ते भारतापेक्षा एक सामना कमी खेळले आहेत.
- किलगा स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्याच्या पूर्वार्धात यजमान भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका जाहीर :
- यंदा कतार येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रंगणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी जाहीर करण्यात आली.
- जगातील सर्वात मोठी महासत्ता अमेरिका आणि इराण यांचा एकाच गटात समावेश आहे.
- तर या दोन देशांतील वितुष्टामुळे ‘ब’ गटातील या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
- विश्वचषकासाठीच्या ‘लईब’ नामक बोधचिन्हाचे ‘फिफा’कडून अनावरण करण्यात आले.
- लईब या अरेबियन शब्दाचा अतिकुशल खेळाडू असा मराठीत अनुवाद होतो. ‘लईब’ सर्व वयोगटांतील चाहत्यांना विश्वचषकाकडे आकर्षित करेल अशी आयोजकांची धारणा आहे.
XE नावाचा करोनाचा नवा व्हेरियंट :
- तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील करोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.
- अशातच जागतिक आरोग्य संघटनेने चिंता वाढवणारी माहिती दिली आहे.
- XE नावाचा करोनाचा नवा व्हेरियंट हा ओमायक्रॉनच्या BA.2 सब-व्हेरियंटपेक्षा दहा टक्के जास्त संक्रमणक्षम असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.
- आत्तापर्यंत, ओमायक्रॉनचा BA.2 सब-व्हेरियंट हा सामान्य संसर्गजन्य प्रकार मानला जात होता.
- BA.2 हा अनेक देशांमध्ये पसरला असून युकेमध्ये नवीन रुग्ण याच व्हेरियंटमुळे वाढले आहेत.
- परंतु नवीन XE हा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2. या दोन प्रकारातून म्युटेट होऊन तयार झाल्याचं म्हटलं जातंय.
- XE रीकॉम्बिनंट हा व्हेरियंट सर्वात आधी 19 जानेवारी रोजी यूकेमध्ये आढळून आला.
राष्ट्रीय कॅरम स्पर्धात महाराष्ट्राला सांघिक जेतेपद :
- दादर येथील हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे सुरू असलेल्या 49व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिलांच्या आंतरराज्य सांघिक गटात महाराष्ट्राने तमिळनाडूवर 2-1 असा विजय मिळवत जेतेपद प्राप्त केले.
- महिलांमध्ये तमिळनाडूच्या जे. अभिन्याने महाराष्ट्राच्या आकांक्षाला 21-16, 24-11 असे नमवून संघाला चांगली सुरुवात करून दिली.
- परंतु चुरशीची झुंज देत महाराष्ट्राच्या केशर निर्गुणने तमिळनाडूच्या अविष्काला 5-25, 25-15, 25-0 असे पराभूत करून बरोबरी साधली.
- मग दुहेरीत महाराष्ट्राच्या श्रुती सोनावणे व मैत्रेयी गोगटेने तमिळनाडूच्या एल. अम्मा शवर्थिनी व वी मिथराला जोडीला 15-11, 16-22, 17-15 असे हरवले.
- आंतरसंस्था सांघिक गटात पेट्रोलियम क्रीडा मंडळाने दुहेरी यश मिळवले.
दिनविशेष:
- सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म 3 एप्रिल 1882 मध्ये झाला.
- मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 रोजी झाला होता.
- सन 1948 मध्ये ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- मार्टिन कूपर या मोटोरोलो कंपनीतील संशोधकाने 1973 मध्ये जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
- सन 2000 मध्ये आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.