7 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

भारतीय लष्कर ध्वज दिन
भारतीय लष्कर ध्वज दिन

7 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 डिसेंबर 2022)

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन :

  • संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्वपक्षीय बैठक झाली.
  • वाढती महागाई, बेरोजगारी आणि चीन-भारत सीमेवरील परिस्थितीवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली.
  • तर संसदेचे संकेत व नियमानुसार हे मुद्दे विचारार्थ घेण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.
  • यावेळी बिजू जनता दलाकडून महिला आरक्षण विधेयक, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून (शिंदे गट) लोकसंख्या नियंत्रण विधेयक लोकसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश :

  • कोणीही उपाशीपोटी झोपू नये याची दक्षता घेण्याची आपली संस्कृती असल्याचे निदर्शनास आणूत देत, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारला बजावले की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याखाली (एनएफएसए) पुरविले जाणारे अन्नधान्य हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे.
  • न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्या. हिमा कोहली यांच्या पीठाने केंद्राला निर्देश दिले की, ईश्रम पोर्टलवर नोंदल्या गेलेल्या स्थलांतरित मजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या संख्येचा ताजा आराखडा न्यायालयात सादर करण्यात यावा.
  • न्यायालय म्हणाले की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याखाली केला जाणारा अन्नधान्याचा पुरवठा हा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, याची दक्षता घेणे हे केंद्राचे काम आहे.

ऋषिकेश कानिटकर फलंदाजी प्रशिक्षकपदी :

  • महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला दोन महिनेच शिल्लक असताना भारताचा मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) बदली करण्यात आली आहे.
  • भारताचा माजी खेळाडू ऋषिकेश कानिटकरची फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.
  • कानिटकरने यापूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील पुरुष आणि भारत-अ संघांचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.
  • आता 9 डिसेंबरपासून मायदेशात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून तो महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल.
  • तसेच पोवार ‘एनसीए’मध्ये फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करेल.
  • यासह रमेश पोवार हे आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारतील असेही सांगण्यात आले आहे.

ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारने केला नवा विक्रम :

  • फिफा विश्वचषकाच्या 16व्या फेरीच्या सामन्यात ब्राझीलने दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव केला.
  • या विजयासह पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
  • अंतिम आठमध्ये ब्राझीलचा सामना 2018च्या विश्वचषक उपविजेत्या क्रोएशियाशी होणार आहे.
  • विश्वचषकाच्या किमान तीन आवृत्त्यांमध्ये गोल करणारा नेमार हा ब्राझीलचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
  • नेमारने 2014, 2018 आणि 2022 विश्वचषकामध्ये गोल केले आहेत.
  • नेमारच्या आधी पेले आणि रोनाल्डो नाझारियो या महान फुटबॉलपटूंनी ही कामगिरी केली आहे.
  • या बाबतीत पेले नेमार आणि रोनाल्डोच्या पुढे आहेत.
  • नेमारने रोनाल्डो, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि पेरिसिक यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

दिनविशेष:

  • 7 डिसेंबर हा दिवस ‘भारतीय लष्कर ध्वज दिन‘ तसेच ‘आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन‘ आहे.
  • सन 1825 मध्ये बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज होते.
  • पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात सन 1856 मध्ये झाला.
  • स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म 7 डिसेंबर 1921 मध्ये झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.