21 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs
21 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 जून 2022)
‘अग्निपथ’ योजनेसंबंधी महत्वाचा निर्णय होणार :
- केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभरात आंदोलन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्यदल प्रमुखांची भेट घेणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांना भेटणार आहेत.
- अग्निपथ योजनेला होणार विरोध आणि त्यानंतर सैन्यदल प्रमुखांनी त्यावर जाहीर केलेली भूमिका या पार्श्वभूमीवर सर्वांच लक्ष या बैठकीकडे असेल.
- दरम्यान अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असताना लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला.
- त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील, असा इशाराही दिला.
Must Read (नक्की वाचा):
तृतीयपंथी जलतरणपटूंसाठी जागतिक संघटनेकडून नवे धोरण :
- जागतिक जलतरण संस्थेने (फिना) तृतीयपंथी खेळाडूंसाठी नवे धोरण स्वीकारले असून याअंतर्गत वयाच्या 12व्या वर्षांपूर्वी संक्रमण केलेल्या जलतरणपटूंनाच महिलांच्या स्पर्धामध्ये सहभाग घेण्याची परवानगी असेल.
- ‘फिना’च्या सदस्यांनी रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या ‘लिंग समावेश धोरणा’च्या बाजूने 71.5 टक्के मतदान केले.
- त्यामुळे सोमवारपासून सर्व स्पर्धासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
- 24 पानी धोरणात नव्या ‘खुल्या स्पर्धा’ श्रेणीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे.
- एक नवीन गट स्थापन करण्यात येणार असून तो पुढील सहा महिने ही नवीन श्रेणी कशा पद्धतीने योग्यपणे तयार करता येईल याबाबतचा आढावा घेईल,असे ‘फिना’कडून सांगण्यात आले.
- गेल्या गुरुवारी सायकिलगच्या जागतिक संस्थेने तृतीयपंथी खेळाडूंसाठीचे नियम अधिक कठोर करताना पात्रता नियमांत बदल केले.
- त्यामुळे तृतीयपंथी सायकलपटूंना स्पर्धामध्ये सहभागी होण्यापूर्वी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- आंतरराष्ट्रीय सायकल संघटनेने (यूसीआय) टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाच्या किमान पातळीचा संक्रमणाचा काळ दोन वर्षांपर्यंत वाढवला असून कमाल स्वीकाहार्य पातळी कमी केली आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा :
- येत्या 28 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
- या स्पर्धेत जवळपास 72 देशांतील पाच हजार 54 खेळाडू सहभाग घेण्याची शक्यता आहे.
- या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने सोमवारी 18 सदस्यीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाची घोषणा केली आहे.
- मनप्रीत सिंगची कर्णधारपदी तर ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
- राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय संघाला इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना सोबत पूल ‘ब’मध्ये ठेवण्यात आले आहे.
16 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या मर्जीने लग्न करु शकते:
- अल्पवयीन विवाहाबाबत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एक मोठा निकाल जाहीर केला आहे.
- एका खटल्याची सुनावणी करताना न्यायलयाने म्हटले आहे की, 16 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या मर्जीने लग्न करु शकते.
- न्यायमूर्ती जसजित सिंग बेदी यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर केला आहे.
- 21 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुस्लीम मुलगी या प्रेमी जोडप्याने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दिनविशेष :
- 21 जून हा दिवस जगभरात ‘जागतिक योग दिन‘ म्हणून पाळला जातो.
- भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म 21 जून 1912 मध्ये झाला.
- सन 1948 मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले होते.
- 21 जून 1949 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात 21 जून 2015 पासून झाली.