चुकीचे पद ओळखा (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

Chukiche Pad Olakha

चुकीचे पद ओळखा (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

चुकीच्या पदामध्ये दिलेल्या संख्यामालिकेतील एक पद वगळता इतर सर्व पदे एका सुत्राने जोडलेली असतात तर त्यापैकी एक पद हे त्या सुत्रापेक्षा वेगळे असते. अशा प्रकारची उदाहरणे सोडवितांना प्रथम त्या संख्यामालिकेतील सर्व पदांना जोडणार्‍या सुतराचा शोध घ्यावा लागतो. नंतर त्या सुत्राच्या आधारे आपणाला चुकीचे पद शोधता येते.

उदा. 1. 2, 5, 10, 50, 500, 5000.

  • 10
  • 50
  • 500
  • 5000
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील प्रत्येक पद हे पहिल्या दोन पदाचा गुणाकार आहे. यापैकी 5000 संख्येला हे सुत्र लागू होत नाही. यामुळे उत्तर 5000 हे आहे.

उदा. 306, 342, 380, 421, 462.

  • 306
  • 342
  • 421
  • 462
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील पदामध्ये अनुक्रमे 36 + 2, 4, 6, –, …. संख्या मिळविण्यात आली आहे. यानुसार 420 ऐवजी 421 अंक आला आहे. यामुळे 421 हे उत्तर आहे.

उदा. 1, 4, 8, 9, 16, 25.

  • 1
  • 4
  • 8
  • 16
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील 8 वगळता इतर सर्व संख्या पूर्ण वर्ग आहेत. यामुळे 8 हे उत्तर आहे.

उदा. 3, 5, 7, 9, 11, 13, 17.

  • 5
  • 9
  • 13
  • 17
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील 9 वगळता इतर संख्या मूळ संख्या आहेत. यामुळे 9 हे उत्तर आहे.

उदा. 1, 8, 9, 27, 64, 125.

  • 1
  • 8
  • 9
  • 27
स्पष्टीकरण :
वरील संख्यामालिकेतील 9 वगळता इतर सर्व संख्या पूर्ण घन आहेत. यामुळे 9 हे उत्तर आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.