Current Affairs (चालू घडामोडी) of 12 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | सरकारी कर्मचार्यांना अपघात विमा कवच |
2. | महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांविषयी कायदा होणार |
3. | राज्यात 13 जानेवारीपासून ‘हमारा जल हमारा जीवन’ अभियान |
4. | दिनविशेष |
सरकारी कर्मचार्यांना अपघात विमा कवच :
- राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचार्यांना यापुढे अपघात विमा कवचाचा लाभ होणार आहे.
- सरकारी नोकरीत प्रवेश केल्यानंतर पदाला अनुसरून हक्काचे आणि काही अनुषंगिक लाभ कर्मचारी-अधिकारी यांना मिळतील.
- कर्मचारी-अधिकारी यांना सध्या गटविमा आहे मात्र हा विमा जीवन विम्याशी निगडीत आहे.
- विम्याचे स्वरूप –
- वर्ग 3 – 15 लाखांपर्यंत
- वर्ग 2 – 15 ते 25 लाख
- वर्ग 1 – 25 ते 50 लाख
महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांविषयी कायदा होणार :
- एक हजार पोलिस करडी नजर ठेवणार असून दहशतवादी कारवायांवरही त्यांचे लक्ष राहणार आहे.
- आंतरराष्ट्रीय दहशतवादाबरोबरच आर्थिक गुन्हेगारी, फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी, ऑनलाइन बँकिंग व्यवहार, एलपीजी ग्राहकांना सबसिडी देण्यासाठी केली जाणारी मदत अशा वेगवेगळ्या व्यवहारांतर्गत होणार्या घटनांकडे लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे.
- इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवता येईल.
राज्यात 13 जानेवारीपासून ‘हमारा जल हमारा जीवन’ अभियान :
- पहिल्या टप्प्यात त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या एका गावाची निवड करून त्या गावामध्ये पाण्याच्या सर्व गरजा भागवण्यासाठी नियोजन व अमलबजावणी करण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- 12 जानेवारी – राष्ट्रीय युवा दिन
- 1863 – भारतीय तत्वज्ञानाचा सर्व जगभर प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा कोलकत्ता येथे जन्म झाला.
- 1936`– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.
- 2005 – अमेरिकेच्या ‘नासा’या अवकाश संशोधन केंद्राने सूर्यमालेविषयीचे अनुत्तरित प्रश्न सोडविण्यासाठी ‘डिस्कव्हरी’ मोहिमेंतर्गत ‘डीप इंम्पॅक्ट’ नावाचे 33 कोटी डॉलर किमतीचे अवकाशयान अंतराळात सोडले.
- 2009 – प्रख्यात संगीतकार ए.आर.रेहमान यांना ‘स्लमडॉग मिलेनिअर‘ चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीतकाराला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला. ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळविणारे रेहमान पहिले भारतीय आहेत.