Rajyaseva Pre-Exam Question Set 3

Rajyaseva Pre-Exam Question Set 3

राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्र. 2. (2 फेब्रुवारी 2014)

प्रश्न क्रमांक 1 ते 5 :

त्रिस्तरीय लेझरच्या सर्वात सोप्या प्रकारात, अंशस्थिर अणूंच्या एकत्रीकरणातून निर्माण होणारी ऊर्जा, तिच्या निम्नतम स्थितीपेक्षा जास्त असून सुद्धा तिचा र्हास स्थिर असतो. निम्नतम स्थितीत रूपांतर होण्यापेक्षा, स्थिर स्थितीत रूपांतर होण्यासाठी जास्तीत जास्त अणूंची गरज असते. जर सदरील माहितीनुसार आयोजन केले आणि एका विशिष्ट वारंवारतेचा प्रकाश अणूंच्या समुहावर चमकवला, तर निम्नतम स्थितीतील अणूंपेक्षा स्थिर स्थितीतील अणूंचे जास्तीत जास्त उत्सर्जन होते. त्यामुळे मूळ प्रकाशात वृद्धी होते. लेझरची मूलभूत संकल्पना ही आहे. निम्नतम अवस्थेपेक्षा, अणूंच्या एकत्रीकरणामध्ये ऊर्जा पातळीचे अधिक्य जास्त असते. या संकल्पनेला ‘समस्टी व्यस्तता’ असे म्हणतात. समष्टी व्यस्तता निर्माण करण्यासाठी ‘प्रकाशीय पंपण हे सर्वसाधारण तत्व वापरले जाते. त्रिस्तरीय लेझरमध्ये अर्ध्यापेक्षा प्रबळ करण्यासाठी हा अभियोग चतु:स्तरीय लेझर पद्धतीत लागू पडत नाही. त्याचप्रमाणे, लेझरचे परिवहन अस्थिर स्थितीतून स्थिर स्थितीत होण्याऐवजी मध्य स्थितीतच संपुष्टात येते कारण मध्य स्थितीतील अणू स्थिर स्थितीमध्ये लवकरच समावर्तीत होतात म्हणून अस्थिर स्थितीत वाढ करण्यासाठी मर्यादशील पंपण प्रमाण पुरेसे असते.

1. त्रिस्तरीय लेझरमध्ये, अंशस्थिर अवस्था —– मध्ये स्थिर असते.

  1.  निम्नतम अवस्थेच्या खाली
  2.  उत्तेजित स्थितीच्या वर
  3.  उत्तेजित आणि निम्नतम स्थितीच्या मध्ये
  4.  ऐन निम्नतम स्थितीत

उत्तर : उत्तेजित आणि निम्नतम स्थितीच्या मध्ये


 2. पंपण प्रक्रियेचे कमीत कमी प्रमाण —– मध्ये आवश्यक असते.

  1.  चतु:स्तरीय लेझर
  2.  त्रिस्तरीय लेझर
  3.  व्दिस्तरीय लेझर
  4.  पर्याय मध्ये नाही

उत्तर :चतु:स्तरीय लेझर


 3. चतु:स्तरीय लेझर दरम्यानच्या प्रक्रियेमध्ये, अंशस्थित स्थितीचे परिवहन —– संपुष्टात येते.

  1.  उच्चत्तम उत्तेजित स्थितीत
  2.  निम्नतम स्थिती
  3.  अंशस्थिर आणि निम्नतम स्थितीच्या मध्ये
  4.  यापैकी एकही नाही

उत्तर :अंशस्थिर आणि निम्नतम स्थितीच्या मध्ये


 4. प्रेरित उत्सर्जन प्रक्रियेसाठी त्रिस्तरीय लेझरमध्ये —–

  1.  50% अणू अंशस्थिर स्थितीत असतात.
  2.  50% पेक्षा कमी अणू अंशस्थिर स्थितीत असतात.
  3.  50% पेक्षा जास्त अणू अंशस्थिर स्थितीत असतात.
  4.  अंशस्थिर स्थिती रिक्त असते.

उत्तर :50% पेक्षा जास्त अणू अंशस्थिर स्थितीत असतात.


 5. त्रिस्तरीय लेझर पद्धतीतील समष्ठी व्यस्तेत —–

  1.  अंशस्थिर स्थितीत अणूचे जास्त अधिक्य असते.
  2.  निम्नतम स्थितीत अणूचे जास्त अधिक्य असते.
  3.  अंशस्थिर आणि निम्नतम स्थितीत अणूचे अधिक्य सारखे असते.
  4.  वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :अंशस्थिर स्थितीत अणूचे जास्त अधिक्य असते.


 प्रश्न क्रमांक 6-10 :

राष्ट्र निर्माण प्रक्रिया व भारतीय राज्यघटनेविषयीच्या अभ्यासात पुन्हा पुन्हा एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे विविधताविषयक धोरणात एक पायाभूत तत्व राहिले आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांना व भाषिक समूहांना आपल्या संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा अधिकार असेल, हे तत्व होय. आपले एकूण समाजजीवन घडवण्यार्‍या अनेकविध संस्कृतींचा वेगळेपणा हरवू न देता एकात्म समाजजीवन जगण्याचा आपण संकल्प केला होता. भारतीय राष्ट्रवादाने एकात्मता व विविधता यामध्ये समन्वय घडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्राचा अर्थ असा नव्हे की, प्रादेशिक अस्मिता नाकारली जाईल. या अर्थाने भारताचा दृष्टीकोण युरोपातील काही देशांमध्ये वेगळा होता. त्या देशांमध्ये सांस्कृतिक विविधतेकडे ‘राष्ट्रीय एकात्मतेला धोका’ म्हणून पहाण्यात आले.

भारताने विविधतेच्या प्रश्नावर लोकशाहीवादी दृष्टीकोण स्वीकारला. लोकशाहीमध्ये प्रादेशिक आकांक्षाच्या अभिव्यक्तीस मान्यता आहे व प्रादेशिकतेस लोकशाही विरोधी किंवा राष्ट्रविरोधी मानले जात नाही. याव्यतिरिक्त लोकशाही राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष व समूह प्रादेशिक आलेख, अपेक्षा किंवा कोणत्यातरी विशेष प्रादेशिक समस्येला साधार व लोकांच्या भावनेचे प्रतीनिधित्व करू शकतात. त्यामुळे लोकशाही राजकीय प्रक्रियेमध्ये प्रादेशिक अपेक्षा अधिक तीव्र होतात. त्याचबरोबर लोकशाही राजकारणाचा एकूण अर्थ असा आहे की, प्रादेशिक मुद्दे व समस्यांवर धोरण निर्माण प्रक्रियेमध्ये योग्य लक्ष दिले जाईल व त्यांना योग्य प्राधान्य दिले जाईल.

या प्रकारच्या व्यवस्थेत कधी-कधी तनाव निर्माण होऊ शकतात. कधी-कधी असे होऊ शकते की, राष्ट्रीय एकात्मतेखातर प्रादेशिक अपेक्षा व गरजांकडे दुर्लक्ष होईल. कधी असेही घडू शकेल की, प्रादेशिक मुद्यांखातर राष्ट्राच्या मोठ्या आणि महत्वाच्या गरजांकडे डोळेझाक केली जाईल. ज्या देशांमध्ये एकात्मता करण्यावरच अधिक भर दिला जातो अशा देशामध्ये प्रदेशांचे अधिकार, हक्क आणि प्रदोशांचे भिन्न अस्तित्व या मुद्यावरून राजकीय वाद-विवाद होणे ही बाब नित्याचीच आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाला विभाजन, स्थलांवर, संस्थानांचे विलीनीकरण व राज्यांच्या सिमांची पुनराखणी यासारख्या कित्येक भीषण प्रश्नाला तोंड द्यावे लागले. देश-विदेशातील अनेक निरीक्षकांचा अंदाज होता की भारत एक राष्ट्र म्हणून फार काळ टिकू शकणार नाही. स्वातंत्र मिळाल्याबरोबर जम्मू-कश्मीरच प्रश्न समोर आला. हा केवळ भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेल्या संघर्षाचा मुद्दा नव्हता, काश्मीर खोर्‍यातील लोकांच्या राजकीय अपेक्षांचा प्रश्न देखील याच्याशी जोडला गेला होता. याचप्रकारे ईशान्येकडील काही भागांमध्ये भारताचा भाग असण्याच्या मुद्याशी सहमती नव्हती. सुरूवातीस नागालँडमध्ये आणि नंतर मिझोराममध्ये भारतापासून वेगळे होण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलने झाली. दक्षिण भारतात चाललेल्या द्रविड आंदोलनाशी संबंधित काही गटांनी एका टप्प्यावर वेगळ्या राष्ट्राची मागणी केली होती.

या घडामोडीपाठोपाठ देशात बर्‍याच भागात भाषेच्या आधारावर वेगळ्या राज्यांच्या मागणीकरिता जनआंदोलन करण्यात आले. सध्या अस्तित्वात असेलली आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात ही राज्ये असलेल्या प्रदेशांमध्ये अशाप्रकारची आंदोलने झाली. दक्षिण भारतातील काही भागात विशेष करून तामीळनाडूमध्ये हिन्दीला राज्यभाषा करण्याच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. उत्तरेत हिंदी त्वरित राष्ट्रीय भाषा करण्याच्या बाजूने उग्र आंदोलने झाली. 1950 च्या दशकातील उत्तरार्धात पंजाबी भाषिक लोकांनी वेगळ्या राज्याच्या मागणीकरिता आवाज उठविण्यास सुरुवात केली. अखेर त्यांची मागणी मान्य झाली आणि 1966 मध्ये पंजाब व हरियाणा ही राज्ये स्थापन केली गेली. त्यानंतर छत्तीसगड, झारखंड व उत्तरांचल (आता उत्तराखंड) यांची स्थापना झाली, अशाप्रकारे देशांतर्गत प्रदेशांच्या सिमांची फेरआखणी करून विविधतेच्या आव्हानांचा सामना करण्यात आला.

6. स्वातंत्र्यानंतर राज्यांची पुनर्रचना प्रामुख्याने कोणत्या बाबीवर केली गेली?

  1.  सांस्कृतिक स्वातंत्र
  2.  प्रादेशिक मुद्दे व समस्या
  3.  क्षेत्रीय राजकीय अपेक्षा
  4.  प्रादेशिक भाषा

उत्तर :प्रादेशिक भाषा


 7. खालील विधानांतील कोणते विधान योग्य आहे?

अ. सर्व निरीक्षकांना असे वाटत होते की भारत एकसंघ राहू शकणार नाही.

ब. जम्मू व काश्मीरमध्ये पाकिस्तान भारत संघर्षापेक्षा त्या राज्यातील राजकीय अपेक्षांच्या प्रश्न मोठा होता.

  1.  फक्त अ
  2.  फक्त ब
  3.  अ व ब दोन्ही
  4.  अ व ब दोन्हीही नाही

उत्तर :अ व ब दोन्हीही नाही


 8. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

अ. भारतात वेगवेगळी राज्ये आपली संस्कृती जपू शकतात.

ब. भारतात प्रादेशिक राष्ट्रीयवाद नाकारला जातो.

  1.  फक्त अ
  2.  फक्त ब
  3.  अ व ब दोन्ही
  4.  अ व ब दोन्हीही नाही

उत्तर :अ व ब दोन्ही


 9. भारताने विविधतेच्या प्रश्नांचा सामना कसा केला?

  1.  एकात्मतेबाबत जाणीव जागृती करून
  2.  लोकशाही दृष्टीकोण स्वीकारून
  3.  जनाच्या मागण्या मान्य करून
  4.  वरील एकही नाही

उत्तर :लोकशाही दृष्टीकोण स्वीकारून


 10. पुढील कोणते विधान अयोग्य आहे?

अ. भारतात एकात्मतेला प्राधान्य आहे परंतु प्रादेशिक विविधतेकडे दुर्लक्ष नाही.

ब. इतर देशात सांस्कृतिक विविधता एकात्मतेस धोका समजली जाते.

  1.  केवळ अ
  2.  केवळ ब
  3.  अ व ब दोन्ही
  4.  अ व ब दोन्हीही नाही

उत्तर : अ व ब दोन्ही

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.